Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

वट पौर्णिमा / Vat Purnima

वट पौर्णिमा हिंदू धर्मातील एका महत्वाच्या सणापैकी एक सण म्हणजे वट पौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. यंदा मात्र या सणावर देखील इतर सणांप्रमाणे कोरोनाचे सावट आहे. त्यामुळं स्त्रियांनी सुरक्षित राहून आणि नियमांचे पालन करुन ही परंपरा जपणे गरजेचे आहे. निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही. अश्या प्रथा मुळे जर माणूस वृक्ष संवर्धन करत असेल तर धन्य आहे तो प्रथा. त्यात आज पर्यावरण दिन देखील असल्याने दुहेरी योग जुळून आला आहे. काय आहे नेमकी सत्यवान-सावित्रीची कथा   अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी...

श्री केदारेश्वर मंदिर, शिरवळ ( जि. सातारा ) / Shri Kedareshwar Temple, Shirwal ( Dist. Satara )

श्री केदारेश्वर मंदिर, शिरवळ ( जि. सातारा ) शिरवळ मध्ये प्राचीन काळात बांधलेले हे सुंदर मंदिर. पुणे-सातारा मुख्य हायावे पासून अगदी जवळ आहे. मंदिरासमोर पुष्करणी तलाव आहे. हा तलाव शापित आहे, असं एक दंतकथा सुद्धा आहे. १५ फूट तटबंदी असलेल्या मंदिराच्या मुख्य दरवाजामधून आत प्रवेश केला असता अगदी समोर नंदी सभामंडप आहे. डावीकडे उंच अष्टकोनी रेखीव दिपमाळ लक्ष वेधून घेते. शेजारी विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि तुळशी वृंदावन आहे. उजव्या बाजूला मारुती मंदिर आणि तुळशी वृंदावन आहे. मुख्य कमानीच्या आतील बाजूस श्री गणेश आणि रिद्धी सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या दगडी बांधकामावर आता रंगकाम झाले आहे. मंदिराची डागडुजी वेळेवर होते. मध्यभागी मोठी घंटा बसवली गेली आहे. बाहेरच्या सभामंडपात लाकडी खांबांनी आधार देऊन त्याला सुशोभित करण्यात आलेय. मध्य सभामंडपामध्ये दगडी खांब खूप सुंदर आहेत. आतील गर्भगृहामध्ये शिवपिंड विराजमान आहे. या मंदिराच्या आवारात आणि मंदिराच्या शिखरावर बरेच शिल्पकाम झालेय. यामध्ये श्री शेषशायी विष्णू , शिवशंकर पार्वती , गरुडदेव आणि देवदेवता यांच्या मूर्ती नंदी मंडपाच्या शिखरावर आह...

गुढी पाडवा / Gudi Padwa

गुढी पाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेस गुढीपाडवा असे नाव असून या तिथीला वर्ष प्रतिपदा असेही म्हणतात. शालिवाहन शकाचे वर्ष (इ. स. सु. ७८ वर्षांनंतर) या दिवसापासून सुरू होते. दक्षिण भारतात तसेच भारताच्या इतर भागात नूतन वर्षारंभ याच दिवशी मानतात. ‘शालिवाहन’ ‘सातवाहन’चा अपभ्रंश असावा. सातवाहनांपैकी कोणी व कोणत्या प्रसंगी हा शक सुरू केला, हे निश्चितपणे सांगता येत नाही. शक हे परकीय असून त्यांच्यावर सातवाहनांनी मिळविलेल्या एखाद्या महत्त्वाच्या विजयदिनापासून ह्या शकाची सुरुवात झाली असावी, असे काही विद्वान मानतात. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात वर्षाचा आरंभ निरनिराळ्या देशांत भिन्नभिन्न महिन्यात होत असे. सु. ८०० वर्षांपूर्वी काश्मीर प्रांतात चैत्र हाच महिना प्रथममास मानीत, असे इतिहासकार अल बीरूनीच्या लेखांवरून दिसते. चैत्र शुद्ध १ हा दिवस तेथील लोक मोठ्या उत्साहाने पाळीत व हा परशत्रूस राजाने मागे हटविल्याचा दिवस आहे, असे ते समजत. गुप्तराजांची सत्ता एके काळी उत्तर हिंदुस्थानात सर्वत्र पसरली होती, तेव्हा चैत्रारंभी वर्षारंभ होत असे, असे प्राचीन लेखांवरून दिसते. वसंत ऋतूचा आरंभ याच दिवशी होतो. ...

