गोंदेश्वर मंदिर, सिन्नर
बाणासूर राक्षसाने सिन्नर नगरी उचलून पालथी केली, अशी अख्यायिका सिन्नरबाबत सांगितली जाते. सिंधीनगर उर्फ सेनुनापूर अन् नंतर सिन्नर अशी अनेक नावं एखाद्या नक्षीदार शालीसारखे पांघरत या नगरीने मोठा प्रवास केला आहे. सेऊणचंद्राने 'सेऊणपुरा' या नावाने स्वतंत्र पेठ किंवा वस्ती निर्माण केली असे काही ताम्रपटात म्हटल्याचे दिसते. सिन्नरचा इतिहास जेवढा अनोखा आहे. तेवढीच तेथील मंदिरेही देखणी आहेत. सुमारे आठशे वर्षांपूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद यांचे शासन होते. हे एकटे मंदिर नसून, शिवपंचायतन स्वरूपात असणारा हा पाच मंदिरांचा समूह आहे. म्हणूनच गोंदेश्वराचे महत्त्व फक्त सिन्नर अथवा नाशिकपुरते मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या स्थापत्यशिल्प वैभवात या मंदिराने भर घातलेली आहे.
हे मंदिर पुरातन, भूमिज स्थापत्यशैली बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत.
मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. गर्भगृहावर बांधलेले, आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंडी आहे. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यांवर आणि मंदिरांच्या भिंतींवर देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते.
साधारण बाराव्या शतकाच्या सुरुवातीला बाधलेले दक्षिण शैलीतील सिन्नर येथील पुरातन गोंदेश्र्वर मंदिर हे स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरण होय. मंदिराचे बांधकाम गवळी राजकुमार राजगोविंद यांनी केलं आहे. दख्खन पठारावर बांधलेली मंदिरे ही साधारण काळ्या पाषाणातील असतात. पण या मंदिराच एक आचार्य म्हणजे हे मंदिर गुलाबी व्हेसिक्युलर खडकांपासून बनवलेले आहे. या मुळे मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झाला आहे. व्हेसिक्युलर खडकाची झीज ही लवकर होते हे मंदिर पाहताना आपल्याला हे प्रकर्षाने लक्षात येईलच. तसेच त्यावर कोरीव काम करणे हे देखील अवघड असते. तरीही यावर अप्रतिम केलेली कलाकुसर पाहतच रहावी अशीच आहे.
रथसप्तमीनिमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात. तसेच विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या प्रांगणात सूर्यनमस्कार काढून बलोपासनेचा संकल्प केला जातो.
या मंदिराचा अजून एक वैशिठ्ये म्हणजे गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते तिथे मगरीचे तोंड शिल्पित केलेले दिसते. बऱ्याच मंदिरात आपल्याला गाईचे तोंड (गोमुख) शिल्पित केलेले दिसते आणि त्यातून ते जल बाहेर येते. गोमुखातून आलेले जल हे पवित्र मानले जाते. परंतु हे गोमुख इ. स. च्या तेराव्या शतकानंतर दिसू लागते. त्याआधी मकरप्रणाल अर्थात मगरीचे तोंड कोरलेले दिसते आणि ते पवित्र जल मगरीच्या तोंडातून बाहेर पडत असते. मगर हे गंगेचे वाहन आहे. त्याच्या तोंडातून येणारे जल ते गंगाजल हे सांगण्यासाठी, मगरीचे गंगेचे असेलेले नाते स्पष्ट करण्यासाठी मकरमुख कोरलेले दिसते.
आभार : समीर परिहार आणि दत्ता जोशी
सन्दर्भ :
- नोटीफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्यूमेन्ट्स इन इंडिया" (इंग्रजी भाषेत). १२ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
- ॲक्सेसदिनांक = मधील दिनांक मूल्ये तपासा ( सहाय्य )
Comments
Post a Comment