टपाल पेटी - भारतात १७६६ साली लॉर्ड क्लाइव्हने फक्त सरकारी कामकाजाकरिता टपाल सेवा सुरू केली. आधुनिक टपाल सेवा आम जनतेसाठी १८३७ साली खुली करण्यात आली. १५८२ मध्ये पहिले टपाल तिकिट (पोस्टाचे तिकिट) कराची येथे जारी करण्यात आले, तथापि ते केवळ सिंध प्रांतापुरतेच मर्यादित होते. १८५४ मध्ये टपाल विभाग स्थापन करण्यात आला, त्या सुमारास देशात सु. ७०० टपाल कचेऱ्या (डाकघरे) कार्य करीत होत्या. १८८० साली धनप्रेष सेवा (मनीऑर्डर सेवा) चालू करण्यात आली. १८८२ हे वर्ष म्हणजे भारतीय टपाल कार्यालयाच्या कारकीर्दीतील अतिमहत्त्वाचे वर्ष मानले पाहिजे कारण त्या वर्षी डाकघर बचत बँकेने सबंध देशभर कार्य करण्यास प्रारंभ केला. १९८३ साली भारतीय टपाल व तार विभागाने डाकघर बचत बँकेची शताब्दी साजरी करण्यास प्रारंभ केला. रेल्वे-डाक-सेवा व हवाई-डाक-सेवा अनुक्रमे १९०७-१९११ साली सुरू झाल्या. तेव्हापासून आतापर्यंत टपालयंत्रणेत लक्षणीय प्रगती झाल्याचे आढळते. १९५१ ते १९८१ या अवधीत डाकघरे कार्यालयची संख्या चौपाटीने वाढली. सन्दर्भ : मराठी विश्वकोश Instagram - ©TRAVELWALA.CHORA