Skip to main content

अदालतवाडा ( अदालत राजवाडा ), सातारा / Adalatwada ( Adalat Rajwada ), Satara


अदालतवाडा ( अदालत राजवाडा )
छत्रपती संभाजीमहाराजांनंतर राजाराममहाराजांना जिंजीस जावे लागले व महाराणी येसूबाई यांना आपले नऊ वर्षांचे पुत्र शाहूराजे यांच्यासह औरंगजेबाची कैद पत्करावी लागली. पुढे सन १६९९ मध्ये ( जून ) राजाराममहाराज साताऱ्यास आले व त्यांनी आपली नवी राजधानी सातारा झाल्याचे जाहीर केले. पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूराजे कैदेतून सुटले ( सन १७०८ ) व साताऱ्यास येऊन सातारा येथे आपला राज्याभिषेक केला. सातारा किल्ल्याच्या पायथ्याशी सातारा हे लहानसे खेडे होते. राजधानीचे ठिकाण झाल्यावर शाहूराजांनी त्याचा विकास केला. त्याच वेळी त्याचे नामकरण शाहूनगर असे करून तेथे काही वाडे बांधले. त्यांपैकी अदालतवाडा व इतर काही वास्तूंचे अवशेष आज साताऱ्यात पाहावयास मिळतात.

सातारा किल्ल्याच्या माचीला अदालतवाडा ही वास्तू आजही मोठ्या दिमाखाने उभी आहे. छत्रपती शाहूमहाराजांनी आपले प्रशासन जेव्हा साताऱ्यात सुरू केले, तेव्हा न्यायनिवाडे करण्यासाठी व इतर शासकीय कामांसाठी हा वाडा बांधण्यात आला. १० फूट उंचीच्या जोत्यांवर उभा असलेला ६७ मीटर लांब व ४८ मीटर रुंद असा हा वाडा जवळजवळ ३०० वर्षे अभेद्य राहिला आहे. वाड्याचे प्रवेशद्वार भव्य असून रस्त्यावरून प्रवेशद्वारापर्यंत जाण्यास आयताकृती पायऱ्या आहेत. प्रवेशद्वारावर पाच खिडक्या असलेला सज्जा असून, दोहो बाजूंस घडीव दगडांच्या भिंती आहेत. दरवाजा भक्कम सागवानी असून, त्याचे स्वरूप आजही नव्यासारखे दिसते. वाड्याच्या आत गेल्यावर भव्य चौक असून दुमजली चार सोपे उत्तम स्थितीत उभे आहेत. अदालतवाड्यास पूर्वी ‘ जुनी अदालत ' असे म्हणत असत. इंग्रजांनी सन १८४९ -५० मध्ये त्या वेळचे राजे श्रीमंत आबासाहेब छत्रपती असताना सर्व दौलत ताब्यात घेऊन लिलाव केला . तो छत्रपतींनी घेतला. म्हणून आज हा अदालतवाडा आपण पाहात आहोत. या अदालतवाड्यास मराठी साम्राज्याचे हायकोर्ट मानले जाई. स्वतः छत्रपती, पेशवे, सरन्यायाधीश मिळून सर्व खटल्यांचा निकाल करावयाचे. एकीकडे साबरमतीकाठचे गुजरातचे लोक, तर एकीकडे तुंगभद्राकाठचे कानडी लोक येथे दाव्यांचा निकाल करण्यास यायचे.

सन्दर्भ :
महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे
लेखक : डॉ. सदाशिव शिवदे


Adalatwada ( Adalat Rajwada )
After Chhatrapati Sambhaji Maharaj, Rajaram Maharaj had to go to Jinji and Maharani Yesubai had get capture by Aurangzeb along with her nine year old son Shahu Raje. Later in the year 1699 ( June ) Rajaram Maharaj came to Satara and announced that his new capital was Satara. Later, after Aurangzeb's death, Shahu Raje was released from prison ( Year 1708 ) and he came to Satara and was crowned at Satara. Satara was a small village at the foot of Satara fort.  Shahu Raje developed it when it became the capital. At the same time, it was renamed as Shahunagar and some wadas were built over there. Hence, remains of Adalatwada and some other structures can be seen in Satara today.

