Skip to main content

Posts

Showing posts from May, 2022

श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे यांची समाधी, शनिवार पेठ - पुणे / Samadhi Of Shrimant Chimaji Appa Peshwe, Shaniwar Peth - Pune

श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे यांची समाधी   थोरले बाजीराव बाळाजी भट तथा चिमाजी अप्पा ऊर्फ चिमणाजी अप्पा हे पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र होत. थोरले बंधू बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत चिमाजीअप्पांनी सदैव त्यांना सावलीसारखी साथ दिली. या जोडीचा उल्लेख 'राम-लक्ष्मण' असा केला जातो. पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी चिमाजी अप्पांनी यशस्वी लढा दिला. त्यांनी जिंकलेल्या वसई किल्ल्याची घटना इतिहासात प्रसिद्ध आहे. त्यांच्या पत्नीचे नाव रखमाबाई होय. सदाशिवराव भाऊ हे त्यांचे पुत्र होत. ओंकारेश्वर देवस्थान ही संस्था दर वर्षी 'श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे पुरस्कार' देते. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरात चिमाजी अप्पांची समाधी आहे. 🚩 Instagram - @TRAVELWALA.CHORA

मूर्तिभंजन आणि मंदिरविध्वंस

मूर्तिभंजन आणि मंदिरविध्वंस इस्लामी राजवटींचे मुख्य वैशिष्ट्य होते मूर्ती फोडणे आणि देवळे पाडणे. त्यांचे अनुकरण भारतातील इस्लामी राज्यकर्त्यांनी कसे केले याची काही उदाहरणे पुढे देतो. मुहम्मद घोरीने ११९२ साली पृथ्वीराज चौहानाचा पराभव करून त्याला ठार मारले. त्यानंतर आपला गुलाम कुत्बुद्दीन ऐबक याला भारतात ठेवून घोरी गझनीला परत गेला. घोरी मेल्यावर कुत्बुद्दीन ऐबकच इथला सुलतान झाला. या कुत्बुद्दीन ऐबकाने मुहम्मद घोरीच्या आज्ञेवरून दिल्लीत एक मोठी मशीद बांधली. सत्तावीस बुतखान्यांचे म्हणजे मूर्तिमंदिरांचे साहित्य वापरून ती मशीद बांधली आहे असा फार्सी शिलालेखच तिच्यावर आहे. आता ती मशीद पडक्या अवस्थेत आहे आणि पुरातत्त्वखात्याच्या ताब्यात आहे. आजही तिथे हिंदू आणि जैन मंदिरांचे अवशेष पहायला मिळतात. कुत्बुद्दीन ऐबकच्याच काळात मुहम्मद बख्तियार खिलजी या त्याच्या सरदाराने १२०२ मध्ये बिहारमधील एक मोठा बौद्ध विहार पाडून टाकला आणि तिथल्या बौद्ध भिक्षूंची कत्तल केली. ती सर्व हकीगत तत्कालीन इतिहासकार मिन्हाजुद्दीन याने तबकात-इ नासिरी या त्याच्या फार्सी ग्रंथात लिहून ठेवली आहे. त्याच सुमाराला प्...

अविमुक्त क्षेत्र काशी, मुसलमानी शासक, पंडित गागाभट्ट व मराठे

अविमुक्त क्षेत्र काशी, मुसलमानी शासक, पंडित गागाभट्ट व मराठे प्राचीन काळापासून हिंदूंच्या सर्वोच्च श्रद्धेचं स्थान आणि हिंदूधर्माच्या सांस्कृतिक व धार्मिक राजधानीचं स्थान म्हणून काशीक्षेत्र विख्यात आहे. आपल्या पापांची शुद्धी होण्याचे आणि मोक्ष मिळण्याचे क्षेत्र आणि महातीर्थ म्हणून काशीक्षेत्राला प्रत्येक आस्तिक हिंदू ओळखतो. पापमुक्तीचे स्थान म्हणून जसे काशीक्षेत्र हिंदूंमध्ये विख्यात आहे, तसेच काशीक्षेत्राची आणखी एक ओळख आहे आणि ती म्हणजे, काशीचा विश्वनाथ ! सश्रद्ध हिंदूंचे मस्तक ज्याचे नाव ऐकताच नमन करते आणि अबालवृद्धांपासून ते आस्तिक आणि नास्तिकांपर्यंत तसेच भारतात आणि भारताबाहेर ज्याच्यामुळे काशीक्षेत्र बहूविख्यात झाले, तो हा काशीचा विश्वनाथ अथवा विश्वेश्वर महादेव ! भगवान विश्वेश्वर महादेवाचे हे काशीक्षेत्र विविध साहित्यात विविध नावांनी उल्लेखलेले आहे. काश्रृ दीप्तौ म्हणजे स्वतेजाने प्रकाशणारी, ह्या संस्कृत धातुपासून काशी ह्या शब्दाची व्युत्पत्ती सांगितलेली आहे. परमेश्वर येथे साक्षात प्रकाशमान असतो, म्हणून यास काशी म्हणतात, असे काशीखंड सांगते. काशीचे दुसरे नाव म्हणजे बना...

घोरपडे घाट, शिवाजीनगर - पुणे / Ghorpade Ghat, Shivajinagar - Pune

घोरपडे घाट, शिवाजीनगर - पुणे   छत्रपती शिवाजी पूल म्हणजे नव्या पुलावरून पूर्वेच्या बाजूला खाली नदीपात्रात डोकावून पाहिले, तर खणखणीत चिरेबंदी बांधकाम आणि त्यांच्या रेखीव पायऱ्या असे स्थापत्य ठळकपणे नजरेत भरते. अगदी नदीतील पाण्याच्या प्रवाहाजवळ हे बांधकाम नेमके कसलं ? तर याचं उत्तर आहे - ' घोरपडे घाट ' ! पेशव्यांचे सरदार यशवंतराव घोरपडे यांचे वंशज असणाऱ्या दौलतराव घोरपडे यांनी १८२१ मध्ये चार बुरुजांसह भक्कम संरक्षक भिंत, नगारखान्यासह प्रवेशद्वार, नदीच्या थेट प्रवाहापर्यंत जाणाऱ्या प्रशस्त पायऱ्या असा एक घाट बांधून घेतला. या दक्षिणाभिमुखी वास्तुरचनेच्या बुरुजांना जोडणाऱ्या भिंतीमध्ये दोन्ही बाजूंना दोन खोल्या आहेत. भिंतीवर देवड्या आहेत. इथून मुठेपर्यंत जाणाऱ्या सुबक प्रमाणशीर पायऱ्यांची रचना देखणी आहे. पानशेत प्रलयाच्या आपत्तीत या घाटाचे दगडी बांधकाम काही ठिकाणी कोसळले. तेथे एक शिलालेख होता. तोही स्थानभ्रष्ट झाला. ' श्री येशवंत चरणितत्पर दवलवराव व पिराजीराव घोरपडे, अमिरुळ उमरा व शंबेसी निरंतर, शके १७५३ विक्रमनाम स्मशेर ( संवत्सरे ) फाल्गुन शु पंचमी रमज्यान ' अस...

सुजाता मस्तानी, पुणे / Sujata Mastani, Pune

सुजाता मस्तानी, पुणे पुणे आणि काही खाद्यपदार्थ यांचे एक वेगळे नाते असते. तो पदार्थ, तो निर्माता, तो दुकानदार याची एक स्वतंत्र ओळख असते. आंबा म्हटले की जसा हापूसच डोळ्यापुढे येतो, तसेच मस्तानी म्हणजे सुजाता हे गृहीत सत्य झाले आहे. पुण्याच्या सदाशिव पेठेतील निंबाळकर तालीम चौकात कोणे एकेकाळी रावजी मामा कोंढाळकर यांचे पानाचे दुकान होते आणि त्या दुकानात बर्फही मिळत असे; एवढाच काय तो या दुकानाचा थंडपणाशी संबंध होता. मात्र शरदराव कोंढाळकर, जे महाराष्ट्र सरकारच्या सेवेत होते, त्यांनी या पानाच्या दुकानाशेजारचे एक बंद पडू लागलेले किराणामालाचे दुकान भाडय़ाने घेऊन त्या जागी थंड पेये आणि आइस्क्रीम विकायचा घाट घातला आणि १९६७-६८ मध्ये सुजाता या आपल्या मुलीच्या नावाने आइस्क्रीमचे दुकान सुरू केले. थोडय़ाच दिवसांत येथे आइस्क्रीम सोबत मस्तानीही मिळू लागली. मस्तानी हा काही कोंढाळकर यांचा शोध नाही, तसा त्यांचा दावाही नाही. पूर्वी ‘दूध कोल्ड्रिंक’मध्ये आइस्क्रीम घालून हा पदार्थ विकला जात असे. मात्र त्यात बर्फ आणि साधे दूध व आइस्क्रीम यांचे मिश्रण असे. सुजाता दुकानाने यात बदल केले. बर्फाच्या जागी आ...

नाना फडणवीस यांची मूर्ती, वेळास - महाराष्ट्र / Statue Of Nana Fadavnis, Velas - Maharashtra

नाना फडणवीस १४ जानेवारी १७६१ ला पानिपतावर झालेली निर्णायक लढाई. पेशवे घराण्याचे दोन महत्त्वाचे वंशज त्यादिवशी कामी आले होते. अनेक सरदारांनी, सैनिकांनी आता अंत जवळ येतोय हे दिसल्यावर आपापल्या वाटा धरल्या होत्या. तिथून बाहेर पडणाऱ्यांमध्ये एक विशीच्या आतबाहेर वय असणारा तरुणही होता. कसाबसा लपत-छपत जीव वाचवून या तरुणानं पेशव्यांची बुऱ्हाणपूर येथे भेट घेतली. पेशव्यांना सगळा वृत्तांत सांगितला. पुढच्या काळात हा तरुण मराठा साम्राज्यात महत्त्वाचं स्थान मिळवणार होता. हा तरुण म्हणजेच बाळाजी जनार्दन भानू...अर्थात "नाना फडणवीस". जनार्दन फडणवीस आणि रखमाबाई यांच्यापोटी जन्मास आलेले बाळाजी जनार्दन म्हणजेच नाना फडणवीस होय. नाना फडणवीस यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला. राघोबा दादांबरोबर उत्तर हिंदुस्थानाच्या मोहिमेत जनार्दन फडणवीस यांचं निधन झाला. अत्यंत हुशार तल्लखबुद्धीच्या नाना फडणवीसांना त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर १७५६ साली फडणवीशी मिळाली. नाना फडणवीस हे नाव गेल्या तीनशे वर्षांमध्ये अनेकवेळा अनेक कारणांनी वापरलं गेलं आहे. एखाद्या व्यक्तिमत्वाची ओळख त्याच्...