Skip to main content

Posts

Showing posts from December, 2023

श्री भेकराई माता मंदिर, भेकराईनगर, हडपसर - पुणे / Shree Bhekrai Mata Mandir, Bhekrai Nagar, Hadapsar - Pune

श्री भेकराई माता मंदिर भेकराईनगर, हडपसर - पुणे येडाई, गांजाई, मळाई, फिरंगाई अशी देवीची नावे आपण सतत ऐकत असतो. पण ही नावे अशी का पडली किवा का प्रचलित झाली हे आपल्याला माहित नसते. अशाच प्रकारचे अजून एक नाव म्हणजे भेकराई. वाघजाई ह्या नावामध्ये "वाघ" शब्द येतो; म्हणून पडल्याचे आपण ऐकतो; तसेच भेकराई हे भेकर म्हणजे हरिण यावरून पडले असावे काय? भेकर हे सारंग कुळातील हरिण होय. हडपसरकडून सासवडकडे जाताना उजव्या बाजूस आधी तुकाई मातेचे मंदिर लागते. तेथून सासवडकडे जाऊ लागले, की बस डेपोच्या जवळच भेकराई देवीचे मंदिर आहे. हा परिसर भेकराईनगर म्हणूनच ओळखला जातो. ज्या टेकडीवर तुकाइचे मंदिर आहे, त्याच टेकडीवर भेकराईचेही मंदिर आहे. तुकाईच्या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात, तर भेकराईचे मंदिर तेवढ्या उंचीवर नसल्याने मंदिरापर्यंत थेट गाडीने जातात येते. हे मंदिर प्रशस्त आहे. येथे देवीची दोन हातांची दोन ते अडीच फूट उंच मूर्ती आहे. देवी उभी असून, उजव्या हाताखाली मानवाकृती आहे; परंतु मूर्तीचे स्वरूप व ती मानवाकृती कोणाची हे स्पष्ट होत नाही. देवीची मूर्ती शेंदूरलिप्त आहे. देवीच्या ड...

श्री कृष्ण मंदिर, निगडी - पिंपरी-चिंचवड / Shree Krishna Temple, Nigdi, Pimpri-Chinchwad

श्री कृष्ण मंदिर, निगडी पिंपरी-चिंचवड - पुणे पिंपरी-चिंचवड परिसरात निगडी येथे श्रीकृष्णाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या भव्य मंदिराचे बांधकाम दाक्षिणात्य शैलीत केलेले आहे. या मंदिरात १९८७ मध्ये श्रीकृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. १९९३ मध्ये येथे भव्य मंदिर बांधण्यात आले. येथे भव्य ध्वजस्तंभ बांधलेला आहे. या मंदिराच्या आवारात नवग्रह, गणपती, अय्याप्पा, हनुमान, वैष्णवदेवी, सुब्रमण्यम, नागदेवता ही मंदिरे आहेत. सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांकरिता येथे मोठा सुसज्ज हॉल बांधण्यात आलेला आहे. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत येथे दहा पूजांचे आयोजन केले जाते. या मंदिराचा प्रसन्न परिसर भाविकांना मोहून टाकतो. या मंदिरातील दर्शनाची वेळ पहाटे ५ ते सकाळी ११.३० पर्यंत व संध्याकाळी ५ ते रात्री ८.४५ पर्यंत आहे. माहिती स्त्रोत : ▪︎ सफर ऐतिहासिक पुण्याची ( संभाजी भोसले ) Instagram : ▪︎ @punesehai ▪︎ @travelwala.chora 

श्री पुण्येश्वर मंडळ, कसबा पेठ - पुणे / Shree Punyeshwar Mandal, Kasba Peth - Pune

श्री पुण्येश्वर मंडळ कसबा पेठ, पुणे  कसबा पेठेत कुंभार वेशीजवळ पुण्येश्वर मंडळ आहे. त्या मंडळाच्या मूर्तीची खासियत म्हणजे ही मूर्ती हनुमानाच्या रूपात आहे. कारण येथे एक मारुतीचे मंदिर आहे. मारुती आपल्या हृदयात राम व सीता आहे हे दाखवत असलेली डाव्या सोंडेची, चतुर्भुज आणि उभी गणेशमूर्ती येथे आहे. खेडकर यांनी बनविलेली ही मूर्ती ३५ वर्षे जुनी आहे. सन्दर्भ : ▪︎ पुण्याचे सुखकर्ता ( स्वप्निल नहार, सुप्रसाद पुराणिक ) Instagram : ▪︎ @punesehai ▪︎ @travelwala.chora

सौ. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई श्री दत्त मंदिर, बुधवार पेठ - पुणे / Shrimati Lakshmibai Dagduseth Halwai Shree Datta Temple, Budhwar Peth - Pune

सौ. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई श्री दत्त मंदिर बुधवार पेठ, पुणे भक्तजनांचं केवळ गुरुवारीच नव्हे, तर दररोज गर्दी खेचणारं दत्तमंदिर म्हणजे बुधवार पेठेतील सौ. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई श्री दत्त मंदिर (संस्थान). त्याचं ऐश्वर्य काय वर्णावं ! हे दुमजली मंदिर अंतर्बाह्य सुंदर, श्रीमंत, किंबहुना देखणं आहे. रंगीबेरंगी सुगंधित फुलांनी सजवलेल्या तिथल्या नयनमनोहर दत्तमूर्तीपुढून हलू नये, असं भाविकांना वाटल्यास नवल नाही. कै. दगडूशेठ हलवाई आणि कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई हे सात्त्विक व धार्मिक प्रवृत्तीचे जोडपे होते. उत्तरप्रदेशातून ते पुण्यात येऊन स्थायिक झाले. पुण्यात ब्रिटिश काळात जी मोठी प्लेगची साथ आली होती, तेव्हा साथीमध्ये अनेक माणसे मृत्युमुखी पडली. दगडूशेठ हलवाईंच्या घरातीलही काही लोक दगावले. तेव्हा प्लेगने मृत्युमुखी पडलेल्यांना ब्रिटिश सरकारने नुकसानभरपाई दिली होती. श्रीमती लक्ष्मीबाईंनाही काही रक्कम मिळाली. ही रक्कम स्वतःसाठी न वापरता त्याचा विनियोग चांगला व्हावा यासाठी त्यांनी त्यांचे गुरू माधवनाथ महाराज (इंदूर) यांना सल्ला विचारला. महाराजांनी श्री गुरुदेव दत्...

असे पडले वृत्तपत्राचे नाव "सकाळ"

असे पडले वृत्तपत्राचे नाव "सकाळ" सकाळ हे भारतातील पुणे शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र डॉ. नानासाहेब परुळेकर यांनी पुण्यात १ जानेवारी, १९३२ रोजी सुरू केले. दैनिक सकाळ पुणे शहरातील अव्वल क्रमांकाचे दैनिक आहे. या दैनिकाचे नाव सकाळ कसे पडले याची कहाणी रंजक आहे. नानासाहेब परुळेकर यांनी या वृत्तपत्राचे नाव काय असावे किंवा हे वृत्तपत्र लोकांपर्यंत कसे पोहोचेल, नवीन वृत्तपत्राची लोकांमध्ये उत्सुकता कशी निर्माण होईल याबाबत एक युक्ती लढविली. त्यांनी २० ऑक्टोबर, १९३१ रोजी केसरी, ज्ञानप्रकाश व काळ या वृत्तपत्रांमध्ये नव्या वृत्तपत्रासाठी नाव सुचवा ही जाहिरात प्रसिद्ध केली. दैनिकाला वाचकांनी नाव सुचवावे अशी स्पर्धा जाहीर करून त्यासाठी पहिल्या क्रमांकाला १५० रुपयांचे बक्षीस ठेवले तर दुसऱ्या क्रमांकालाही त्यांनी ५० रुपये बक्षीस जाहीर केले. सकाळच्या रौप्यमहोत्सवी अंकात स्वावलंबनाची कथा या लेखात परुळेकरांनी याविषयी लिहिले आहे, 'अमेरिकेतून शिकून आलेला हा गृहस्थ याला आपल्या पत्राचे नाव सुचत नाही मग हा लिहिणार काय? आणि पत्र चालविणार कस...

