श्रीकार्तिकस्वामी मंदिर , पर्वती
अटकेपार मराठी झेंडे नेणाऱ्या राघो भरारी म्हणजे राघोबादादा यांनी पर्वतीवर कार्तिकेयाचे मंदिर उभारले. परमप्रतापी बाजीराव पेशव्यांचे ते धाकटे चिरंजीव आणि पुण्याचे मोठ्या शहरात रूपांतर करणाऱ्या नानासाहेब पेशव्यांचे ते धाकटे बंधू. राघोबादादांचा कल थोडासा तंत्रमार्गाकडे होता. त्यांची दैनंदिन आचरणातील स्नानसंध्या - पूजाअर्चा - जपजाप्य , तांडव गणेशाची उपासना , विविध अनुष्ठाने पाहता , त्यांनी शिवपुत्र षडानन म्हणजे स्कंद किंवा कार्तिकेयाची मूर्ती स्वतंत्र देवालयात स्थापन केली.
महाराष्ट्रात कार्तिकेयाची स्वतंत्र देवालये फारशी नाहीत. आपण जरी कार्तिकेयाला ब्रह्मचारी ( आणि स्त्रीद्वेष्टा ) समजत असलो आणि महाराष्ट्रात स्त्रियांनी कार्तिकेयाचं दर्शन न घेण्याची प्रथा असली , तरी दक्षिण हिंदुस्तानात सुब्रह्मण्यम किंवा मुरूगन म्हणून याच कार्तिकेयाच्या असंख्य मूर्ती व उपदेवालये किंवा देवळे आहेत. त्या षडाननाची उपासना , पूजा , दर्शन तेथील स्त्रिया नेहमी करत असतात. पर्वतीवरच ह्या कार्तिकेय मंदिराची उभारणी राघोबादादांनी करावी , हे मात्र त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांच्या मनास आले नव्हते. कारण तेथील शिव व विष्णू यांच्या मंदिरांना जे महत्त्व प्राप्त झाले , ते कार्तिकेय मंदिराला मिळणार नाही. पर्वतीऐवजी अन्यत्र असे देऊळ बांधले गेले असते , तर राघोबांचे नावही झाले असते व त्याचे महत्त्वही वाढले असते , असे मत आनंदीबाईंनी मांडले होते. ' स्वामी ( राघोबादादा ) कार्तिकाची मूर्ती दुसरे जागा पर्वतावर बांधते , तर नाव होते ; नावाची गोष्ट तेव्हाच कळली असती ; तर करते- ( आनंदीबाईची दिनचर्या ) या संदर्भात पेशवा दप्तर , खंड ४ पृष्ठ ६७ व ८३ येथे संदर्भ मिळतात. या देवळाचा उपशिखरांसह असणारा उंच कळस लांबूनही लक्ष वेधून घेतो.
या मंदिरात राघोबादादांनी बसवलेली कार्तिकेयाची मूर्ती १७५१-५२ मधील निजामाच्या स्वारीचे वेळी भग्न झाली. त्या मूर्तीच्या जागी पुढे माधवराव पेशव्यांनी १४ मार्च १७६६ रोजी नवी मूर्ती बसवली. दुर्दैवाने त्या मूर्तीलाही १७६७ मध्ये तडा गेला आणि नवीन मूर्ती बसवावी लागली. १७ ९ १ मध्ये या देवळावर वीज पडली. हा अपशकून मानून पुन्हा नवीन मूर्ती घडवली गेली. १८२० मध्ये इंग्लिशांच्या अमदानीत श्री. माधवराव जयराम सदावतें या संस्थानच्या व्यवस्थापकातर्फे नवीन मूर्ती स्थापन केली गेली. १८५७ मध्ये देवाच्या डोक्यावरील मुकुट पडून मूर्तीचा उजवा हात भंगला. म्हणून २८ जून १८६ ९ रोजी परत नव्या मूर्तीची स्थापना केली गेली. ती जुनी भग्न मूर्ती दुरुस्त करून पर्वतीवरील पेशवा संग्रहालयात ठेवली आहे. परंतु त्यापूर्वीच्या सर्व मूर्ती नेमक्या कशा होत्या ? याची चित्रे - वर्णने - प्रकाशचित्रे उपलब्ध नाहीत. सध्या पर्वतीवर असलेली चतुर्भुज , षडमुखी कार्तिकेयाची मयूरारूढ़ मूर्ती काळ्या पाषाणाची असून तिची स्थापना २८ जून १८६ ९ रोजी केली गेली. त्याआधी याच मंदिरात वेगवेगळ्या कारणांमुळे ५ वेळा मूर्ती बदलावी लागली होती. सध्या ही सहावी मूर्ती देवालयात विराजमान झाली आहे.
मूर्ती - वर्णन
कार्तिकेयाच्या मूर्ती काळ्या पाषाणातील , खालील दगडी पीठ / चौथरा बहु - कोनाकृती असून तो पुढील बाजूला मात्र , सपाट आहे. त्यावर समोरील बाजूस तोंड असणाऱ्या मोरावर स्वार झालेली षडाननाची चतुर्भुज मूर्ती दिसते. मूर्तीच्या मागे कलाकुसरयुक्त पितळी मखर / प्रभावळ दिसते. कार्तिकेयाची दोन मुखे समोर , डावी - उजवीकडे एकेक आणि मागील बाजूस दोन अशी मुखे आहेत. त्या सहाही शिरांवर मिळून अंगचाच एक मुकुट कोरलेला आहे. कार्तिकस्वामींचे दोन्ही पाय मयूराच्या दोन बाजूंना आलेले स्पष्ट दिसतात. दक्षिणाक्रमाने कार्तिकेयाच्या हातांमध्ये उजवीकडील खालच्या हातात ( धनुष्य असावे ) सध्या तरी कोणतेही आयुध नाही. ती वरदमुद्रा वाटते . वरच्या हातात तलवार ... . तर डावीकडील वरच्या हातात नाग ... खालच्या हातात बाण अशी आयुधे धारण केलेली दिसतात. मूर्तीला अंगचे दागिने नाहीत. मात्र वाहन असणाऱ्या मोराच्या चोचीत मोत्यांची माळ कोरलेली आहे. या देवालयात महिलांना दर्शनबंदीचा नियम नाही. श्रद्धेमुळे स्त्रियांनी श्रीकार्तिकेयाचे दर्शन घ्यावे की न घ्यावे ? याचा निर्णय ज्याने त्याने आपापल्या पुरता करावा. याचेच अनुकरण सर्वत्र होणे गरजेचे आहे. कार्तिकी पौर्णिमेला या मूर्तीला मोराचे पीस वाहण्याचा नवा प्रघात रूढ होऊ पाहतो आहे. त्याची कोणतीही गरज नाही.
सन्दर्भ :
- पुण्याची पर्वती ( प्र. के. घाणेकर )

Comments
Post a Comment