श्री केदारेश्वर मंदिर, शिरवळ ( जि. सातारा )
शिरवळ मध्ये प्राचीन काळात बांधलेले हे सुंदर मंदिर. पुणे-सातारा मुख्य हायावे पासून अगदी जवळ आहे. मंदिरासमोर पुष्करणी तलाव आहे. हा तलाव शापित आहे, असं एक दंतकथा सुद्धा आहे. १५ फूट तटबंदी असलेल्या मंदिराच्या मुख्य दरवाजामधून आत प्रवेश केला असता अगदी समोर नंदी सभामंडप आहे. डावीकडे उंच अष्टकोनी रेखीव दिपमाळ लक्ष वेधून घेते. शेजारी विठ्ठल-रखुमाई मंदिर आणि तुळशी वृंदावन आहे. उजव्या बाजूला मारुती मंदिर आणि तुळशी वृंदावन आहे. मुख्य कमानीच्या आतील बाजूस श्री गणेश आणि रिद्धी सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या दगडी बांधकामावर आता रंगकाम झाले आहे. मंदिराची डागडुजी वेळेवर होते. मध्यभागी मोठी घंटा बसवली गेली आहे. बाहेरच्या सभामंडपात लाकडी खांबांनी आधार देऊन त्याला सुशोभित करण्यात आलेय. मध्य सभामंडपामध्ये दगडी खांब खूप सुंदर आहेत. आतील गर्भगृहामध्ये शिवपिंड विराजमान आहे. या मंदिराच्या आवारात आणि मंदिराच्या शिखरावर बरेच शिल्पकाम झालेय. यामध्ये श्री शेषशायी विष्णू , शिवशंकर पार्वती , गरुडदेव आणि देवदेवता यांच्या मूर्ती नंदी मंडपाच्या शिखरावर आहेत. आतमध्ये नागशिल्प आणि नंदी. मंदिराच्या खांबावर भारवाहक नाग, शरभ शिल्पे आणि कमळशिल्पे मंदिराच्या भिंतीवर आहेत. मंदिराच्या शिखरावर पण बरीच शिल्पे आहेत. मंदिराच्या वरच्या बाजूला चार मिनार आहेत. मंदिराचा परिसर शांत आणि सुंदर आहे. मंदिराच्या आवारत समाधी चौथरे पाहायला मिळतात.
मंदिराचा उपयुक्त माहिती दिल्याबद्दल अभिषेक यादव यांचा मी आभार व्यक्त करतो. मंदिर पाहत असताना मंदिराचे पुजारी गुरव काका, देशपांडे वाड्याचे मालक देशपांडे काका आणि तिथली रहिवासी पियुषा यांची मोलाची मदत झाली.
Comments
Post a Comment