The structure of Adalatwada is still standing today. When Chhatrapati Shahu Maharaj started his administration in Satara, he built this palace for judgement and other government related works. Hight of wada is 10 feet high, 67 meter long and 48 meter wide castle has remained impregnable for almost 300 years. The entrance to the castle is magnificent and has rectangular steps leading from the road to the entrance. The entrance is decorated with five windows and has stone walls on both sides. The door is sturdy teak, and its appearance still looks new. Once inside the castle, there is a magnificent square and the two-storied four stands in excellent condition. Adalatwada used to be called 'Old Court'. In the year 1849-50, when the then king was rich Abasaheb Chhatrapati, the British took possession of all the wealth and auctioned it. It was taken by Chhatrapati. So today we are seeing this Adalatwada. This courthouse was considered the High Court of the Maratha Empire. People like Chhatrapati Himself, Peshwa, Chief Justice used this wada to pass judgement for all the cases. On the one hand, the people of Gujarat from Sabarmati, and Kanadi people from Tungabhadra used to come here to settle their claims.

References :
Maharashtratil Aitihasik Wade
Author : Dr. Sadashiv Shivade

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Temples In Hadapsar ( Pune )

Temples In Hadapsar, Pune 1. Shree Chandramauleshwar Mandir, Magarpatta Chowk 2. Shree Mahalakshmi Mandir, Malwadi Road 3. Shree Vitthal Rakhumai Mandir, Hadapsar Gaon 4. Shree Hanuman Mandir, Hadapsar Gaon 5. Shree Ram Mandir, Hadapsar Gaon 6. Shree Kaal Bhairavnath - Mata Jogeshwari Mandir, Hadapsar Gaon 7. Shree Rudreshwar Mahadev Mandir, Tupe Corner, Amanora - Hadapsar 8. Ramtekadi Mandir Group, Ramtekadi 9. Shree Mahalakshmi Mandir, Magarpatta - Hadapsar Instagram - @TRAVELWALA.CHORA

पुण्यातील काही प्रसिद्ध देखावे - पुणे गणेशोत्सव 2024

पुणे गणेशोत्सव 2024 पुण्यातील काही प्रसिद्ध देखावे ✨✨✨ List Format : Mandal Name - देखावे 1. Kasba Ganapati Mandal - Siddhatek Astavinayak Ganapati  2. Shreemant Dagluseth Halawai Ganpati Mandal - Jatoli Shiv Mandir, Himachal Pradesh  3. Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Mandal - Varad Vighneshwar Wada, Ozar 4. Tulshibaug Ganapati - Jagannath Puri Mandir, Odisha  5. Shree Gajanan Mitra Mandal, Tulshibaug - Shree Mahakaleshwar Mandir, Ujjain  6. Hutatma Babu Genu Mandal - Meenakshi Mandir, Madurai 7. Sharda Ganapati Mandal Trust - Kalpanik Shiv Mandir 8. Chhatrapati Rajaram Mitra Mandal - Durgiana Mandir, Amritsar Punjab 9. Shanipar Mandal Trust - Vrindavan Nagari 10. Panchamukhi Hanuman Tarun Mandal, Shukrawar Peth - Pashupatinath Mandir, Nepal 11. Nav Jawan Mitra Mandal, Sadashiv Peth - Shiv Parvati Vivah Celebrations 12. Trishund Ganapati Mandir Mandal - Kashi Vishwanath Mandir, Varanasi 13. Navnath (Achanak) Tarun Mandal Trust - 12 Jyotirlinga Darshan 14. Bholenath Mit

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या २१ व्या व