सरदार पिलाजी जाधवराव / Sardar Pilaji Jadhavrao

सरदार  पिलाजी जाधवराव पिलाजी जाधवराव यांच्या वडिलांचे नाव चांगोजी तर आईचे नाव हंसाई होते. चांगोजी यांच्या कडे वाघोलीच्या पाटीलकीचे वतन चालत आले होते. पिलाजी, बाजीराव व चिमाजी आप्पा यांचे युध्दशास्त्रातील गुरु होते. शाहू महाराजांच्या काळात मराठे उत्तर हिंदुस्थानात खूप सक्रिय होते. तेथे जवळजवळ प्रत्येक वर्षी स्वारी करून मुलूख आणि खंडणी प्राप्त करून घेत असत. पिलाजी जाधवराव हे या हालचालीं मधील एक अग्रणी सरदार होते. त्यांनी अनेक स्वार्यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावली. पिलाजींना सागर प्रांती चार खेड्यासह ( बध परडीया , खुजनेरखेडा , हथना ) मोकलमाऊ , चौका , खामखेडा , खमरीया , गढामंडळ वगैरे मुलुख छत्रसाल राजाने जहागिर दिला. पिलाजींनी भदावर , माळवा , कमरगा , नरवरा शिप्री , ग्वाल्हेर , भोपाळ , सिरोंज , दतिया , ओछा , दिल्ली स्वारी , इत्यादी लढायांत भाग घेतला होता. त्यांनी उत्तरेकडील रतनगडचा पण किल्ला जिंकून घेतला होता. पिलाजी जाधवरा वांनी सासवड, दिवा, वाघोली, जाधववाडी या व्यापारी पेठा वसवल्या होत्या. त्या संबंधी शाहूमहाराज एका पत्रात म्हणतात :  ‘राज्याभिषेक शके ३४ सर्वधारी ...

श्री खंडोबा मंदिर, सारसबाग ( पुणे ) / Shri Kandoba Temple, Sarasbaug ( Pune )

श्री खंडोबा मंदिर, सारसबाग ( जि. पुणे ) खंडोबा, महाराष्ट्र व कर्नाटक यांतील एक प्रसिद्ध लोकदैवत होय. मल्लारी ( मल्हारी ) मार्तंड, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, मैलार इ. नावांनीही खंडोबा प्रसिद्ध आहे. रा. चिं. ढेरे यांच्या मते हे दैवत सुमारे अकराव्या शतकापासून विशेष लोकप्रिय झाले. ब्राह्मणांपासून तो धनगर रामोश्यांपर्यंत खंडोबाचे उपासक आढळतात. तो अनेकांचे कुलदैवतही आहे. मणी आणि मल्ल ह्या दैत्यांच्या नाशासाठी शंकराने मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीस ( चंपाषष्ठी ), मार्तंडभैरवाचा अवतार धारण केला. अशी कथा " मल्लारि-माहात्म्यम्  " ह्या संस्कृत ग्रंथात आहे. प्रस्तुत ग्रंथ १२६० ते १५४० च्या दरम्यान रचिला असावा. या ग्रंथामुळेच खंडोबाला महाराष्ट्र–कर्नाटकांत विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली. अश्वारूढ, उभ्या व बैठ्या अशा त्रिविध स्वरूपात खंडोबाच्या मूर्ती आढळतात. चतुर्भुज कपाळाला भंडार, हातांत डमरू, त्रिशूळ, खड्‌ग व पानपात्र, वाहन घोडा आणि म्हाळसा व बाणाई ह्या भार्या, असे त्याचे वर्णन आढळते. म्हाळसा आणि बाणाई ह्या जातीने अनुक्रमे वाणी आणि धनगर असल्याच्या लोककथा रूढ आहेत. खंडोबाच्या परिवारात...

