संकष्टी चतुर्थी संकष्ट चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यांत दुसर्या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी " संकष्टी चतुर्थी " असते. हा श्रीगणपतीच्या उपासनेचा दिवस आहे. दिवसभर उपोषण करुन, रात्रौ चंद्रोदयाच्या वेळी श्रीगणपतीची पूजा करुन, चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावयाचे. अशी या व्रताची थोड्क्यांत पाळ्णूक आहे. " श्रीसंकष्टहरगणपती " हे या व्रताच्या देवतेचे नांव आहे, हे व्रत करणार्या स्त्री अगर पुरुषाने, व्रताला सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावी. सतत २१ संकष्ट्या करुन व्रताचे उद्यापन करावे. काहीजण इच्छा पूर्ण होईपर्यंत तर बहुतेकजण सततच संकष्टीचा उपवास करतात. एकदां गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हासला. तें पाहून गणपतीला चंद्राचा फ़ार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की " आजपासून तुझें कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल ! " शेवटी चंद्राने मोठे तप करुन श्रीगणपतीला प्रसन्न करुन घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण ...