Skip to main content

Posts

Showing posts from April, 2023

बटाट्या मारुती मंदिर, शनिवार पेठ - पुणे / Batatya Maruti Mandir, Shaniwar Peth - Pune

बटाट्या मारुती मंदिर, शनिवार पेठ - पुणे सुमारे १०००/१२०० वर्षापूर्वी सध्या जिथे पुणे वसलेले आहे तिथे एक लहानशी वाडी होती. त्यात मारुती, बहिरोबा (रोकडोबा), पुण्येश्वर आणि नारायणेश्वर अशी देवळे होती. त्या मारुतीला एक छोटी घुमटी होती. कालौघात पुण्याचा विस्तार वाढला. पुण्याची वस्ती वाढू लागली. पेशव्यांनी शनिवार वाडा बांधला. ती मारुतीची छोटी घुमटी शनिवारवाड्यासमोर आली. ती कसबा पेठेची पश्चिमेची आणि शनिवार पेठेची पूर्वेची हद्द समजली जायची. शनिवार वाडा ते या घुमटीपर्यंतची जागा मोकळी होती. मंडई बांधण्यापूर्वी शनिवार वाड्यासमोरच्या पटांगणात भाजी बाजार भरत असे. त्या बाजारात असलेल्या मारुती मंदिराजवळ बटाटे विकणारे बसत असत. म्हणून या मारुतीला बटाट्या मारुती असे नाव पडले. पण त्या नावाला कागदोपत्री काही पुरावा नाही. तसेच त्या मारुतीचे जुने नावही सापडत नाही. सध्या असलेले मंदिर शिवाजी पुलाचे बांधकाम ज्यांनी केले त्या रावबहाद्दूर गणपत महादेव केंजळे यांनी केले. या मारुतीचे वैशिष्ट्य असे की तो बसलेला आहे. अशी मारुती मूर्ती दुर्मिळ असते. मारुतीच्या एका हातात गदा आहे तर दुसरा हात गुढघ्यावर ठेवले

श्री पार्वतीनंदन गणपती ( खिंडीतला गणपती ), चतुःश्रुंगी - पुणे / Shree Parvati Nandan Ganpati ( Khinditala Ganapti ), Chattushringi - Pune

श्री पार्वतीनंदन गणपती ( खिंडीतला गणपती ),  चतुःश्रुंगी  - पुणे गणेशखिंडीत ' पार्वतीनंदन गणपती ' किंवा ' खिंडीतला गणपती ' हे एक प्राचीन देवस्थान आहे. गणपती खिंडीत असल्याने कदाचित त्याला खिंडीतील गणपती असे नाव पडले असावे. सेनापती बापट रस्ता विद्यापीठ रस्त्याला ( गणेशखिंड रस्ता ) जेथे मिळतो तेथे हे मंदिर आहे. मंदिरास दगडी गाभारा, दगडी मंडप व लाकडी सभामंडप आहे. मंदिरात दीपमाळा देखील आहेत. मंदिराचा कळस वैशिष्ट्यपूर्ण असून त्यात २०-२५ माणसे मावतील एवढी जागा आहे. शेंदूरचर्चित डाव्या सोंडेची चतुर्भुज मोठी गणेशमूर्ती येथे आहे. सुमारे ४०० वर्षांपासून गणपती अस्तित्वात होता असे म्हटले जाते. या मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. मातोश्री जिजाबाई पाषाणला असलेल्या सोमेश्वर मंदिरात जात असताना इथे विसावल्या होत्या. तेव्हा येथील एका ठकार नावाच्या ब्राह्मणास दृष्टांत झाला की कसब्यात मी ओढ्याच्या काठी शमी वृक्षाखाली आहे. उत्खनन करून तेथे गजाननाचा स्वयंभू तांदळा मिळाला. राजमाता जिजाऊ यांनी तेथे मंदिर बांधले. ते मंदिर म्हणजेच ग्रामदेव कसबा गणपती मंदिर. या मं

श्री केसरीवाडा गणपती, नारायण पेठ - पुणे / Shree Kesariwada Ganpati, Narayan Peth - Pune

