‘सदानंदाचा येळकोट’, ‘येळकोट, येळकोट जयमल्हार’, ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं’, अशी आरोळी अन् सोबत उधळलं जाणारं भंडार-खोबरं... हे चित्र दिसलं, की लोकदेव खंडोबा, मल्हारी, म्हाळसाकांताची आराधना सुरू आहे, हे लक्षात येईल. भंडाऱ्याच्या पिवळ्याधम्मक रंगाने उजळून निघालेल्या जेजुरगडाचा परिसर म्हणूनच ‘सोन्याची जेजुरी’ म्हणून ओळखला जातो. या मल्हारी-म्हाळसाकांताची अनेक स्थानं असली, तरी पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा जोतिबा अन् जेजुरीचा खंडोबा, हीच ओळख जन-मानसांत रुजली आहे. तरी, जेजुरगडाच्या मागे उंच डोंगरावर असलेलं कडेपठार (कऱ्हेपठार) हे खंडोबाचं मूळ स्थान आहे, याची माहिती फारशी नसते. जेजुरीचं दर्शन घेऊन आल्याचं सांगणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर ‘कडेपठारचं मूळ स्थान पाहिलं का’, असं विचारल्यावर मात्र ‘हे काय नवीन,’ अशी भावना दिसते. त्यामुळं जेजुरीला जाणाऱ्या भक्तांनी खंडोबाचं हे मूळ ठिकाण पाहायलाचं हवं. जेजुरीपेक्षा इथं पोहोचणे थोडं खडतर असलं, वाट थोडी अवघड असली, तरी देवाच्या आद्यस्थानाचं दर्शन त्यांना सुखावणारं असेल, यात शंका नाही.
For Location : Click Here
We are available on
- Instagram : @amcha_mh_12
- Facebook : amchamh12


Comments
Post a Comment