बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुंबई शहराचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांमार्फत चालविण्यात येत असे. १७९२ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने केलेल्या कायद्यानुसार शहराचा कारभार गव्हर्नरांच्या हाती सोपविण्यात आला. गव्हर्नरांनी शहराच्या व्यवस्थेकरिता सात सदस्यांची एक समिती नेमून म्युनिसिपल फंडाची स्थापना केली. १८५८ मध्ये नगरपालिकेच्या घटनेमध्ये सुधारणा करून तीन आयुक्तांची नेमणूक करण्यात आली. या आयुक्तांमध्ये दीनानाथ वेलकर हे एकमेव एतद्देशीय आयुक्त होते. नगरपालिकेच्या कार्यालयाकरिता गिरगाव रस्त्यावर एक इमारत भाड्याने घेण्यात आली. १८६५ मध्ये नगरपालिकेस स्वतंत्र दर्जा प्राप्त झाला. सरकारने मुंबई नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून ऑर्थर क्रॉफर्ड या मुलकी अधिकाऱ्याची नेमणूक करून दोनशे दंडाधिकाऱ्यांची नेमणूक केली. सुधारित घटनेनुसार आयुक्तांना अमर्याद अधिकार प्राप्त झाले. गिरगाव रोडवरील नगरपालिकेच्या कार्यालयाचे स्थलांतर फोर्टमध्ये रॅम्पार्ट रोच्या पश्चिम टोकावर, फोर्बेज स्ट्रीटजवळ असलेल्या ' व्हिदम हाऊस ' या इमारतीत करण्यात आले. आयुक्त क्रॉफर्...