कास पठार
पश्चिम घाटाची ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून ओळख असलेले कास पठार हे सातारा शहरापासून २५ किमी वर आहे. कास पठारावर जून ते ऑक्टोबर या कालावधीत फुले येतात. सतत बदलते हवामान आणि तापमान यांमुळे येथे फुलणारी फुले आकाराने लहान असतात. त्यांच्या पुनरुत्पादनाची शक्यता जास्तीत जास्त असावी, यासाठी फुलांमध्ये कोट्यवधी परागकणांची निर्मिती होत असते. त्यामुळे एका वेळेस एका जातीची अगणित फुले फुलतात आणि फुलांचा एकाच रंगाचा गालिचा पसरल्यासारखा दिसतो. कास पठारावर आठशेपेक्षा जास्त वनस्पती प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. त्यांपैकी ४७ प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेच्या (यूनेस्कोच्या) पथकाने ऑक्टोबर २०१० मध्ये कास पुष्प पठाराला भेट दिली होती. येथील अलौकिक जैवविविधता पाहून या परिसराला ‘जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा (World Natural Heritage Site) चा दर्जा बहाल करण्यात आला. या जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी वन खात्याने व निसर्गप्रेमी स्वयंसेवी संस्थांनी विविध उपाय योजले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कुंपण घालण्यात आले आहे.
काही फुलांची मराठी नावे :
फोटो २ - मिकी माऊस
फोटो ५ - आंबोलीमा
फोटो ६ - कुमुदिनी
फोटो ७ - निसुर्डी
फोटो ९ - हालूंदा
माहिती व सन्दर्भ - मराठी विश्वकोश संकेतस्थळ
Instagram - @TRAVELWALA.CHORA
Comments
Post a Comment