Skip to main content

श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर, सदाशिव पेठ ( पुणे ) / Shri Lakshmi Narasimha Mandir, Sadashiv Peth ( Pune )


श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर, सदाशिव पेठ ( पुणे )

महाराष्ट्रात लक्ष्मीनृसिंहाची मंदिरं तशी थोडीच आहेत. त्यापैकी एक मंदिर आपल्या पुण्यातील सदाशिव पेठेत आहे. खुन्या मुरलीधर मंदिराकडून टिळक रस्त्याकडे जाताना, सध्याच्या पुणे विद्यार्थी गृहाच्या समोर एक जुन्या पद्धतीचा दगडी पायऱ्यांचा लाकडी दरवाजा दिसतो. आतल्या बाजूस असलेल्या श्री लक्ष्मीनृसिंह मंदिराचे ते प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये पेशवेकालीन मराठा शैलीतील लक्ष्मीनृसिंहाचे लहानसे मंदिर आहे.


सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकीर्दीत १७८८ मध्ये येथील नृसिंह मंदिराचे बांधकाम करण्यात आले. १८ व्या शतकात बांधलेल्या तुळशीबाग व बेलबाग या मंदिरांच्या धर्तीवर या मंदिराची रचना केलेली आहे. हे मंदिर चिरेबंदी असून मंदिराला सुंदर कळस, कोरीव छत व महिरपी असलेला लाकडी दिवाणखाना आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून आत प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूस पिंपळाचा भव्य पार आहे. या पारावर पेशवेकालीन हनुमानाची मूर्ती, नागदेवतेच्या शिळा व दगडात कोरलेल्या अज्ञात पादुका आहेत. या पारानजीक असलेल्या खोलीत आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे काही काळ वास्तव्य होते. क्रांतिकारक दामोदरपंत चाफेकर तसेच समर्थभक्त श्रीधरस्वामी यांचेही या मंदिरात काहीकाळ वास्तव्य होते.

मंदिराचे सभामंडप लाकडी आहे आणि त्याची लांबी ६० फूट व रुंदी २० फूट आहे. या सभामंडपाच्या दोन्ही बाजूला ओवऱ्या आहेत. उजव्या बाजूला ओवरीच्या भिंतीत कोरीव महिरपी असलेल्या खिडक्या आहेत. सभामंडप व ओवऱ्यांच्या लाकडी छताच्या कडेने पानाफुलांच्या वेलबुट्ट्या कोरलेल्या आहेत. सभामंडपाचे महिरपी असलेले खांब लाकडी पट्ट्यांनी जोडलेले आहेत. या पट्ट्यांवर उत्सवप्रसंगी दिवे लावण्याची सोय आहे. मंदिराच्या शिखरावर कलात्मक नक्षी आहे. मागच्या एका ओवरीतून शिखरावर जाण्याकरिता मार्ग आहे. मंदिराच्या प्रदक्षिणेच्या वाटेवर डाव्या बाजूस भिंतीमध्ये सूर्यनारायण व उजव्या बाजूस महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती आहेत.


गर्भगृहातील नृसिंहाची मूर्ती संगमरवरातील असून रेखीव, मोहक व ठसठशीत आहे. या मूर्तीस 'शांत' रूपातील नृसिंह म्हणतात. हिरण्यकश्यपूचा वध करणारी नृसिंहाची मूर्ती उग्र स्वरूपातील समजली जाते. नृसिंहाच्या डाव्या मांडीवर लक्ष्मी विराजमान आहे. पेशवाई पद्धतीच्या भव्य कोरीव मखरात आरशापुढे ही मूर्ती विराजमान आहे. या मंदिरात 'पंचायतन' पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला भिंतीमध्ये पेशवेकालीन संगमरवरी गणेशमूर्ती आहे तर उजव्या बाजूला नंदी व शंकराची पिंडी आहे. सभामंडपाच्या टोकाला नृसिंहासमोर भक्त प्रल्हादाची संगमरवरी मूर्ती असलेलं एक लहान मंदिर आहे.


वेदशास्त्रसंपन्न गणेशभट्ट जोशी यांनी श्री लक्ष्मीनृसिंहाची ही मूर्ती, अत्यंत भक्तिभावाने उत्तर प्रदेशातून पुण्यात आणली आणि आपल्या बागेत लहानसे पण देखणे मंदिर बांधून त्यात तिची विधीपूर्वक स्थापना केली. मंदिर झाल्यावर त्याच्या सान्निध्यामुळे आणि आजूबाजूच्या निसर्गसंपन्नतेमुळे मोहून काही पुणेकरांनी मंदिर ते खजिना विहीर या भागात आपली घरे, वाडे बांधले आणि बघता बघता पाच पंचवीस घरांची छोटी वस्ती तयार झाली. या वस्तीला विस्ताराला भरपूर वाव आहे हे बघून, या जागी पेठ वसवल्याने हा परिसर गजबजून जाईल, पेठ मोठी होईल. हा हेतू मनाशी ठेऊन दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी इ.स. १८०५ च्या आधी या वस्तीला स्वतंत्र पेठेचा दर्जा दिला आणि नाव ठेवले पेठ नृसिंहपुरा.

संदर्भ :
१. हरवलेले पुणे ( डॉ . अविनाश सोहनी )
२. सफर ऐतिहासिक पुण्याची ( संभाजी भोसले )

माहिती स्त्रोत :
discovermh संकेतस्थळ 

लोकेशन ( Location ) :
https://maps.app.goo.gl/EbYXyCCXgBX9bbAG9

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...

Shree Badaviling Temple, Krishnapura, Hampi ( Karnataka )

Shree Badaviling Temple, Krishnapura, Hampi ( Karnataka ) A huge monolithic Shiva Linga inside a cella, built by the side of the Lakshmi-Narasimha Temple enclosure. The Shiva Linga has a three-eye mark drawn on it in line carving. The three-eye mark depicts the three eyes of Lord Shiva. It is believed that the temple has been in existence since the period of the Vijayanagara Empire. This huge Linga, which is about 5 meters high, is locally called by the name Badaviling or Badavilinga. It is noteworthy that a channel that runs by the side of this shrine is diverted to enter the cella and thus this Linga is made to stand amidst water always. This Linga is situated inside a small stone chamber. There is a single opening in front of the chamber through which devotees can get in. An interesting thing to note about the design of the stone chamber is that it has no ceiling. During the daytime, sunlight enters through the opening in the ceiling and floods the Shiva Linga wi...