Skip to main content

प्रश्न आहे पर्वतीवरील झोपडपट्टीचा


प्रश्न आहे पर्वतीवरील झोपडपट्टीचा
पर्वतीचं सौंदर्य आणि आरोग्यपूर्ण वातावरण बिघडवण्यास कारणीभूत ठरलेली झोपडपट्टी हटविण्यासाठी काही वर्षांपूर्वी त्या झोपड्यांच्या स्थलांतरासाठी बिबवेवाडीत नवी घरं उभारण्याची योजना आखली गेली. पुढे ही नवी घरकुलं उभी राहिली. पण पर्वतीवरील झोपड्या तशाच राहिल्या. अशा झोपडपट्ट्या म्हणजे निवडणुकीतील मतपेट्याच ठरतात, असा लोकप्रतिनिधींचा समज असल्यामुळे हे झोपडपट्यारूपी गलिच्छ वस्तीचं गालबोट दूर होऊ शकले नाही. आता तर ही वस्ती वाढतेच आहे. इतरही अनेक टेकड्यांवर त्याची कागद काच लागण झाली आहे. पर्वतीच्या उतारावरील कबुतरांच्या ढाबळी, पत्रा-पुठ्ठा-भंगार गोळा करणाऱ्यांची गोदामं यांनीही अधूनमधून बस्तान मांडण्याचा शिरस्ता ठेवला आहे.

वनीकरण झालेल्या भागातील झाडांची चोरटी तोड, पर्वतीवर नेणाऱ्या प्रशस्त पायऱ्यांच्या दुतर्फा असलेले लोखंडी कठडे चोरीला जाणे अशा गोष्टी वारंवार घडताना दिसतात. पर्वतीचे डोंगरउतार श्रीदेवदेवेश्वर संस्थानच्या मालकीचे नाहीत. सरकारी वा खाजगी डोंगरउतारावर वसलेल्या नि वाढत जाणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या निर्मूलनासाठी ते कायदेशीर कार्यवाही करू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आता यातील काही झोपड्यांचं रूपांतर पक्क्या घरांमध्ये होऊ लागले आहे. झोपडपट्टी निर्मूलन ही काळाची गरज आहे. या सामाजिक दोषाच्या हकालपट्टीसाठी ठोस राजकीय निर्णयाची आणि राजकीय मतैक्याची गरज आहे, हे नक्की. तेथे वास्तव्यास असणाऱ्यांचे योग्य तऱ्हेने पुनर्वसन केले गेले, तर पर्वती टेकडी सुरंगी, सुपुष्पी, सुदर्शन व्हायला वेळ लागणार नाही. अशा दाट झाडीयुक्त उतारांच्या पर्वतीची सध्या आपण कल्पनाच करायची.



Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...