भीष्म पितामह / Bhishma Pitamah

गंगापुत्र देवव्रत ( भीष्म पितामह ) द्वापारयुगात हस्तिनापूरवर राजा शंतनू यांचा शासन होता. त्यांच्या पत्नीचे नाव गंगा होते. राणी गंगेला राजा शंतनूपासून पुत्रप्राप्ती झाली. " देवव्रत " - असे त्याचे नामकरण करण्यात आले. देवव्रताच्या जन्मानंतर दिलेल्या वचनाचे पालन करत राणी गंगा राजा शंतनू यांना सोडून निघून गेली. भीष्म प्रतिज्ञा एक दिवस गंगेत नौका विहार करत असताना राजा शंतनू यांची भेट सत्यवतीशी होते. ते तिच्या रुपावर इतके भाळतात की, सत्यवतीच्या वडिलांसमोर विवाह प्रस्ताव ठेवतात. मात्र, सत्यवतीपासून होणारा पुत्र हस्तिनापूरचा सम्राट होईल, अशी अट ते राजा शंतनू समोर ठेवतात. राजा शंतनू ही अट मान्य करत नाहीत. देवव्रताला जेव्हा ही गोष्ट समजते, तेव्हा तो आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा करतो. त्यानंतर राजा शंतनू आणि सत्यवती यांचा विवाह होतो. इच्छा मृत्यूचे वरदान देवव्रताने घेतलेल्या संकल्पामुळे राजा शंतनू अतिशय प्रभावित होतो आणि देवव्रताला इच्छा मरणाचे वरदान देतो. देवव्रताच्या या प्रतिज्ञेमुळे त्याला पुढे भीष्म म्हणून ओळख मिळते. महाभारतात भीष्म म...

तुळशीबाग, पुणे / Tulshibaug, Pune

तुळशीबाग, पुणे ओंकारेश्वराची माहिती देताना डॉ. अविनाश सोवनी यांनी लिहिले होते की , एखाद्या देवाचेही नशीब असायला लागते. तुळशीबागेतल्या श्रीरामाबद्दलही आज नाइलाजाने असे म्हणणे प्राप्त आहे, कारण तुळशीबागेतल्या विविधरंगी दुकानांतून खरेदीची झुंबड उडविणाऱ्या तरुण पिढीतील मुली, स्त्रिया, आज देखल्या देवा दंडवत याप्रमाणेही श्रीरामाचे दर्शन न घेताच परत फिरतात, ही वस्तुस्थिती आहे. सुप्रसिद्ध विनोदी लेखक चिं. वि. जोशी यांनी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी आपल्या पुस्तकात चेष्टेने लिहिलेली वाक्ये तंतोतंत खरी ठरावीत, किंबहुना चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीपासूनच , हा केवळ दैवदुर्विलास आहे. ते लिहितात, " पुण्यात खास बायकांसाठी बांधलेला तुळशीबाग नावाचा बाजार असून त्यात श्रीरामाचे देऊळही आहे. " आजची परिस्थिती बघता असे विधान आश्चर्यकारक वाटणार नाही. शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी मात्र अशी परिस्थिती नव्हती. त्या काळी पुण्यातील स्त्रिया, मुली खास करून देवदर्शनासाठी या तुळशीबागेत येत असत. एवढेच नव्हे, तर पुराण-कीर्तन ऐकण्यासाठीही आबाल-वृद्धांची गर्दी होत असे. अगदी पहाटेपासून तुळशीबागेत भक्तमंडळींची लगबग चालू हो...