Skip to main content

सौ. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई श्री दत्त मंदिर, बुधवार पेठ - पुणे / Shrimati Lakshmibai Dagduseth Halwai Shree Datta Temple, Budhwar Peth - Pune


सौ. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई श्री दत्त मंदिर
बुधवार पेठ, पुणे

भक्तजनांचं केवळ गुरुवारीच नव्हे, तर दररोज गर्दी खेचणारं दत्तमंदिर म्हणजे बुधवार पेठेतील सौ. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई श्री दत्त मंदिर (संस्थान). त्याचं ऐश्वर्य काय वर्णावं ! हे दुमजली मंदिर अंतर्बाह्य सुंदर, श्रीमंत, किंबहुना देखणं आहे. रंगीबेरंगी सुगंधित फुलांनी सजवलेल्या तिथल्या नयनमनोहर दत्तमूर्तीपुढून हलू नये, असं भाविकांना वाटल्यास नवल नाही.

कै. दगडूशेठ हलवाई आणि कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई हे सात्त्विक व धार्मिक प्रवृत्तीचे जोडपे होते. उत्तरप्रदेशातून ते पुण्यात येऊन स्थायिक झाले. पुण्यात ब्रिटिश काळात जी मोठी प्लेगची साथ आली होती, तेव्हा साथीमध्ये अनेक माणसे मृत्युमुखी पडली. दगडूशेठ हलवाईंच्या घरातीलही काही लोक दगावले. तेव्हा प्लेगने मृत्युमुखी पडलेल्यांना ब्रिटिश सरकारने नुकसानभरपाई दिली होती. श्रीमती लक्ष्मीबाईंनाही काही रक्कम मिळाली. ही रक्कम स्वतःसाठी न वापरता त्याचा विनियोग चांगला व्हावा यासाठी त्यांनी त्यांचे गुरू माधवनाथ महाराज (इंदूर) यांना सल्ला विचारला. महाराजांनी श्री गुरुदेव दत्त मंदिराची उभारणी करण्यास सांगितले.

४ जुलै १९०४ रोजी (त्यातून) हे दत्तमंदिर स्थापन झाले. हे संगमरवरी मंदिर दोन मजली असून अंतर्बाह्य देखणे आहे. रंगीबेरंगी, सुगंधित फुलांनी दत्तमूर्ती सजविलेली असते. मंदिरात प्रदक्षिणा मार्गातसुद्धा सर्वत्र 'चंदेरी' वातावरण आहे. भिंतीवर श्री दत्ताच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांची तैलचित्रे लावलेली आहेत. इथे दत्तजयंती, दत्तस्थापना दिन व गुरुपौर्णिमा खूप मोठ्याने साजरी केली जाते. 

दत्तभक्तांनी नित्य गजबजलेलं हे दगडूशेठ मंदिर म्हणजे पुण्यनगरीचं खरोखरीच भूषण आहे.

सन्दर्भ :
▪︎ असे होते पुणे ( म. श्री. दीक्षित )
▪︎ पुणे शहरातील मंदिरे ( डॉ. शां. ग. महाजन )

Comments

Popular posts from this blog

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ ज...

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) / Sardar Shitole Wada ( Kasba Peth, Pune )

सरदार शितोळे वाडा ( कसबा पेठ, पुणे ) या ऐतिहासिक वास्तूचे मूळ मालका राजा राजेंद्र शितोळराजा या सिसोदिया राजघराण्यातील वंशज आहेत. हे घराणे सुमारे बाराशे वर्षापूर्वी उत्तरेकडून येऊन स्थानिक झालेत, अनेक शतके त्यांची देशमुखीचे अखंडित हक्क होते. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, हडपसर, वानवडी, मांजरी, मोशी यासारख्या सुमारे साडेतीनशे गावांचे ते इनामदार होते. आज २१ व्या शतकात देखील त्या-त्या गावातून जमिनींचे मालक म्हणून शितोळे देशमुखांच्या नोंदी आळतात. पुण्याचा शनिवारवाड्या खालचं भूखंड , ही सरदार शितोळे देशमुखांची शेतजमीन होती. शनिवारवाडा बांधण्यासाठी पेशव्यांना हा भूखंड शितोळे सरकारांनी दिला होता, त्याच्या मोबदल्यात पेशव्यांकडून त्यांना बाणेर व जवळार्जुन येथील जामिनी देण्यात आल्या. पुढे सरदार शितोळे यांच्या जहागिरी मध्यप्रदेशातील होशंगाबाद, शहाजाबाद, खंडवा, सोनपत, पानिपत, नरवर , उज्जैन, गवाल्हेर इत्यादी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्हयाबरोबरच खानदेशापर्यंत विस्तारल्या होत्या. या घराण्यातील व्यक्तीला या वास्तूत नरसिंहाचा दृष्टांत झाला होता. अर्थात नरस...

Mahadev Kashinath Gokhale / महादेव काशिनाथ गोखले

महादेव काशिनाथ गोखले पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा शर्ट, चड्डी, तोंडावर कधी एकदा तुमचा अपमान करू असे भाव, काटक शरीर. आता त्यांचं वैशिष्ठ्य काय अस तुम्ही विचाराल तर त्याची लाईन खूप मोठी आहे, ऐकून तुम्हाला दम भरेल. नाव महादेव काशिनाथ गोखले , जन्म १९०७ साली झाला असावा. राहायला सदाशिव पेठ पुणे. शिक्षण- चौथी व्यवसाय- बुक बाइंडीग आणि वर्तमानपत्र विकणे, छंद- अचाट गोष्टी करणे. आता परवा पर्यंत म्हणजे २०१० पर्यंत ते भरतनाट्यमंदिर जवळच्या एका छोट्याशा दुकानात ते दिसायचे. म्हणजे काय तर  टिळकांच्या काळापासून ते मनमोहनसिंग यांचा काळ त्यांनी जवळून पाहिला. महादेव गोखलेंना बाबुराव म्हणून ओळखत. तर हे बाबुराव रोज पहाटे 3.३० वाजता उठायचे. पेरूगेटजवळच्या आपल्या घरापासून धावायला सुरु करायचे ते थेट कात्रजमार्गे खेड-शिवापूर, तिथून डायरेक्ट सिंहगड  मग परत खडकवासला मार्गे पुण्यात पेरूगेटच्या दुकानात ९च्या ठोक्याला हजर. हा दिनक्रम वयाच्या ...