जुना बाजार, पुणे

जुना बाजार, पुणे " पुण्याच्या जुन्या बाजाराला पेशवाईपासूनचा, म्हणजेच साधारण दोनशे वीस वर्षांचा इतिहास आहे. मंगळवार पेठेत दर बुधवारी आणि रविवारी भरणाऱ्या या जुन्या बाजाराने अनेक दुर्मिळ वस्तूंची भेट दिली आहे. " प्रत्येक शहरात एक जुना बाजार असतो. जो त्या शहराची ओळख, अविभाज्य घटक असतो. तसा पुण्याचाही आहे. मंगळवार पेठेत शिवाजी पुलाचा (नवा पूल) शनिवारवाड्याच्या बाजूला जिथे शेवट होतो, तिथून जवळच हा बाजार भरतो. काकासाहेब गाडगीळांच्या पुतळ्यापासून आपण रेल्वे स्टेशनकडे जाताना कुंभारवाड्याच्या समोर स्त्याच्या बाजूला दर रविवारी आणि बुधवारी हा बाजार न चुकता भरतो. त्यापूर्वी जुन्या बाजाराच्या जागा दोन-तीन वेळा बदलल्या. इथल्या लोकांच्या म्हणण्यानुसार आणि डॉ. अनिल अवचट यांच्या ‘पुण्याची अपूर्वाई’ या पुस्तकातील नोंदींनुसार पेशवाईनंतर हा बाजार शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणात भरू लागला. नंतर नव्या पुलाखाली, आता महानगरपालिका आहे तिथे गेला. पूर्वी गुरांचा बाजारही तिथेच होता. जो नंतर गुलटेकडीला हलवला, मग हा बाजार शिवाजी आखाड्याच्या जागी गावठाणात हलला. शेवटी मंगळवार पेठेत आताच्या जागी स्थिरावला. पेश...

पुण्याला लाभले एक थोर मूर्तीकार - कै. श्री. नागेश शिल्पी (१९३५ - २०१०)

पुण्याला लाभले - एक थोर मूर्तीकार !! कै. श्री. नागेश शिल्पी (१९३५-२०१०) तसे पहायला गेलं तर खूप मूर्तीकार आहेत, पण त्यातील एक म्हणजे जगप्रसिद्ध मूर्तिकार कैलासवासी श्री. नागलिंग शंकराप्पा आचार्य शिल्पी पंडित उर्फ कैलासवासी श्री. नागेश शिल्पी (१९३५-२०१०) . पुण्यातील गणपती आणि मूर्तीकार कैलासवासी श्री.नागेश शिल्पी यांचे एक नाते आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांनी घडवलेल्या पैकी ८ मूर्त्या या पुण्यात विराजमान आहेत. यांनी साकारलेली सर्वांगसुंदर अद्वितीय गणेश मंडळांच्या मूर्ती मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (तिसरी मूर्ती) , जिलब्या मारुती गणपती,  निंबाळकर तालीम मंडळ, गजानन मंडळ,  गरुड गणपती मंडळ,  माती गणपती, जगोबादादा तालीम  मंडळ, मार्केटयार्ड शारदा गणेश मंडळाची. ह्या ८ मूर्त्या पुण्यात विविध ठिकाणी विराजीत आहेत. तसेच त्वस्टा कासार समाज पुणे, श्री गणेश तरुण मंडळ गणपती चौक तळेगाव दाभाडे, अमर मित्र मंडळ सासवड, जय गणेश मंडळ कराड, गजानन मित्र मंडळ महाड, अशा मिळून पुण्यात  १३ गणपतीच्या मुर्त्या कै.श्री.नागेश शिल्पी यांनी घडवल्या. त्या स...