Skip to main content

Posts

पुण्यातील काही प्रसिद्ध देखावे - पुणे गणेशोत्सव 2024

पुणे गणेशोत्सव 2024 पुण्यातील काही प्रसिद्ध देखावे ✨✨✨ List Format : Mandal Name - देखावे 1. Kasba Ganapati Mandal - Siddhatek Astavinayak Ganapati  2. Shreemant Dagluseth Halawai Ganpati Mandal - Jatoli Shiv Mandir, Himachal Pradesh  3. Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Mandal - Varad Vighneshwar Wada, Ozar 4. Tulshibaug Ganapati - Jagannath Puri Mandir, Odisha  5. Shree Gajanan Mitra Mandal, Tulshibaug - Shree Mahakaleshwar Mandir, Ujjain  6. Hutatma Babu Genu Mandal - Meenakshi Mandir, Madurai 7. Sharda Ganapati Mandal Trust - Kalpanik Shiv Mandir 8. Chhatrapati Rajaram Mitra Mandal - Durgiana Mandir, Amritsar Punjab 9. Shanipar Mandal Trust - Vrindavan Nagari 10. Panchamukhi Hanuman Tarun Mandal, Shukrawar Peth - Pashupatinath Mandir, Nepal 11. Nav Jawan Mitra Mandal, Sadashiv Peth - Shiv Parvati Vivah Celebrations 12. Trishund Ganapati Mandir Mandal - Kashi Vishwanath Mandir, Varanasi 13. Navnath (Achanak) Tarun Mandal Trust - 12 Jyotirlinga Darshan 14. Bholenath Mit
Recent posts

चाफेकर बंधू / Chaphekar Brothers

चाफेकर बंधू प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक. दामोदरपंत, बाळकृष्ण आणि वासुदेव अशी त्यांची नावे. त्यांच्या वडिलांचे नाव हरिपंत चाफेकर. ते कीर्तनकार होते. दामोदरपंत हे जेष्ठ पुत्र. त्यांचा जन्म २५ जून १८६९ रोजी कोकणात झाला. बाळकृष्ण व वासुदेव हे दामोदरपंतांचे कनिष्ठ बंधू. कालांतराने हरिपंत पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले. दामोदरपंत व त्यांचे बंधू वडिलांना कीर्तनात साथ देत. दामोदरपंतांनी अनेक तरुण संघटित करून ‘आर्यधर्म प्रतिबंध निवारक मंडळी’ ही गुप्त संघटना स्थापन केली. त्यांना व्यायामाचा, भाले, तलवारी चालविण्याचा छंद होता. ती शस्त्रेही त्यांनी जमविली होती. त्यांचे बंधू व अन्य काही तरुणही या छंदास लागले. पुढे त्यांनी पिस्तुले मिळवून नेमबाजी करण्यात प्रावीण्य मिळविले. इंग्रज सरकारविषयी त्यांच्या मनात भयंकर असंतोष होता. दामोदर चाफेकर यांनी १६ ऑक्टोबर १८९६ रोजी मुंबईतील व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्यावर डांबर ओतले व त्या पुतळ्याच्या गळ्यात फाटक्या जोड्यांची माळ घातली. पण मुंबईच्या पोलिसांना हे कृत्य करणाऱ्याचा तपास लागला नाही. त्यांना इंग्रजी भाषेचा तिरस्कार होता. त्यामुळेच ते ‘इंग्रजी भाषा ही व

रहाळकर श्रीराम मंदिर, सदाशिव पेठ ( पुणे ) / Rahalkar Shreeram Mandir, Sadashiv Peth ( Pune )