श्री केसरीवाडा गणपती, नारायण पेठ - पुणे ( मनाचा पाचवा गणपती ) इ.स. १८९४ साली स्थापन झालेल्या केसरीवाडा गणपतीस थेट लोकमान्य टिळकांचा वारसा लाभला आहे. १९०५ साली नारायण पेठेतील श्रीमंत सरदार गायकवाड वाड्यात म्हणजेच नंतरच्या केसरी वाड्यात ( टिळक वाड्यात ) हा उत्सव साजरा होऊ लागला. तत्पूर्वी तो सदाशिव पेठेतील विंचूरकर वाड्यात साजरा होत असे. हा गणपती आधी गायकवाड वाड्याचा गणपती म्हणून ओळखला जात असे. मंडळाने शतकोत्तर रौप्यमहोत्सव ( १२५ वर्षे ) साजरा केला आहे. उत्सवी गणपतीची मूर्ती अत्यंत सुबक, रेखीव आणि सुंदर असते. गेली अनेक दशके मूर्तीच्या स्वरूपात बदल झालेला नाही. शनिवार पेठेतले मूर्तिकार गोखले हे श्रींची मूर्ती साकारतात. उत्सवमूर्तीच्या मागे एक थोडी मोठी अलीकडील सहा हातांची चांदीची मूर्ती करण्यात आली. हा श्री गणेश महावैष्णव ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील वर्णनानुसार साकारलेली आहे. त्यामागे लोकमान्यांचा पूर्णाकृती पुतळा बघायला मिळतो. केसरी वाड्यात केसरी वृत्तपत्राचे कार्यालय आहे. गणेशोत्सवादरम्यान अनेक दिग्गजांची येथे व्याख्याने झाली आहेत. लोकमान्य टिळकांनी एकदा 'द

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, सारसबाग - पुणे / Shree Siddhivinayak Ganpati Mandir, Sarasbaug - Pune

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, सारसबाग - पुणे पुणे शहर, पेशवे, आणि श्रीगणेश यांचे एकमेकांशी खूप जवळचे नाते आहे. नानासाहेब पेशवे म्हणजे पुणे शहराचे शिल्पकार. त्यांनी वाढत्या पुणे शहराची नियोजनबद्ध वाढ व्हावी, अडचणी दूर व्हाव्यात म्हणून भरपूर मेहनत घेतली. त्यांनी इ.स. १७५५ ला पर्वतीच्या पायथ्याला आंबील ओढ्यावर दगडी धरण बांधून २५ एकर क्षेत्राचे मोठे तळे बांधले आणि आंबील ओढ्याचा प्रवाह बदलला. १७ महिने या तळ्याचे बांधकाम चालू होते. त्यावेळेस तळे बांधकामास ४,९९, ५५३ रुपये इतका खर्च आला होता. 'पर्वतीचे तळे' म्हणून हे तळे प्रसिद्ध होते. तळ्याच्या भोवती हिराबाग, लोटणबाग सारख्या बागा निर्माण केल्या गेल्या. या नयनरम्य परिसरातील तळ्यात पेशवे नौकाविहार करण्यासाठी येत. अशीच एक तळ्यात छोटे बेट राखून तिथे त्यांनी एक बाग बांधली. बेटावर निरनिराळ्या प्रकारची झाडे लावून निसर्गशोभा वाढविण्यात आली. बागेचे नाव सारस नावाच्या पक्ष्यावरून 'सारसबाग' ठेवले गेले. थोरले बाजीराव पुत्र नानासाहेब पेशवे (पेशवेपदावरील कारकीर्द - १७४० ते १७६१) यांनी राखलेल्या सारसबागेच्या बेटावर पुढे त्यांच्या

श्री बिर्ला गणपती मंदिर, सोमाटणे फाटा - पुणे / Shree Birla Ganpati Temple, Somatane Phata - Pune

श्री बिर्ला गणपती मंदिर, सोमाटणे फाटा - पुणे पुण्यावरून मुंबईला जाताना सोमाटणे फाट्याजवळ डावीकडे आपल्याला एका टेकडीवर असलेल्या गणपतीच्या भव्य मूर्तीचे दर्शन घडते. हे आहे बिर्ला गणपती मंदिर. पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटयावरून सुमारे ४ किलोमीटरवर शिरगाव येथे साईबाबांचे मंदिर आहे. मंदिराच्या रस्त्याला जाताना प्रथमच डाव्या हाताला एका छोटयाश्या डोंगरावर गणपतीची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेते. बिर्ला उद्योग समूहाच्या वतीने ७२ फूट उंचीची श्री गणोशाची मूर्ती उभारण्यात आली आहे. ही मूर्ती राजस्थानचे कारागीर मातुराम वर्मा व नरेश वर्मा यांनी घडवली आहे. जानेवारी २००९ मध्ये चिन्मय मिशनचे जागतिक प्रमुख स्वामी तेजोमयानंदजी यांच्या हस्ते मूर्तीचे अनावरण झाले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सिमेंट काँक्रिटमध्ये ही मूर्ती उभारली आहे. मूर्तीवर तांब्याचा मुलामा आहे. या मूर्तीची निर्मिती १६ एकर जागेत झाली आहे. एकूण १७९ पाय: या येथे जाण्यास लागतात. मूर्तीचे वजन १००० टन आहे. मूर्ती शेजारी मूषकराज हातात मोठा लाडूचा प्रसाद घेऊन उभे आहेत. संध्याकाळी या ठिकाणी लाईट्स सोडल्याने मूर्ती आणखीच सुं

