Skip to main content

सातारा इतिहास / History Of Satara


सातारा

ऎतिहासिक संदर्भ :

सातारा मराठा साम्राज्याची राज्‍याची राजधानी होती. त्‍याचा विस्‍तार सुमारे १४ लक्ष कि.मी. इतका होता. या भुमीला सांस्‍कृतीक वारसा लाभलेला आहे. जिल्‍हयातील कित्‍येक थोर योध्‍दे, राजे, संत आणि थोर व्‍यक्तिमत्‍वांनी महाराष्‍ट्राचा इतिहास घडवला आहे.

ई.स. पूर्व २०० मधील प्राप्त कोरीव लेखानुसार सातारा जिल्ह्यातील सर्वात जुने ठिकाण म्हणून कराड (पूर्वी क-हाकड) प्रसिद्ध होते. व पांडवांनी जिथे १३ वर्षांचा वनवास भोगला त्या वाई तालुक्याला ‘विराटनगरी’ म्हणून संबोधले जायचे. दक्षिणात्य मौर्य साम्राज्याच्या काळात दोन दशकापर्यंत (ख्रिस्ती वर्ष ५५०-७५०) ‘सातवाहनांचे ‘ राज्य होते. हा जिल्हा दक्षिण महाराष्ट्राचाच एक भाग असून आतापर्यंत बदामीचे ‘चालुक्य‘ , ’राष्ट्रकुट‘, ’शिलाहार‘, देवगिरीचे यादव , ’बहामनी‘ व ‘आदिल शहा‘, (मुस्लिम राज्यकर्ते), ’शिवाजी महाराज‘ (मराठी राज्यकर्ते ), ‘शाहू महाराज ‘, आणि ‘शाहू-२ प्रतापसिंह‘ यांनी राज्य केले.

मुस्लिम राज्‍यकर्त्‍यांनी ई.स. १२९६ मध्‍ये प्रथम जिल्‍हयावर आक्रमण केले. सन १७०७ पर्यंत मुस्लिमांचे अधिपत्‍य होते. सन १६३६ साली निजामशाहीचा अस्‍त झाला.

मराठयांचा राज्‍यातील सुवर्णकाळ : छत्रपती शिवाजी महाराज

शहाजी राजांचा मुलगा व मराठा राज्‍याचे संस्‍थापक शिवाजीराजे यांनी आपली सत्‍ता उत्‍तर पुण्‍याच्‍या डोंगराळ भागांत पुणे आणि सुपा येथे ‍स्थापन करण्‍यास सुरुवात केली. त्‍यापुर्वी तिथे त्यांचे वडील शहाजीराजे यांची सुभेदारी होती.

शिवाजी महाराजांच्‍या सत्‍तेच्‍या काळातील सर्वात मोठया घडामोडी या पुणे आणि सातारा या परिक्षेत्रातच विशेषकरुन सहयाद्रींच्‍या पर्वत रांगांभोवतीच घडल्‍या. जिल्‍हयाचा पश्चिमेकडील भुभाग पुर्णतः घनदाट जंगले, उंच टेकडयांनी व्‍यापलेला असल्‍या कारणाने शिवाजी महाराजांनी तिथे सुमारे २५ किल्‍ले स्‍थापन केले. त्‍यांनी संपुर्ण आयुष्‍यभर आदिल शहा व मुघलांशी लढा दिला.‍ शिवाजी महाराज यांच्‍या या वाढत्‍या पराक्रमामुळे आदिल शहाने विजापुरचा महाकाय सरदार अफझल खानास धाडले. त्‍यावेळी त्‍याच्‍या बरोबर अफाट सैन्‍य होते. तो लोकांना छळत व पंढरपुर व तुळजापुरातील मंदीरांची नासधुस करीत आला. त्‍याचा ऐतिहासिक पराभव व शेवट उंच विशाल आणि घनदाट जंगलांनी वेढलेल्‍या प्रतापगडावर (पुर्वी भोरप्‍याचा डोंगर) झाला.

सन १६६३ मध्‍ये शिवाजी महाराजांनी परळी आणि सातारा असे दोन किल्‍ले मिळवले. त्‍यांनी त्‍यांचे गुरु श्री समर्थ रामदास स्‍वामी यांना परळीच्‍या किल्‍ल्‍यावर रहाण्‍याची विनंती केली होती. कालांतराने त्‍या किल्‍ल्‍याचे नामकरण सज्‍ज्‍नगड असे झाले. सातारा शहरापासुन १२ किमी च्‍या अंतरावर सज्‍ज्‍नगड हा किल्‍ला आहे. सातारा शहर हे अजिंक्‍यतारा किल्‍ल्‍याच्‍या पायथ्याशीवसलेले आहे. शिवाजी महाराजांच्‍या मृत्‍युनंतर औरंगजेबाने अजिंक्‍यतारा हा किल्‍ला मिळवला. कालांतराने परशुराम प्रतिनिधी यांनी सन १७०६ मध्‍ये तो पुन्‍हा मिळवला. सन १७०८ मध्‍ये शाहु महाराजांनी या किल्‍ल्‍यावर पुन्हा ताबा मिळवला.

सौजन्य : महाराष्ट्र शासन संकेतस्थळ


Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...