नॅशनल वॉर मेमोरियल सदर्न कमांड म्हणजेच राष्ट्रीय युद्ध स्मारक, हे पुणे शहरातील घोरपडी येथील एक युद्ध स्मारक आहे, जे स्वातंत्र्योत्तर युद्धातील शहीदांना समर्पित आहे. हे दक्षिण आशियातील एकमेव युद्ध स्मारक आहे जे नागरिकांच्या योगदानातून उभारले गेले आहे. १५ ऑगस्ट १९९८ रोजी स्मारकाचे अनावरण करण्यात आले आणि राष्ट्राला ते समर्पित करण्यात आले.
भारतीय सैन्याच्या अनेक कामगिरी जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या सर्वांसाठी हे खुले संग्रहालय आहे. स्मारकात मुख्य स्मृतिस्थळ; तसेच १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचे जप्त केलेले रणगाडे प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. कालांतराने या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देणारे चित्रप्रदर्शनही नागरिकांसाठी तयार करण्यात आले. तसेच भारत-पाक युद्ध, गोवा मुक्ती संग्राम, भारत-चीन युद्ध, ऑपरेशन पवन; तसेच कारगिल युद्धात दक्षिण मुख्यालयाने राबवलेल्या मोहिमांची माहिती देण्यात आली आहे. परमवीर चक्र विजेत्या २१ वीरांचे अर्धपुतळे बसविण्यात आले असून, त्यांच्या शौर्याची माहिती देणारे शिलालेख लावण्यात आले आहे. ज्या शूरवीरांनी युद्धाच्या काळात राष्ट्राचे रक्षण करण्यास मदत केली आहे, त्यांची पण तिथे माहिती दिलेली आहे. या संग्रहालयाची देखरेख सैनिकांद्वारे केली जाते.
राष्ट्रीय युद्ध स्मारकामुळे पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांचे जीवनचरित्र उलगडावे यासाठी या स्मारकात अनेक बदल करण्यात आले. स्मारक म्हणजे केवळ पुण्यासाठीच नाही; तर राज्यासह संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. हे स्मारक म्हणजे केवळ पुण्यासाठीच नाही; तर राज्यासह संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे.
माहिती आभार :
discovermh संकेतस्थळ
Comments
Post a Comment