Skip to main content

मंदिरे कसे ओळखायचे ? / How To Identify Temples aand It's Architecture ?


मंदिरे कसे ओळखायचे ?

महाराष्ट्र मधील मंदिराच्या बाबतीत बहुतांश लोक गल्लत करतात. सर्व मंदिरांना हेमाडपंथी असं संबोधित करून त्याचे कालखंड, त्याचा इतिहास सर्व काही गाळून टाकतो. यादव सम्राट रामचंद्रदेव याचा हेमाद्री हा सेनापती "सकलकरणाधिप" म्हटला जाई. १२ व्या ते १४ व्या शतकापर्यंत ह्यांचा सुवर्णकाळ.  त्याच्या काळाच्या अगोदरच्या शतकातील मंदिरे कशी बांधली असतील ? हा प्रश्न काही जनांना नक्कीच पडला पण याचे उत्तर मात्र कोणी शोधले नाही. त्याच्या अगोदर शिलाहार काळात ( ८ व्या ते १२ व्या), राष्ट्रकूट, चालुक्य, वाकाटक यांच्या काळात उत्तम अशी घडीव मंदिरे बांधली गेली त्यांनाही लोक हेमाडपंथी म्हणून मोकळे होतात. त्या भागात कोणती सत्ता होती ? कोणत्या सत्तेची राजधानी किंवा त्याचा जवळ आहे का ? शिव आहे की वैष्णव ? मंग सत्ताधारी कोणते होते ? दानपत्र किंवा शिलालेख आहे का परिसरात ? हे सर्व लक्षात घेऊन कोणी अभ्यास करत नाही. दिसेल तिला हेमाडपंथी म्हणून मोकळे होतो. मुळात हेमाडपंथी ही मंदिराची शैली नाहीच. तिला आपण यादवकालीन म्हंटल पाहिजे.

हेमाद्री हा कुशल सेनापती होता आणि मोठा धार्मिक ही होता त्याच्या हाताखाली अनेक मंदिरांचे काम झाले पण त्याचा नावाची शैली कुठेही नाही. शैली ठरवताना त्याचे शिखर हा घटक महत्ववाचा ठरतो. शिखरावरूनच त्या मंदिराची शैली ठरते. जसे कि द्राविड, नागर, वेसर,भूमीज असे. पण महाराष्ट्राचे दुर्दैव असे कि बरीच मंदिरांचे मूळचे शिखरे पडून गेली आहेत. पण सध्या स्तितीत जी मंदिरे आहेत त्या वरून असे लक्षात येते कि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मंदिरे दख्खन नागरशैलीची आहेत. परंतु इतर राज्यानंपेक्षा महाराष्ट्राची शैली वेगळी आहे. थोड्या फार प्रमाणात इतर प्रांताच्या शैलीचा प्रभाव त्या वर पडला. मंदिराचे शिखर पडून गेल्यामुळे त्याचा जीर्णोद्धार झाल्यामुळे शिखरवैशिष्ट्ये बदलतात हे एक मुख्य कारण आहे. खरं तर नागर आणि द्राविडशैलीतील वास्तुघटकांच्या मिश्रणातून वेसर मंदिर स्थापत्यशैली तयार होते.

महाराष्ट्र मध्ये आद्य मंदिरे ही विष्णूची आहेत. ५ व्या शतकात रुद्रसेन वाकाटक ह्याची पत्नी प्रभावती हिने विदर्भ मध्ये रामटेक परिसरात महाराष्ट्र मध्ये सर्वप्रथम प्रथम घडीव मंदिरांची परंपरा सुरू केली. ही प्रभावती राणी गुप्त घराण्याची असून वैष्णव होते. तगर- तेर ला इ. स. ४०० ते ५५० ला मंदिरे बांधली गेली. त्यात त्रिविक्रम चे मंदिर प्रसिध्द आहे. महाराष्ट्र मध्ये पहिल अस्सल मराठी शैलीचे अंबरनाथ येथील भूमिज मंदीर इ.स. १०६० मध्ये शिलाहार काळात बांधले गेले. कल्याणीचे चालुक्य,द्वारसमुद्रमचे होयसळ या राजवंशाच्या ( इ.स. १०२२ ते १३४६ ) आश्रयाने कर्नाटकात जी मंदिरे तयार झाली ती वेसर मंदिरे होती. आणि मुख्य म्हणजे हि शैली इ. स. च्या १० व्या शतकाच्या अखेरीस उदयास आली. चालुक्य राजांचे मांडलिक असलेल्या यादव, शिलाहार राजांच्या काळात महाराष्ट्रात या मंदिरांची निर्मिती झाली. त्यापैकी थोडी मंदिरेच आज शिल्लक आहेत. एकंदरीत एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक राजवटी मध्ये वेगळ्या वेगळ्या शैलीचा प्रभाव पडून पडून त्या त्या भागात तशी मंदिरे तयार केली गेली. त्यामुळे कोणत्याही मंदिराचा अभ्यास करूनच त्या बद्दल त्याची वर्णन किंवा लेखन करावे. ज्यामुळे खरा अर्वाचीन, सुंदर, अनेक वर्ष बारीक अवर्णनीय मनमोहन शिल्प असलेला हा कलात्मक इतिहास सर्वांच्या समोर येईल.

माहिती आभार : रुद्रराज पवार

Instagram

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...