Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

बैडमिंटन के इतिहास से पुणे का क्या नाता है ?

बैडमिंटन के इतिहास से पुणे का क्या नाता है ? बैडमिंटन की शुरुआत 19वीं सदी के मध्य में ब्रिटिश भारत में मानी जा सकती है, उस समय तैनात ब्रिटिश सैनिक अधिकारियों ने इसकी सुरुवात की थी। ब्रिटिश छावनी शहर पुणे  में यह खेल खासतौर पर लोकप्रिय रहा, इसीलिए इस खेल को पूनाई   के नाम से भी जाना जाता है। शुरू में, हवा या गीले मौसम में उच्च वर्ग के ऊन के गोले से खेलना पसंद करते थे, लेकिन अंततः शटलकॉक ने बाज़ी मार ली। इस खेल को सेवानिवृत्ति के बाद वापस लौटनेवाले अधिकारी इंग्लैंड ले गए, जहां इसे विकसित किया गया और नियम बनाये गए। सन् 1860 के आस-पास, लंदन के एक खिलौना व्यापारी इसहाक स्प्राट ने बैडमिंटन बैटलडोर- एक नया खेल नामक एक पुस्तिका प्रकाशित की, लेकिन दुर्भाग्य की बात है कि उसकी कोई प्रति नहीं बच पायी. नया खेल निश्चित रूप से सन् 1873 में ग्लूस्टरशायर स्थित ब्यूफोर्ट के ड्यूक के स्वामित्ववाले बैडमिंटन हाउस में शुरू किया गया था। उस समय तक, इसे "बैडमिंटन का खेल" नाम से जाना जाता था और बाद में इस खेल का आधिकारिक नाम बैडमिंटन बन गया। सन् 1887 तक, ब्रिटिश भारत में जार

लाडक्या गणपती बाप्पाला मोदक का आवडतो ?

लाडक्या गणपती बाप्पाला मोदक का आवडतो ? असं म्हणतात की हृदयाचा मार्ग उदराच्या रस्त्याने जातो. मग ते आपल्या आवडत्या व्यक्तीचं मन असो किंवा आपल्या आराध्य दैवताचं ! देवी देवतांच्या मांदियाळीत आहारप्रिय तुंदीलतनू देवता म्हणून श्रीगणेशाचं‌ रूप आपल्याला नेहमीच भावतं. आणि त्यासाठीच बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं. असा हा गणरायालाच नव्हे तर आबालवृद्धांना प्रिय "मोदक" नेमका कधीपासून अस्तित्वात आला, कसा प्रचलित झाला हे जाणून घेणंही तितकंच रोचक आहे. मोदकाच्या उत्पत्तीचे संदर्भ दोन काळात विभागावे लागतात. एक पुराण काळातला आणि दुसरा अलिकडच्या काळातला संदर्भ‌. दोन पुराण कथांमध्ये मोदकाचा उल्लेख आहे. त्यापैकी एक पद्मपुराणातली कथा असं सांगतं की, एकदा देवीदेवता अमृतापासून सिद्ध केलेला दिव्य मोदक देवी पार्वतीसाठी घेऊन आले. देवी पार्वतीचे दोन्ही पुत्र कार्तिकेय आणि गणेश दोघंही त्या मोदकास भुलले. दोघांनीही तो मोदक आपणास हवा असा हट्ट धरला. त्यावर देवी पार्वतीनं असा उपाय शोधला की जो धर्माचरणात श्रेष्ठ असेल त्याला या मोदकाची प्राप्ती होईल. त्यावर आपण ज

गणपतीला दुर्वा का आवडतो ?

गणपतीला दुर्वा का आवडतो ? अनलासुर नावाचा एक राक्षस होता. तो सर्व त्रैलोक्यालाच अतिशय त्रास देत असे. देवांना तर फारच छळीत असे. सर्व देव हैराण झाले आणि गणपतीला शरण गेले. गणपती हा महाकाय! वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ असे त्याचे वर्णन आपण करतोच. अशा महाकाय गणपतीने त्या अनलासुरला चक्क गिळूनच टाकले. पण अनल म्हणजे अग्नी. हा असुर एक प्रकारे अग्नीचेच रूप होता. त्याला गिळून टाकल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली आणि त्याचा गणपतीला खूप त्रास होऊ लागला. आपल्याला संकटमुक्त करण्यासाठी गणपतीने अनलासुराला गिळून टाकले आणि तो स्वतःच त्रासात सापडला, हे समजल्यानंतर देव, ऋषी, मुनी या सर्वाना त्यांना जमतील ते उपचार सुरु केले. कुठूनतरी गणपतीच्या अंगाचा दाह शांत व्हावा आणि त्याला थंड वाटावे म्हणून अनेक औषधी वनस्पतीचा उपयोग करणे सुरु झाले. वरुणाने थंडगार पाण्याची वृष्टी त्याचा अंगावर करण्यास प्रारंभ केला. नीलकंठ शंकराने आपल्या गळ्यातील नाग काढून त्याचा गळ्यात घातला. इंद्राने चंद्र त्याचा मस्तकावर ठेवला. परंतु कशाचाही उपयोग होईना. ब्रम्हदेवाने सिद्धी आणि बुद्धी या आपल्या दोन्ही कन्या त्य