रहाळकर श्रीराम मंदिर सदाशिव पेठ, पुणे नागनाथपारावरून शनिपाराकडे जाताना डाव्या हाताला श्रीरामतीर्थ या इमारतीमध्ये एक श्रीराम मंदिर आहे. तेच रहाळकर यांचे पट्टाभिषिक्त श्रीराम मंदिर. या मंदिराच्या नावाची पाटी वेलींनी झाकली गेल्यामुळे हे मंदिर लवकर लक्षात येत नाही. हे मंदिर सुमारे १८३ वर्ष जुने आहे. या मंदिरात श्रीरामाची सिंहासनाधिष्टीत पंचायतन मूर्ती बघावयास मिळते. श्रीराम कार्याचा व स्थळांचा ऐतिहासिक अभ्यास केलेले कै. श्री अमरेंद्र गाडगीळ यांनी ही मूर्ती संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव असल्याचे सांगितले. प्राचीन ग्रंथांमध्ये रामरायाच्या अभिषेकाचे जे वर्णन आहे तशी हि मूर्ती आहे, म्हणून त्याला पट्टाभिषिक्त श्रीरामपंचायतन म्हटले जाते. सिंहासनावर बसलेले श्रीराम-सीता डावीकडे शत्रुघ्न व उजवीकडे लक्ष्मण व भरत आहेत. तसेच भालदार- चोपदार, नल-नील, जाम्बूवान, सुग्रीवादी आहेत. एकाच संगमरवरी दगडात हे सर्व कोरुन शिल्पकाराने ही किमया केली आहे. या मंदिरातील रामपंचायतन मूर्ती काही कारणामुळे काकिर्डे सराफांकडे गहाण म्हणून ठेवली होती. ती विकण्याचा मानस त्यांनी प्रकट करताच, श्री गणेशराम बाबा रहाळकर रा

श्री भाजीराम मंदिर, नारायण पेठ ( पुणे ) / Shree Bhajiram Mandir ( Pune )

श्री भाजीराम मंदिर नारायण पेठ - पुणे केळकर रोडवर असलेल्या केसरी वाड्यावरून अलका चौकाकडे जाताना नारायण पेठ पोलीस चौकीच्या समोर एक १००/१५० वर्षापूर्वीचे राम मंदिर लागते. श्री भाजीराम मंदिर या नावाने ते प्रसिद्ध आहे. हे पेशवेकालीन मंदिर अंदाजे इ.स. १७६१ / ६२ च्या दरम्यान बांधले गेले आहे. हे मंदिर तुळशीबाग राम मंदिराच्या समकालीन आहे. पूर्वी या ठिकाणी भाजी विकायला विक्रेते बसत असत, म्हणून त्या ठिकाणी असलेल्या मंदिराला भाजीराम मंदिर असे नाव पडले. पेशवेकालीन दफ्तरात या मंदिराचा उल्लेख आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून, पूर्वी या मंदिराचा गाभारा दगडी होता. सध्या बांधलेलं मंदिर हे नवीन आहे. मंदिरामध्ये लाकडी नक्षीदार देव्हाऱ्यामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या संगमरवरी मूर्ती दगडी चौथऱ्यावर उभ्या आहेत. मूर्तीच्या मागे छोटी नक्षीदार प्रभावळ आहे. श्री रामाच्या मूर्तीवर छोटेसे छत्र लटकवलेले आहे. त्या मूर्ती अंदाजे दोन ते अडीच फुटांच्या आहेत. मूर्तीच्या एका बाजूला शेंदुरचर्चीत गणपतीची लहान मूर्ती तर दुसऱ्या बाजूला संगमरवरी हनुमानाची छोटी मूर्ती आणि काळ्या पाषाणातली महादेवाची पिंड आणि नंद

जिलब्या मारुती, शुक्रवार पेठ - पुणे / Jilbya Maruti, Shukrawar Peth - Pune

जिलब्या मारुती शुक्रवार पेठ, पुणे शनिपारकडून मंडईकडे आपण जायला लागलो की वाटेत दिसते हे मारुती मंदिर. या भागात एक हलवायाचे दुकान होते. तो हलवाई नेहमी जिलब्यांचा हार मारुतीला अर्पण करायचा. त्यावरून येथील मारुतीला जिलब्या असे म्हणतात. गणेशोत्सवात आजही जिलब्यांचा नैवैद्य येथील गणपतीला दाखविला जातो. माहिती : ▪︎ नावामागे दडलंय काय ? ( सुप्रसाद पुराणिक ) Instagram : ▪︎ @punesehai ▪︎ @travelwala.chora

