Skip to main content

Posts

Showing posts from December, 2020

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

अमृतेश्वर मंदिर , रतनवाडी / Amruteshwar Temple , Ratanwadi

अमृतेश्वर मंदिर, रतनवाडी हेमाडपंती स्थापत्यशैलीचे पुरातन अमृतेश्वर मंदिर रतनवाडी गावात आहे. हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील एक शिवालय म्हणजे रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिर. मंदिराच्या गर्भगृहाला मागच्या बाजूला एक अर्धमंडप आहे. पुढे एक मंडप, अंतराळ व गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस तळखडा असून वर नक्षीकामाने सुशोभित असे चौरसाकृती खांब आहेत. या खांबांचा वरचा भाग अष्टकोनी असून त्यावर वर्तुळाकृती आहेत. अगदी वरती कीचकहस्त आहेत. मंडपाचे छत घुमटाकार असून त्यावर ठरावीक अंतर सोडून नर्तक व वादकांच्या तिरप्या प्रतिमा आहेत. मंदिराचे शिखर भूमिज प्रकारचे असून शिखरावर चारही बाजूंनी एक एक अशा चार वेली आहेत. या मंदिराला ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. 🍁 माहिती स्त्रोत : अन्तरजाल 🙏

सारसबाग , पुणे / Sarasbaug , Pune

सारसबाग , पुणे   शहरातल्या सर्वाधिक वर्दळीच्या परिसरात असूनही जिचे आकर्षण आजतागायत कायम आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाची पावले जिथे पडतात, ती म्हणजे सारसबाग. पुण्याच्या इतिहासप्रसिद्ध ठिकाणांमध्ये सारसबागेला पुण्याची शान म्हटल्यास नक्कीच ते वावगे ठरणार नाही. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी सन १७५० साली आंबील ओढयाच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम सुरू झाले. तलावाचे काम सन १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. तलावात सारस पक्षी सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग-बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्या नंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेला काव्यात्मक ' सारस बाग ' असे नाव ठेवले. श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श...

किर्तीमुख / Kirtimukh

" किर्तीमुख "   मंदिराच्या प्रवेश द्वाराच्या उंबऱ्यावर , देवतांच्या प्रभावळीवर , मंदिराच्या स्तंभावर , मंदिराच्या कळसावर , देवतांच्या अलंकारावर असे मोठे डोळे असलेले , शुळा सारखे दात असलेले , अक्राळ विक्राळ मुख असते त्याला कीर्ती मुख म्हणतात. कलाकाराच्या कल्पने प्रमाणे किर्तीमुखाचे रूप बदलत असते. किर्तीमुखाच्या दोन कथा प्रचलीत आहेत , व त्या थोड्या फार फरकाने सांगितल्या जातात. या दोन्ही कथा मध्ये दैत्याचे नाव व त्याचा हेतू बदलतो परंतु दोन्ही कथांमध्ये दैत्याच्या कृतीचा परिणाम एकाच आहे . पहिली कथा अशी की , एक दैत्य (बहुदा जलंदर ) तपस्या करून भगवान शिवाला प्रसन्न करतो , व खाण्या साठी मागतो , महादेव त्याला स्वतःला खायला सांगतात , त्याप्रमाणे तो स्वतःला खातो व शेवटी जेव्हा त्याचे मुख राहते तेव्हा शिवाच्या आज्ञे प्रमाणे थांबतो. प्रसन्न झालेले शिव त्याला मंदिराच्या उंबरठ्यावर स्थान देतात व मंदिरात येणाऱ्याचे पाप खाण्याचे सांगतात. दुसरी कथा अशी की, एकदा एक दैत्या (काही ठिकाणी योगी , यक्ष आहे) कडुन प्रमाद होतो व त्याला मारण्यासाठी भगवान शिव एक विशाल दैत्याला उत्...