सरदार पिलाजी जाधवराव
पिलाजी जाधवराव यांच्या वडिलांचे नाव चांगोजी तर आईचे नाव हंसाई होते. चांगोजी यांच्या कडे वाघोलीच्या पाटीलकीचे वतन चालत आले होते. पिलाजी, बाजीराव व चिमाजी आप्पा यांचे युध्दशास्त्रातील गुरु होते.
शाहू महाराजांच्या काळात मराठे उत्तर हिंदुस्थानात खूप सक्रिय होते. तेथे जवळजवळ प्रत्येक वर्षी स्वारी करून मुलूख आणि खंडणी प्राप्त करून घेत असत. पिलाजी जाधवराव हे या हालचालीं मधील एक अग्रणी सरदार होते. त्यांनी अनेक स्वार्यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
पिलाजींना सागर प्रांती चार खेड्यासह ( बध परडीया , खुजनेरखेडा , हथना ) मोकलमाऊ , चौका , खामखेडा , खमरीया , गढामंडळ वगैरे मुलुख छत्रसाल राजाने जहागिर दिला. पिलाजींनी भदावर , माळवा , कमरगा , नरवरा शिप्री , ग्वाल्हेर , भोपाळ , सिरोंज , दतिया , ओछा , दिल्ली स्वारी , इत्यादी लढायांत भाग घेतला होता. त्यांनी उत्तरेकडील रतनगडचा पण किल्ला जिंकून घेतला होता.
पिलाजी जाधवरावांनी सासवड, दिवा, वाघोली, जाधववाडी या व्यापारी पेठा वसवल्या होत्या. त्या संबंधी शाहूमहाराज एका पत्रात म्हणतात : ‘राज्याभिषेक शके ३४ सर्वधारी नाम संवत्सरे शाहू छत्रपती महाराज यांनी पिलाजी बिन (वडिल) चांगोजी यास मौजे दिवे येथे पेठ वसवण्यास सोयीचे गाव आहे, तरी पेठ वसवावी. तिचे नाव शाहूपुरी असे ठेवावे. त्यास तुम्हास पेठेचे सेटेपण इनाम वंशपरंपरेने इतर ठिकाणचे वाणी उदमी आणावे, वतन वंशपरंपरेने खावे.’
निजामाने पिलाजी जाधवराव यांचा " जलादत्त इंतिवाह " अर्थात रणशुर , शौर्यकर्माचे मर्मज्ञ अशा शब्दांत गौरव केला होता.
पिलाजीरावांचे देहावसान ३ जुलै १७५१ रोजी वाघोली येथेच झाले. वाघोली या गावातच सरदार पिलाजीराव जाधव यांचे वाडे आजुनही त्यांच्या शौर्याची, कर्तृत्वाची आणि वैभवाची स्मृती जपून आहेत. गावातून बाहेर पडल्यावर पुणे-अहमदनगर मार्गाच्या पलीकडे सरदार पिलाजीराव जाधव यांची भव्य छत्री (समाधी) आहे. त्या भव्य चौथऱ्यावर घोटीव पाषाणातील सुबक बांधकाम आहे. वाघोलीशिवाय जाधववाडी व नांदेड येथे जाधवरावांचे गढीचे वाडे आहेत.
सन्दर्भ :
- Discover Maharashtra ( धर्मराज खेडेकर )
- महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे ( डॉ. सदाशिव शिवदे )
फोटो :
- सरदार पिलाजी जाधवराव यांची पेंटिंग - पेशवा संग्रहालय, पर्वती ( जि. पुणे )

Comments
Post a Comment