श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे यांची समाधी, शनिवार पेठ - पुणे / Samadhi Of Shrimant Chimaji Appa Peshwe, Shaniwar Peth - Pune
थोरले बाजीराव बाळाजी भट तथा चिमाजी अप्पा ऊर्फ चिमणाजी अप्पा हे पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र होत. थोरले बंधू बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत चिमाजीअप्पांनी सदैव त्यांना सावलीसारखी साथ दिली. या जोडीचा उल्लेख 'राम-लक्ष्मण' असा केला जातो. पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी चिमाजी अप्पांनी यशस्वी लढा दिला. त्यांनी जिंकलेल्या वसई किल्ल्याची घटना इतिहासात प्रसिद्ध आहे. त्यांच्या पत्नीचे नाव रखमाबाई होय. सदाशिवराव भाऊ हे त्यांचे पुत्र होत. ओंकारेश्वर देवस्थान ही संस्था दर वर्षी 'श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे पुरस्कार' देते. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरात चिमाजी अप्पांची समाधी आहे. 🚩
Instagram - @TRAVELWALA.CHORA
Comments
Post a Comment