छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या प्रत्येक किल्ल्यावर कमीत कमी ५० तर जास्तीत जास्त २००० चे सैन्य असे. हे सैन्य ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अष्टौप्रहर डोळ्यात तेल घालून पहारा देत असे. रात्री-अपरात्री गडावर वावरणाऱ्या या मावळ्यांना तथाकथित भुताखेतांपासून संरक्षणासाठी हनुमंताचा मोठा आधार वाटायचा. गावोगावच्या वेशींचे रक्षण करणारा हा देव आपले गडावरही रक्षण करेल, अशी त्यांची गाढ श्रद्धा होती.
त्यामुळे १६-१७ व्या शतकात मराठय़ांचे प्राबल्य असलेल्या गडांवर हनुमंताची मंदिरे वा घुमटय़ा स्थापन केलेल्या आपणास आढळतात. त्या वेळच्या रयतेच्या मनात मारुती शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारच्या भुतांचा अथवा शक्तींचा स्वामी आहे अशी दाट श्रद्धा हाती. या श्रद्धेतून मराठय़ांनी गडावरील माचीच्या टोकाशी, गडावरील तळ्या टाक्यांच्या शेजारी, गडाच्या महाद्वाराच्या घुमटीत, बालेकिल्ल्यात मारुतीरायाची स्थापना केली.
ह्याचा दुसरा महत्त्वाचा कारण अस पण आहे की मारुती हा शक्तीचा उपासक आहे आणि मराठे सुद्धा हे शक्तीचे उपासक होते. गडावर नेहमीच वीर मारुती बघायला भेटतो आपल्याला. कर्तव्य मारुती आणि दास मारुती बघायला भेटत नाही. वीर मारुती म्हणजे युद्धासाठी तत्पर असणारा आणि तसेच मराठे पण नेहमी युद्धासाठी तत्पर असत. ह्या सर्व गोष्टींसाठी मारुतीची स्थापना गडावर केली जायची.
आत्ता आपण थोडक्यात मारूतीचे प्रकार जाणून घेऊया :
✔ ज्या मारुतीच्या मूर्ती डोक्यावरून शेपटी असते आणि पायाखाली राक्षस असतो - तो वीर मारुती व्हय.
✔ जो मारुती हात जोडून नमस्कार करण्याचा मुद्रेत असतो - तो दास मारुती व्हय.
✔ जो मारुती संजीवनी पर्वत घेऊन जाताना दाखवला जातो - तो कर्त्तव्य मारुती व्हय.
अधिक माहिती साठी तुम्ही वि. सी. बेंद्रे यांची समर्थ चरित्र किवा दासबोध मधला भीम दशक वाचू शकता.
Comments
Post a Comment