धनुर्धारी श्रीराम मंदिर, सदाशिव पेठ ( पुणे ) पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे आराध्यदैवत प्रभु रामचंद्र आहेत. रामचंद्राच्या कृपेनेच श्री. के. वि. लिमये यांनी दिलेल्या देणगीतून या मंदिराचा हेतू साध्य झाला व १९३४ मध्ये रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. मूर्ती धनुर्धारी, संगमरवरी आणि पश्चिमाभिमुख आहे. १५x१०x१५ फूट लांबी, रुंदी, उंचीचे मंदिर २६ फूट कळसासह बांधलेले आहे. त्या वेळी अंदाजे ३,२००/- रुपये खर्च आला. मंदिरासमोरील सभा मंडप ४४ x ३३ फूट लांबी-रुंदीचा असून, श्रीमती - राधाबाई कृष्णाजी भिडे यांनी आपले पति कृ.ना. भिडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिलेल्या देणगीतून १९४१ मध्ये बांधण्यात आला. मंदिरास प्रदक्षिणामार्ग आहे. या मूर्ती रामरक्षेतील 'तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ' या १७ व्या श्लोकाच्या आधारे पांडुरंग चिमाजी पाथरकर यांनी करून दिल्या. त्या वेळी १,०००/- रुपये खर्च आला. विद्यार्थ्यांच्या पुढे अशी विद्यार्थिदशेतील मूर्ती पाहिजे म्हणून विश्वामित्र ऋषींबरोबर यज्ञरक्षणासाठी निघालेल्या धनुर्धारी राम-लक्ष्मणाची मूर्ती स्थापन केली. मूर्ती पश्चिमाभिमुख असून,...