श्री कसबा गणपती मंदिर, कसबा पेठ - पुणे / Shree Kasba Ganpati, Kasba Peth - Pune

श्री कसबा गणपती मंदिर, कसबा पेठ - पुणे पुण्याच्या इतिहासात डोकावले तर पुण्याची मूळ वस्ती कसबा पेठेच्या भागात होती. 'कस्ब' या फारसी शब्दापासून कसबा शब्द आला असून त्याचा अर्थ होतो कारागिरी. कसबा गणपती व तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदैवते. शुभकार्याची पहिली अक्षत ठेवण्याची येथे परंपरा आहे. अगदी 'लोकमान्य' बाळ गंगाधर टिळक यांच्याकडे झालेल्या मंगलकार्याची अक्षत येथे ठेवली गेली होती. कधीकाळी 'गोविंदाग्रज' म्हणजेच राम गणेश गडकरी यांनी नाटक लिहिल्यावर कसबा गणपतीसमोर ठेवून प्रार्थना केली होती. त्यांचा राहता वाडा येथून जवळच असलेल्या पिंपळाच्या पारासमोर होता. कसबा गणपतीबद्दल अनेक आख्यायिका सुद्धा रूढ आहेत. आज आपण या प्रसिद्ध गणपतीबद्दल जाणून घेऊयात. कसबा गणपती म्हटलं की राजमाता जिजाऊ व बालशिवबा यांचा मंदिराशी आलेला संबंध आपणास दिसतो. आदिलशाहीत पुणे शहाजीराजांकडे जहागिरी होती. जिजाऊ महाराज व शिवराय पुण्यात असताना मंदिर बांधले गेले. तेव्हा मंदिराजवळ असलेल्या लालमहालात शिवराय आणि राजमाता जिजाऊंचे वास्तव्य होते. आपल्याला इतिहासात एका अस्सल पत्रात उल्ले

Shree Hanuman Temples In Pune / पुण्यातील हनुमान ( मारुती ) मंदिरे

Shree Hanuman ( Maruti ) Temples in Pune 1. Rokadoba Maruti, Shivajinagar ( Behind Congress House ) 2. Untade or Madrasi Maruti Mandir, Somwar Peth ( Near K.E.M Hospital ) 3. Ganjicha Maruti Mandir, Lakshmi Road ( Near Kabir Police Station ) 4. Akra Maruti Mandir, Shukrawar Peth ( Paranjape Wada ) 5. Gondavlekar Maharaj Math, Nene Ghat - Shaniwar Peth 6. Daas Maruti Along With Bali & Sugriva, Dhaikar Wada - Somwar Peth 7. Maruti Someshwar Mandir, Pashan 8. Tave Aali Maruti ( Inside Shree Ram Mandir ), Kapadganj - Ravivar Peth 9. Twins ( Jule ) Maruti Mandir, Sadashiv Peth 10. Batateya Maruti Mandir, Shaniwar Wad - Shaniwar Peth 11. Maruti Mandir, Guruwar Peth ( Near Mithganj Police Station ) 12. Panchmukhi Maruti Mandir, Chhatrapati Shivaji Maharaj Road - Swargate 13. Khanya Maruti Mandir, East Street 14. Umbaraya Maruti Mandir, Old Tapkir Galli - Budhwar Peth 15. Gavtya Maruti Mandir, Anand Ashram - Appa Balwant Chowk 16. Jilbya Maruti Mandir, Near Tulshibaug 17. Dudhy

जिलब्या मारुती मंदिर, शुक्रवार पेठ ( पुणे ) / Jilbya Maruti Mandir, Shukrawar Peth ( Pune )

जिलब्या मारुती मंदिर, शुक्रवार पेठ - पुणे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये श्री जिलब्या मारुती मंडळ ट्रस्ट, "जिलब्या गणपती” हे सुप्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. आजच्या पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आताच्या मंडई शनिपार रोडवर सुमारे २५० ते ३०० वर्षापुर्वी आंबील ओढा वाहत होता. आंबील ओढ्याचा प्रवाह, भाऊ महाराज बोळाच्या पश्चिमेकडून जिलब्या मारुतीजवळून पुढे जोगेश्वरी देवळाजवळून शनिवारवाड्याच्या पश्चिमेने पुढे जात अमृतेश्वराच्या देवळापाशी नदीला मिळत असे. ह्याच ओढ्याकाठी मंडई शनिपार रोडवर पुर्वी एक स्मशान होते. तिथे एक मारुतीचे छोटस देऊळ होते ( जिलब्या मारुती मंदिर ). त्याला पुर्वी विसावा मारुती म्हणत. कारण लोक त्या ठिकाणी कायमचा विसावा घेत. पूर्वी पती निधनानंतर सती जाण्याची पद्धत होती. यामुळे स्वर्गारोहणाचे पुण्य लाभते, असे समज रूढ होता. अशा सती गेलेल्या स्त्रियांची वृंदावने आठवण म्हणून बांधत. ह्या मारुती मंदिराशेजारी सरदार शितोळे घराण्यातील एक स्त्री सती गेली होती, तिचे स्मारक आहे. पुढे पेशवाईत वस्ती वाढु लागल्यावर इ. स. १७३० च्या सुमारास नाना साहेब पेशवे यां