संगमेश्वर मंदिर , सासवड
पुण्यापासून ३५ किलोमीटरच्या अंतरावर , सासवड गावात संगमेश्वर हे पांडवकालीन स्वंयभू महादेवाचे मंदिर आहे. कऱ्हा आणि चांबळी (भोगवती) या नदयांच्या संगमावर संगमेश्वर आहे. मंदिराच्या दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर समोर दृष्टिस पडतो तो स्थापात्य आणि शिल्प कलेचा अदभुत नजारा. तीस दगडी खांबावर उभारलेला प्रवेश मंडप आणि त्याच्या दोन्ही बाजुस असलेल्या दीपमाळा, प्रवेश मंडपातील नंदी, मंदिरातील कोरीव कासव, मंदिरावरील सुबक नक्षीकाम नजरेत साठवून ठेवावसं वाटतं. प्रवेश मंडपाच्या दक्षिणोत्तर प्रवेश दार आहेत. विशेष म्हणजे या मंदिरातील नंदिचे तोंड पश्चिमेस आहे. मंदिराच्या परिसरातील तुळशी वृंदवनाची रचना ही कल्पक आहे. ७ ते ८ फुट उंचीच्या या तुळशीवृंदावनात वर तुळस मध्यभागी शिवलिंग आणि खाली पाया. तुळशीला घातलेले पाणी मध्यभागी असलेल्या महादेवाच्या पिंडीवर पडते. मंदिराच्या दक्षिणेस घाट व कऱ्हा तीर आहे. या तीरावर खडकेश्वर आणि सतींची मंदिरे आहेत. उत्तरेला चांबळी च्या तीरावर ही महादेवाचं मंदिर आहे.
Comments
Post a Comment