श्री कृष्ण मंदिर, निगडी
पिंपरी-चिंचवड - पुणे
पिंपरी-चिंचवड परिसरात निगडी येथे श्रीकृष्णाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या भव्य मंदिराचे बांधकाम दाक्षिणात्य शैलीत केलेले आहे. या मंदिरात १९८७ मध्ये श्रीकृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. १९९३ मध्ये येथे भव्य मंदिर बांधण्यात आले. येथे भव्य ध्वजस्तंभ बांधलेला आहे. या मंदिराच्या आवारात नवग्रह, गणपती, अय्याप्पा, हनुमान, वैष्णवदेवी, सुब्रमण्यम, नागदेवता ही मंदिरे आहेत. सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांकरिता येथे मोठा सुसज्ज हॉल बांधण्यात आलेला आहे. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत येथे दहा पूजांचे आयोजन केले जाते. या मंदिराचा प्रसन्न परिसर भाविकांना मोहून टाकतो. या मंदिरातील दर्शनाची वेळ पहाटे ५ ते सकाळी ११.३० पर्यंत व संध्याकाळी ५ ते रात्री ८.४५ पर्यंत आहे.
माहिती स्त्रोत :
▪︎ सफर ऐतिहासिक पुण्याची ( संभाजी भोसले )
Instagram :
▪︎ @punesehai
▪︎ @travelwala.chora
Comments
Post a Comment