भूत लेणी, मानमोडी डोंगर ( टेकडी ) - जुन्नर ( पुणे ) जुन्नर भागातील मानमोडी डोंगरात असणारा हा आणखी एक भूत लेणी समूह. अंबा-अंबिका लेणी समूह पाहून झाल्यावर डावीकडे एक पायवाट गर्द झाडीत जाते. सुमारे १५ मिनिटांत ही पायवाट आपल्याला भूत लेणी समुहाकडे घेऊन येते. लांबून दिसणारी शिल्पे, मोठी मधाची पोळी आणि मधमाशांच्या आवाज यांनी प्रथमदर्शनीच वातावरण गंभीर बनवते. भूत लेणी समूह हा १६ बौद्ध लेण्यांचा मिळून असलेला लेणी समूह आहे. लेणे क्र. ३७ - इथे बाहेर एक पोढी , पाण्याचे टाके आढळते, त्यावर एक ब्राम्ही लिपीतील शिलालेख आहे, त्याचा अर्थ, " कुमीय यांची कन्या सुलसा हिने या पाण्याच्या टाक्याचे धम्मदान दिले " असा आहे. लेणे क्र. ३८ - हा विहार असून, चौरस मंडप व दोन खोल्या आहेत. पुढे जमिनीत पाण्याची लहान टाकी कोरलेली आहेत. लेणे क्र. ३९ - हा ही विहार असून ३ स्तंभ व २ अर्धस्तंभ असून, ५ अपूर्ण खोल्या आहेत. समोर पाण्याचे लहान टाके आहे. लेणी क्र. ४० - खरंतर या लेणी समुहाकडे आल्यावर प्रथमदर्शनी आपले लक्ष वेधणारी ही प्रमुख लेणी, इथे चैत्यगृह आहे. समोर दर्शनी भाग ११ मीटर उंच आहे, तो...