सातारा ऎतिहासिक संदर्भ : सातारा मराठा साम्राज्याची राज्याची राजधानी होती. त्याचा विस्तार सुमारे १४ लक्ष कि.मी. इतका होता. या भुमीला सांस्कृतीक वारसा लाभलेला आहे. जिल्हयातील कित्येक थोर योध्दे, राजे, संत आणि थोर व्यक्तिमत्वांनी महाराष्ट्राचा इतिहास घडवला आहे. ई.स. पूर्व २०० मधील प्राप्त कोरीव लेखानुसार सातारा जिल्ह्यातील सर्वात जुने ठिकाण म्हणून कराड (पूर्वी क-हाकड) प्रसिद्ध होते. व पांडवांनी जिथे १३ वर्षांचा वनवास भोगला त्या वाई तालुक्याला ‘विराटनगरी’ म्हणून संबोधले जायचे. दक्षिणात्य मौर्य साम्राज्याच्या काळात दोन दशकापर्यंत (ख्रिस्ती वर्ष ५५०-७५०) ‘सातवाहनांचे ‘ राज्य होते. हा जिल्हा दक्षिण महाराष्ट्राचाच एक भाग असून आतापर्यंत बदामीचे ‘चालुक्य‘ , ’राष्ट्रकुट‘, ’शिलाहार‘, देवगिरीचे यादव , ’बहामनी‘ व ‘आदिल शहा‘, (मुस्लिम राज्यकर्ते), ’शिवाजी महाराज‘ (मराठी राज्यकर्ते ), ‘शाहू महाराज ‘, आणि ‘शाहू-२ प्रतापसिंह‘ यांनी राज्य केले. मुस्लिम राज्यकर्त्यांनी ई.स. १२९६ मध्ये प्रथम जिल्हयावर आक्रमण केले. सन १७०७ पर्यंत मुस्लिमांचे अधिपत्य होते. सन १६३६ साली निजामशाहीचा ...