Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

Sati Ramabai Peshwa Memorial , Theur / सती रमाबाई पेशवा स्मारक , थेउर

सती रमाबाई पेशवा स्मारक , थेउर पुणे के हड़पसर गांव से २२ किमी की दूरी पर स्थित थेउर गांव में गणेश चिंतामणी मंदिर है। इसी परिसर से १-२ किमी की दूरी पर स्वर्गीय रमाबाई माधवराव पेशवा का स्मारक बनाया गया है। इसी स्मारक के के समक्ष गणेशजी की मूर्ति भी है। स्मारक के दाहिने ओर स्माशन भूमि भी स्थित है। हालाकि इस जगह का ज्ञान काफी कम लोगो को है। यह स्मारक मुला-मुठा नदी के तट पर बनाया गया है। इतिहास रमाबाई पेशवा ( १७५०-१७७२ ) , ( प्रथम ) माधवराव पेशवा की पत्नी थी। उनका विवाह ९ दिसंबर १७५८ को माधवराव पेशवा के साथ पुणे में हुआ था। वह सोलापूर के शिवाजी जोशी की पुत्री थी। वह एक धार्मिक एवं आध्यात्मिक प्रवित्ती वाली महिला थी। वह हमेशा श्रीवर्धन-हरिहरेश्वर जैसे तीर्थयात्राओ पर जाती रहती थी। उन्होने सामाजिक या राजनीतिक मामलों में कभी हस्तक्षेप नहीं किया। वह हमेशा माधवराव के लिए उपवास रखा करती थी। इस दंपति को कोई संतान नहीं थी। १७६६-१७६७ में कर्नाटक अभियान के दौरान वह माधवराव के साथ ही थी। इसी अभियान के दौरान माधवराव के स्वास्थ्य पर भी प्रभाव पड़ने लगा था। जून

बुधवार पेठ , पुणे / Budhwar Peth, Pune

बुधवार पेठेचा इतिहास , पुणे सन १७०३ मध्ये औरंगजेबाने ही पेठ वसवली. औरंगजेब जेव्हा महाराष्ट्राच्या स्वारीवर होता त्यावेळेस त्याच्या सैन्याचा मुक्काम येथे होता. मुही उत मिलत नावाचा औरंगजेबाचा एक नातू पुण्यात मेला होता त्याच्या स्मरणार्थ म्हणून या पेठेचे नाव औरंगजेबाने मुहीयाबाद असे ठेवले होते. पुण्याचे नाव सुद्धा याच काळात बदलून मुहीयाबाद ठेवण्यात आले. पुढे माधवराव पेशव्यांच्या काळात साधारण सन १७६१ च्या दरम्यान गोविंद श्रीराम खासगीवाले यांच्याकडे या पेठेचे शेटेपण आले आणि त्यांनी या पेठेची पुनर्रचना केली. रस्त्यांचे रुंदीकरण आणि व्यापारी वर्गाला प्रोत्साहन देणे ही कामे खासगीवाले यांनी केली त्यामुळे अल्पावधीतच पुण्यातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र म्हणून ही पेठ उदयाला आली.  पुढे दुसऱ्या बाजीरावाच्या काळात बुधवार वाडा या पेठेत बांधण्यात आला. नाना फडणीस यांनी बेलबागेत विष्णू मंदिर बांधले. मंदिरांचा मोठा समूह असणारी तुळशीबाग, कोतवाल चावडी आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर अशी अनेक बांधकामे येथे झाली.  सन १७९५ मध्ये प्रसिद्ध तुळशीबाग मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. जवळ जवळ ३० वर्

Vishrambaug Wada , Pune / विश्रामबाग वाडा , पुणे

 विश्रामबाग वाड्याचा इतिहास , पुणे  श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवे यांनी हा वाडा सन १८०७ रोजी बांधला. सदाशिव पेठेत ज्या ठिकाणी हा वाडा बांधला आहे त्या ठिकाणी पूर्वी हरीपंत फडके यांच्या मालकीची मोठी बाग होती. ती जागा सन १७९९ मध्ये दुसऱ्या बाजीरावाने विकत घेतली आणि पुढे आपल्या निवासस्थानासाठीम्हणून वाडा बांधायला घेतला. या वाड्याच्या बांधकामास सन १८०३ मध्ये सुरुवात झाली व तो सन १८०९ मध्ये संपूर्ण बांधून झाला. या वाड्याच्या बांधकामासाठी २,००,५४० रुपये इतका खर्च आला. शिवाय हौद व मोरी बांधण्यास १४००० रुपये लागले. वाड्याच्या नैऋत्य दिशेस पुष्करणीचा  हौद बांधला त्यास ८५०० रुपये इतका खर्च आला. हा वाडा २६० फूट लांब व ९० फूट रुंद आहे. दुर्दैवाने या वाद्याचा उपभोग बाजीरावास फक्त ८ वर्षे घेता आला. वाड्याच्या पहाऱ्यासाठी जो बंदोबस्त ठेवला जात असे त्यासाठी मासिक खर्च हा ४०० रुपये इतका येत होता. इंग्रजांनी सन १८१८ मध्ये पुणे ताब्यात घेतल्यावर पुढे २ वर्षे या वाड्यास कुलूप होते.त्यांनतर सन १८२१ मध्ये इंग्रज सरकारकडून या वाड्यात संस्कृत कॉलेजची स्थापना करण्यात आली. या संस्कृत कॉलेज

