प्रश्न आहे पर्वतीवरील झोपडपट्टीचा पर्वतीचं सौंदर्य आणि आरोग्यपूर्ण वातावरण बिघडवण्यास कारणीभूत ठरलेली झोपडपट्टी हटविण्यासाठी काही वर्षांपूर्वी त्या झोपड्यांच्या स्थलांतरासाठी बिबवेवाडीत नवी घरं उभारण्याची योजना आखली गेली. पुढे ही नवी घरकुलं उभी राहिली. पण पर्वतीवरील झोपड्या तशाच राहिल्या. अशा झोपडपट्ट्या म्हणजे निवडणुकीतील मतपेट्याच ठरतात, असा लोकप्रतिनिधींचा समज असल्यामुळे हे झोपडपट्यारूपी गलिच्छ वस्तीचं गालबोट दूर होऊ शकले नाही. आता तर ही वस्ती वाढतेच आहे. इतरही अनेक टेकड्यांवर त्याची कागद काच लागण झाली आहे. पर्वतीच्या उतारावरील कबुतरांच्या ढाबळी, पत्रा-पुठ्ठा-भंगार गोळा करणाऱ्यांची गोदामं यांनीही अधूनमधून बस्तान मांडण्याचा शिरस्ता ठेवला आहे. वनीकरण झालेल्या भागातील झाडांची चोरटी तोड, पर्वतीवर नेणाऱ्या प्रशस्त पायऱ्यांच्या दुतर्फा असलेले लोखंडी कठडे चोरीला जाणे अशा गोष्टी वारंवार घडताना दिसतात. पर्वतीचे डोंगरउतार श्रीदेवदेवेश्वर संस्थानच्या मालकीचे नाहीत. सरकारी वा खाजगी डोंगरउतारावर वसलेल्या नि वाढत जाणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या निर्मूलनासाठी ते कायदेशीर कार्यवाही करू शकत ना