सहस्त्रबुद्धे दत्त मंदिर, सदाशिव पेठ - पुणे
श्री उपाशी विठोबा मंदिरावरून चिमण्या गणपती चौकाकडे जाताना गोडबोले हॉस्पिटलसमोर उजव्या हाताला एक सुंदर लाकडी प्रवेशद्वार दिसते. ते म्हणजे सहस्त्रबुद्धे यांच्या वाड्याचा प्रवेशद्वार.
कै. डॉ. स. शि. सहस्त्रबुद्धे यांनी इ. स. १८९७ मध्ये या वाड्यात एक दत्तमंदिर बांधले. वाड्यातून आत गेल्यावर दगडी चबुतऱ्यावरील दोन लाकडी खांबांमधून श्री दत्ताची मूर्ती अंगणातून दिसते. या मंदिरातला देव्हारा हा पितळ्याचा आहे. दत्त मूर्तीच्या उजव्या हातात डोक्याच्यावर जाणार त्रिशूल आहे. सोबत, बाकीच्या हातात वेद, शंख आणि कमंडल आहे. या मूर्तीचे वेगळेपण म्हणजे या दत्त मूर्तीला मिशा, दाढ़ी आणि पगडी आहेत. देवळापुढे अंगणात एक छोटासा हौद आहे. लहान मुलांनी पडू नये म्हणून त्यावर लोखंडी जाळी लावलेली आहे. हौद जवळ ( खालच्या बाजूला ) एक दगडी कासव सुद्धा आहे.
सहस्त्रबुद्धे यांचे वंशज या मंदिराची व्यवस्था पाहतात. मंदिराचा परिसर भर वस्तीत असून सुद्धा शांत आणि रमणीय आहे. हे मंदिर खाजगी आहे.
सन्दर्भ:
१. पुणे शहरातील मंदिरे ( डॉ. शां. ग. महाजन )
२. असं होते पुणे ( म. श्री. दीक्षित)
Instagram: @TRAVELWALA.CHORA
Comments
Post a Comment