श्री भेकराई माता मंदिर, भेकराईनगर, हडपसर - पुणे / Shree Bhekrai Mata Mandir, Bhekrai Nagar, Hadapsar - Pune

श्री भेकराई माता मंदिर भेकराईनगर, हडपसर - पुणे येडाई, गांजाई, मळाई, फिरंगाई अशी देवीची नावे आपण सतत ऐकत असतो. पण ही नावे अशी का पडली किवा का प्रचलित झाली हे आपल्याला माहित नसते. अशाच प्रकारचे अजून एक नाव म्हणजे भेकराई. वाघजाई ह्या नावामध्ये "वाघ" शब्द येतो; म्हणून पडल्याचे आपण ऐकतो; तसेच भेकराई हे भेकर म्हणजे हरिण यावरून पडले असावे काय? भेकर हे सारंग कुळातील हरिण होय. हडपसरकडून सासवडकडे जाताना उजव्या बाजूस आधी तुकाई मातेचे मंदिर लागते. तेथून सासवडकडे जाऊ लागले, की बस डेपोच्या जवळच भेकराई देवीचे मंदिर आहे. हा परिसर भेकराईनगर म्हणूनच ओळखला जातो. ज्या टेकडीवर तुकाइचे मंदिर आहे, त्याच टेकडीवर भेकराईचेही मंदिर आहे. तुकाईच्या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात, तर भेकराईचे मंदिर तेवढ्या उंचीवर नसल्याने मंदिरापर्यंत थेट गाडीने जातात येते. हे मंदिर प्रशस्त आहे. येथे देवीची दोन हातांची दोन ते अडीच फूट उंच मूर्ती आहे. देवी उभी असून, उजव्या हाताखाली मानवाकृती आहे; परंतु मूर्तीचे स्वरूप व ती मानवाकृती कोणाची हे स्पष्ट होत नाही. देवीची मूर्ती शेंदूरलिप्त आहे. देवीच्या ड

श्री कृष्ण मंदिर, निगडी - पिंपरी-चिंचवड / Shree Krishna Temple, Nigdi, Pimpri-Chinchwad

श्री कृष्ण मंदिर, निगडी पिंपरी-चिंचवड - पुणे पिंपरी-चिंचवड परिसरात निगडी येथे श्रीकृष्णाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या भव्य मंदिराचे बांधकाम दाक्षिणात्य शैलीत केलेले आहे. या मंदिरात १९८७ मध्ये श्रीकृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. १९९३ मध्ये येथे भव्य मंदिर बांधण्यात आले. येथे भव्य ध्वजस्तंभ बांधलेला आहे. या मंदिराच्या आवारात नवग्रह, गणपती, अय्याप्पा, हनुमान, वैष्णवदेवी, सुब्रमण्यम, नागदेवता ही मंदिरे आहेत. सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांकरिता येथे मोठा सुसज्ज हॉल बांधण्यात आलेला आहे. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत येथे दहा पूजांचे आयोजन केले जाते. या मंदिराचा प्रसन्न परिसर भाविकांना मोहून टाकतो. या मंदिरातील दर्शनाची वेळ पहाटे ५ ते सकाळी ११.३० पर्यंत व संध्याकाळी ५ ते रात्री ८.४५ पर्यंत आहे. माहिती स्त्रोत : ▪︎ सफर ऐतिहासिक पुण्याची ( संभाजी भोसले ) Instagram : ▪︎ @punesehai ▪︎ @travelwala.chora 

श्री पुण्येश्वर मंडळ, कसबा पेठ - पुणे / Shree Punyeshwar Mandal, Kasba Peth - Pune

श्री पुण्येश्वर मंडळ कसबा पेठ, पुणे  कसबा पेठेत कुंभार वेशीजवळ पुण्येश्वर मंडळ आहे. त्या मंडळाच्या मूर्तीची खासियत म्हणजे ही मूर्ती हनुमानाच्या रूपात आहे. कारण येथे एक मारुतीचे मंदिर आहे. मारुती आपल्या हृदयात राम व सीता आहे हे दाखवत असलेली डाव्या सोंडेची, चतुर्भुज आणि उभी गणेशमूर्ती येथे आहे. खेडकर यांनी बनविलेली ही मूर्ती ३५ वर्षे जुनी आहे. सन्दर्भ : ▪︎ पुण्याचे सुखकर्ता ( स्वप्निल नहार, सुप्रसाद पुराणिक ) Instagram : ▪︎ @punesehai ▪︎ @travelwala.chora

