वीर मावळा - शिवा काशीद
शिवा काशीद हे शिवाजी राज्यांच्या सैन्यात न्हावी होते . त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले , म्हणून शिवाजीराजे सिद्दी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप निघाले व विशाळगडावर पोहचले.
हे शिवा काशीद हुबेहूब शिवाजीराजांसारखे दिसत असत . त्यांना पोशाखही शिवाजी महाराजांचा दिला होता . त्यामुळे सिद्दी जोहरच्या सैनिकांनीपालखीत बसलेल्या आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवा काशीदांना , शिवाजी राजे समजून पकडले आणि सिद्दीकडे नेले . मात्र , हे शिवाजी नाहीत असे कळताच जोहरने त्यांच्या पोटात तलवार खूपसली . ही घटना १२ - १३ जुलै १६६० या दिवशीघडली .
या शिवा काशीद नावाच्या मर्द मावळ्याची दुरवस्थेतील समाधी पन्हाळगडाच्या पायथ्याशी , विशाळगडाकडे जाणाऱ्या वाटेतील एका गावापाशी आहे . नेबापूरच्या ( चव्हाण ) " पाटलांनी " शिवा काशिदांना प्रति शिवाजी महाराज बनण्याची कल्पना दिली होती . ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नेबापूर ( चव्हाण ) पाटील आणि शिवा काशीद यांनी शिवाजी महाराजांशी थेट बैठक आयोजित केली . कारण पन्हाळा नुकताच स्वराज्यात सामील झाला होता . त्या काळात शिवाजी महाराज नवीन पन्हाळ्याचे व्यवस्थापन करण्याची योजना करीत होते . मानवी संसाधनांची व्यवस्था करण्याची जबाबदारीनेबापूर ( चव्हाण ) पाटील यांची होती .
असेही सांगितले जाते की सिद्दी जौहरला दिशाभूल करण्याचे धोरण आखण्यात नेबापूर ( चव्हाण ) पाटील हे मुख्य सूत्रधार होते . नेबापूर ( चव्हाण ) पाटील हा सर्वात विश्वासू वैयक्तिक हेर होता . हे देखील सांगण्यात आले आहे की बाजी प्रभू आणि नेबापूर पाटील यांनी एकत्रितपणे योजना आखली आणि अंमलात आणली . सर्व माहितीपैकी एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे ती म्हणजे शिवाजी महाराजांनी पन्हाळा ताब्यात घेतला तेव्हा शिवाजीराजेसारखे दिसण्याबद्दल शिवा काशिदचे प्रथम नेबापूर पाटलांनी कौतुक केले . पण लवकरच शिवा काशिदांनी शिवाजी महाराजांचा आणि स्वराज्याचा जीव वाचविला . नेबापूर ( चव्हाण ) पाटील यांच्या कल्पनेचा सन्मान म्हणन शिवाजी महाराजांनी " मानाची पायरी " भेट दिली . " मानाची पायरी " हा एक मोठा आयताकृती कोरीव दगड आहे . तो अजूनही नेबापुरात आहे .
रयतेच्या स्वराज्यासाठी प्राणत्यागकरणारया प्रतिशिवाजी शिवा काशिद यांच्या घरी कालांतराने शिवाजीराजे दस्तूरखुद्द स्वतःगेले . शिवा काशिद यांच्या पत्नीपारूबाई यांचे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांत्वन केले . शिवा काशिद यांचा मुलगा यशवंत यांना अधिकारीपदी नेमले . शिवा काशिद यांचे नेबापूरलास्मारक उभारले . सर्व कुटुंबाची व्यवस्था करून छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर गेले.
Comments
Post a Comment