द्वापारयुगात हस्तिनापूरवर राजा शंतनू यांचा शासन होता. त्यांच्या पत्नीचे नाव गंगा होते. राणी गंगेला राजा शंतनूपासून पुत्रप्राप्ती झाली. " देवव्रत " - असे त्याचे नामकरण करण्यात आले. देवव्रताच्या जन्मानंतर दिलेल्या वचनाचे पालन करत राणी गंगा राजा शंतनू यांना सोडून निघून गेली.
भीष्म प्रतिज्ञा
एक दिवस गंगेत नौका विहार करत असताना राजा शंतनू यांची भेट सत्यवतीशी होते. ते तिच्या रुपावर इतके भाळतात की, सत्यवतीच्या वडिलांसमोर विवाह प्रस्ताव ठेवतात. मात्र, सत्यवतीपासून होणारा पुत्र हस्तिनापूरचा सम्राट होईल, अशी अट ते राजा शंतनू समोर ठेवतात. राजा शंतनू ही अट मान्य करत नाहीत. देवव्रताला जेव्हा ही गोष्ट समजते, तेव्हा तो आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा करतो. त्यानंतर राजा शंतनू आणि सत्यवती यांचा विवाह होतो.
इच्छा मृत्यूचे वरदान
देवव्रताने घेतलेल्या संकल्पामुळे राजा शंतनू अतिशय प्रभावित होतो आणि देवव्रताला इच्छा मरणाचे वरदान देतो. देवव्रताच्या या प्रतिज्ञेमुळे त्याला पुढे भीष्म म्हणून ओळख मिळते.
महाभारतात भीष्म
महाभारताचे युद्ध होते. त्यावेळी भीष्म पितामह कौरवांकडून युद्धास सामोरे जातात. इच्छा मरणाचे वरदान असल्यामुळे भीष्म पितामहांना कसे रोखायचे, हा प्रश्न पांडवांना पडतो. यावर काहीतरी उपाय शोधण्यासाठी ते श्रीकृष्णाकडे जातात. श्रीकृष्णाच्या विनंतीवरून पितामह भीष्म स्वतः आपल्या मृत्यूवर उपाय सांगतात.
पार्थाने वधिले भीष्माला
कोणत्याही नपुंसक किवा स्त्री समोर भीष्म पितामह शस्त्र उचलणार नाही, हे समजल्यावर भगवान श्रीकृष्ण शिखंडीला भीष्मासमोर उभे करतात. आपल्या वचनानुसार, शिखंडीला समोर पाहून भीष्म शस्त्र त्यागतात. याचाच फायदा घेऊन धनुर्धारी अर्जुन भीष्मांवर बाण चालवतो. कोणताही प्रतिकार न करता भीष्म ते प्राण अंगावर झेलतात.
कोणत्याही नपुंसक किवा स्त्री समोर भीष्म पितामह शस्त्र उचलणार नाही, हे समजल्यावर भगवान श्रीकृष्ण शिखंडीला भीष्मासमोर उभे करतात. आपल्या वचनानुसार, शिखंडीला समोर पाहून भीष्म शस्त्र त्यागतात. याचाच फायदा घेऊन धनुर्धारी अर्जुन भीष्मांवर बाण चालवतो. कोणताही प्रतिकार न करता भीष्म ते प्राण अंगावर झेलतात.
भीष्मद्वादशी
माघ महिन्यातील द्वादशीला भीष्मद्वादशी म्हटले जाते. महाभारतात पितामह म्हणून ओळख असलेल्या गंगापुत्र देवव्रत म्हणजे भीष्माचार्यांनी माघ शुद्ध अष्टमी रोजी आपला देह ठेवला. मात्र, त्यांची उत्तरक्रिया माघ शुद्ध द्वादशीला करण्यात आली. म्हणून या द्वादशीला भीष्म द्वादशी म्हटले जाते.
भीष्माष्टमी
महाभारतात ज्या दिवशी पार्थ भीष्मांवर बाणांचा वर्षाव करतात, त्यावेळी सूर्य दक्षिणायन असतो. इच्छा मरणाचे वरदान प्राप्त असल्यामुळे भीष्म आपले प्राण सोडत नाहीत. त्यानंतर अर्जुनच त्यांना शरशय्या तयार करून देतो. जेव्हा सूर्य उत्तरायण सुरू होते, तेव्हा माघ शुद्ध अष्टमीच्या दिवशी भीष्माचार्य आपले प्राणोक्रमण करतात. म्हणूनच माघ शुद्ध अष्टमीला भीष्माष्टमी असेही म्हटले जाते.
भीष्म पितामह यांची काही मंदिरे :
- नरकातारी, कुरुक्षेत्र - हरियाणा
- दारागंज, अलाहाबाद - उत्तर प्रदेश
छायाचित्र :
१ - ( मूर्ती ) स्वामी नारायण मंदिर, पुणे
२, ३, ४ - ( पुस्तक ) भीष्म पितामह, श्यामसुंदरदास
सन्दर्भ :
- भीष्म पितामह ( चतुर्वेदी द्वारकाप्रसाद शर्मा - इंडियन प्रेस लिमिटेड )
- गंगापुत्र देवव्रताची भीष्मद्वादशी ( देवेश फडके - महाराष्ट्र टाइम्स )
Comments
Post a Comment