सौ. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई श्री दत्त मंदिर, बुधवार पेठ - पुणे / Shrimati Lakshmibai Dagduseth Halwai Shree Datta Temple, Budhwar Peth - Pune

सौ. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई श्री दत्त मंदिर बुधवार पेठ, पुणे भक्तजनांचं केवळ गुरुवारीच नव्हे, तर दररोज गर्दी खेचणारं दत्तमंदिर म्हणजे बुधवार पेठेतील सौ. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई श्री दत्त मंदिर (संस्थान). त्याचं ऐश्वर्य काय वर्णावं ! हे दुमजली मंदिर अंतर्बाह्य सुंदर, श्रीमंत, किंबहुना देखणं आहे. रंगीबेरंगी सुगंधित फुलांनी सजवलेल्या तिथल्या नयनमनोहर दत्तमूर्तीपुढून हलू नये, असं भाविकांना वाटल्यास नवल नाही. कै. दगडूशेठ हलवाई आणि कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई हे सात्त्विक व धार्मिक प्रवृत्तीचे जोडपे होते. उत्तरप्रदेशातून ते पुण्यात येऊन स्थायिक झाले. पुण्यात ब्रिटिश काळात जी मोठी प्लेगची साथ आली होती, तेव्हा साथीमध्ये अनेक माणसे मृत्युमुखी पडली. दगडूशेठ हलवाईंच्या घरातीलही काही लोक दगावले. तेव्हा प्लेगने मृत्युमुखी पडलेल्यांना ब्रिटिश सरकारने नुकसानभरपाई दिली होती. श्रीमती लक्ष्मीबाईंनाही काही रक्कम मिळाली. ही रक्कम स्वतःसाठी न वापरता त्याचा विनियोग चांगला व्हावा यासाठी त्यांनी त्यांचे गुरू माधवनाथ महाराज (इंदूर) यांना सल्ला विचारला. महाराजांनी श्री गुरुदेव दत्

असे पडले वृत्तपत्राचे नाव "सकाळ"

असे पडले वृत्तपत्राचे नाव "सकाळ" सकाळ हे भारतातील पुणे शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र डॉ. नानासाहेब परुळेकर यांनी पुण्यात १ जानेवारी, १९३२ रोजी सुरू केले. दैनिक सकाळ पुणे शहरातील अव्वल क्रमांकाचे दैनिक आहे. या दैनिकाचे नाव सकाळ कसे पडले याची कहाणी रंजक आहे. नानासाहेब परुळेकर यांनी या वृत्तपत्राचे नाव काय असावे किंवा हे वृत्तपत्र लोकांपर्यंत कसे पोहोचेल, नवीन वृत्तपत्राची लोकांमध्ये उत्सुकता कशी निर्माण होईल याबाबत एक युक्ती लढविली. त्यांनी २० ऑक्टोबर, १९३१ रोजी केसरी, ज्ञानप्रकाश व काळ या वृत्तपत्रांमध्ये नव्या वृत्तपत्रासाठी नाव सुचवा ही जाहिरात प्रसिद्ध केली. दैनिकाला वाचकांनी नाव सुचवावे अशी स्पर्धा जाहीर करून त्यासाठी पहिल्या क्रमांकाला १५० रुपयांचे बक्षीस ठेवले तर दुसऱ्या क्रमांकालाही त्यांनी ५० रुपये बक्षीस जाहीर केले. सकाळच्या रौप्यमहोत्सवी अंकात स्वावलंबनाची कथा या लेखात परुळेकरांनी याविषयी लिहिले आहे, 'अमेरिकेतून शिकून आलेला हा गृहस्थ याला आपल्या पत्राचे नाव सुचत नाही मग हा लिहिणार काय? आणि पत्र चालविणार कस