दिवे घाटातील विठ्ठलाची साठ फुटी भव्य मूर्ती वारकरी आणि पुणेकरांसाठी भक्तिमय आकर्षण आहे. विजय कोल्हापुरे आणि बाबासाहेब कोल्हापुरे या वारकरी बंधूंच्या राजराजेश्र्वर सेवाभावी संस्थेतर्फे ही मूर्ती उभारण्यात आली. मूर्तिकार सागर भावसार यांनी ही मूर्ती साकारली असून यामध्ये सिमेंटसह काही धातुंचाही वापर करण्यात आला आहे. मूर्तीचे मुख्य आकर्षण असलेल्या टीळयाला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. ही भव्य मुर्ती बनवण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला. घाटाच्या माथ्यावर असल्यामुळे अनेक प्रवाशांचा प्रवास सुखद करणारी ही मूर्ती हक्काच्या वारकऱ्यांची आतुरतेने वाट पाहत असते.
“दिवेघाट चढून आल्यावर विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांचा आणि भक्तांचा थकवा दूर व्हावा एवढीच माझी इच्छा होती. विठूरायाकडे मी दुसरं काहीच मागत नाही. ही मुर्ती घडवण्याचं काम गेली दोन वर्ष सुरु होतं,” असं विजय कोल्हापूरकर यांनी सांगितलं आहे.

Comments
Post a Comment