श्री तुळशीबाग गणपती ( मनाचा चौथा गणपती ) बुधवार पेठ - पुणे पुण्यात बुधवार पेठेत तुळशीबागेतील पेशवेकालीन श्रीरामाचे प्रसिद्ध मंदिर हे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. अनेक वर्षांपासून तुळशीबाग ही महिलांच्या आकर्षणाचे केंद्र असलेली बाजारपेठ. फक्त पुणेकरांमध्येच नव्हे, तर पुण्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये तुळशीबागेची क्रेझ असते. येथील तुळशीबाग मंडळाचा गणपती म्हणजे पुण्यातील हा मानाचा चौथा गणपती. तुळशीबागेतल्या मोक्याच्या आणि गर्दीच्या भागात हा गणपती बसतो. १३ फूट उंचीची भव्य गणेशमूर्ती हे मंडळाचे आकर्षण आहे. १९०१ मध्ये मंडळाची स्थापना केली आहे. तुळशीबागेचा गणपती चार हातांचा असून डाव्या सोंडेचा आहे. वरील दोन हातात पाश, अंकुश असून खालील डाव्या हातात मोदक तर उजवा हात अभयमुद्रेत आहे. मंडळ गणेशोत्सवात आकर्षक सजावट करते. या भव्य गणपतीच्या पिछाडीस एक छोटा पेशवेकालीन गणपती पहायला मिळतो. स्वातंत्र्यपूर्व काळात गणेशोत्सवात पोवाडे, मेळे असे कार्यक्रम गणेशोत्सवात आयोजित केले जात. अनेक मान्यवर लोकांची भाषणे, लोकनाट्येदेखील होत असत. थोर शास्त्रीय गायकांचे गायनदेखील येथे झाले आहे. तुळशीबाग गणेशोत्स