Skip to main content

Vasota Fort / किल्ले वासोटा




अवर्णनीय वनदुर्ग, वासोटा 
वासोटा किल्ला बांधण्याचे श्रेय शिलाहार वंशीय दुसऱ्या राजा भोजकडे जाते . प्रथमत: शिर्के व मोरे यांच्याकडे वासोट्याचा ताबा गेला . पुढे ६ जून , १६६० रोजी शिवरायानी वासोटा किल्ला जिंकला . राजापूर प्रकरणी पकडलेल्या राव्हग्टन व इतर इंग्रजाना शिवरायांनी या किल्ल्यावरच कैदेत ठेवले होते . पुढे २७ सप्टेंबर , १६७९ रोजी शिवरायांना या गडावरच गुप्तधनाने भरलेले ४ हंडे सापडले . इ.स. १७०० मध्ये औरंगजेबने सज्जनगडास वेढा घातल्यानंतर परशुराम प्रतिनिधींनी सज्जनगडावरील सर्व मौल्यवान मूर्ती वासोट्यावर आणून ठेवल्या होत्या .

पुढे १७३० मध्ये औंधचे प्रतिनिधी व पेशवे यांच्यात तंटा निर्माण झाला . पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी पंतप्रतिनिधीचा पराभव केला . पण आपल्या धन्याचा पराभव सहन न होऊन ताई तेलीणीने वासोटा किल्ल्यावर जाऊन पेशव्याविरुध्द बंड पुकारले . तब्बल ८ - १० महिने झुंज देऊन बापू गोखल्यांनी वासोटा परत जिंकून घेतला . त्यासंबंधी एका जुन्या आर्येमध्ये वासोट्याचा गंमतीचा उल्लेख येतो- "श्रीमंत प्रतिनिधींचा हा अजिंक्य किल्ला वासोटा । ताई तेलीण मारील सोटा , बापू गोखल्या सांभाळ कासोटा । ।"

पुढे इंग्रज मराठे युध्दात ६ मार्च, १८१८ रोजी एल्फिन्स्टन या आधिकाऱ्याने वासोटा किल्ला जिंकला . बापू गोखल्यांनी वासोटा किल्ला घेतेवेळी एका पत्रात लिहीलेले आहे - " डोगर झाडी मनस्वी अडचण बहुत ! किल्ला बहुत बांका ! सात कोश , अडीच मास झाडी तोडली तेंव्हा मार्ग जाला ." आजही किल्ल्यास जाताना वरील ओळी आपल्याला आठवतात . अजूनही या परिस्थितीत काहीही फरक पडलेला नाही . आजही कोयना जलाशयाच्या मिठीत वासोटा उर्फ व्याघ्रगड हा वनदुर्ग आपले दुर्गमत्त्व टिकवून ताठ मानेने उभा आहे.

माहिती आभार : पुस्तक गडकोट ✍

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...