Veer Mavala - Shiva Kashid / वीर मावळा - शिवा काशीद

वीर मावळा - शिवा काशीद शिवा काशीद हे शिवाजी राज्यांच्या सैन्यात न्हावी होते . त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले , म्हणून शिवाजीराजे सिद्दी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप निघाले व विशाळगडावर पोहचले. हे शिवा काशीद हुबेहूब शिवाजीराजांसारखे दिसत असत . त्यांना पोशाखही शिवाजी महाराजांचा दिला होता . त्यामुळे सिद्दी जोहरच्या सैनिकांनीपालखीत बसलेल्या आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवा काशीदांना , शिवाजी राजे समजून पकडले आणि सिद्दीकडे नेले . मात्र , हे शिवाजी नाहीत असे कळताच जोहरने त्यांच्या पोटात तलवार खूपसली . ही घटना १२ - १३ जुलै १६६० या दिवशीघडली . या शिवा काशीद नावाच्या मर्द मावळ्याची दुरवस्थेतील समाधी पन्हाळगडाच्या पायथ्याशी , विशाळगडाकडे जाणाऱ्या वाटेतील एका गावापाशी आहे . नेबापूरच्या ( चव्हाण ) " पाटलांनी " शिवा काशिदांना प्रति शिवाजी महाराज बनण्याची कल्पना दिली होती . ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नेबापूर ( चव्हाण ) पाटील आणि शिवा काशीद यांनी शिवाज

Trisund Ganpati Temple / त्रिशुंड गणपती मंदिर

त्रिशुंड गणपती मंदिर तीन सोंड असल्याने त्रिशुंड या नावाने हा गणपती प्रसिद्ध आहे. तीन सोंड आणि सहा हात असलेल्या अशा या सुंदर विनायकाचे मंदिर सोमवार पेठ, घर क्रमांक १३९ येथे नागझरीच्या काठी आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर अत्यंत सुंदर कोरीव काम आहे. प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूंना विष्णूच्या जय-विजय या द्वारपालांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. इथले सर्वात वेगळे आणि एकमेवाद्वितीय असे म्हणता येईल असे जे शिल्प आहे ते एकशिंगी गेंड्याचे. काही शिपाई हे गेंड्याला साखळदंडाने बांधताना दिसत आहेत. मंदिराच्या पाठीमागील बाजूस आगळ्या पद्धतीचे सहसा कुठेही न आढळणारे शिवलिंग आहे. ही लिंगोद्भव शिवप्रतिमा आहे. यात फक्त शाळुंका असून वरच्या दिशेने उडणारा हंस, खाली मुसंडी मारणारा वराह आणि शिवलिंगावर छत्र धरणारा नाग अशा प्रतिमा कोरलेल्या आहेत. पुराणातील एका कथेवर हे शिल्प आधारीत आहे. हे सर्व बघूनच मंदिराच्या आत प्रवेश केला. आतमध्येच एक तळघर असून ते फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच उघडले जाते अशी माहिती मिळाली. तळघरात नेहमीच कंबरभर पाणी असते. गर्भगृहाच्याही दोन्ही ब

Junglee Maharaj Temple ( Samadhi ) , Shivajinagar / जंगली महाराज मंदिर ( समाधी ) , शिवाजीनगर

स्थळ : जंगली महाराज रस्ता , शिवाजीनगर , पुणे शहर चित्र क्रमांक १ : श्री जंगली महाराज प्रवेशद्वार चित्र क्रमांक २ : श्री जंगली महाराज समाधी, ध्वजस्तंभ जंगलीमहाराज म्हटले की, ते पुण्याचेच अशीही एक सर्वसामान्य समजूत आहे. तीही चुकीची आहे, असे म्हणता येणार नाही, कारण महाराजांचे वास्तव्य बराच काळ पुण्यातच होते आणि त्यांचे बरेचसे कार्यही पुण्यातच झाले आहे. जंगली महाराज हे अलीकडील काळातील संत असूनही त्यांच्या जीवनचरित्राचा फारसा तपशील जनसामान्यांना माहीत नव्हता. तो उपलब्ध करून घेण्यासाठी पुण्यातील चित्रकार डी. डी. रेगे यांनी जवळपास बारा वर्षे संशोधन करून बरीच माहिती गोळा केली. त्यासाठी ते महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील विविध भागांत गेले, जंगलीमहाराजांच्या शिष्यप्रशिष्यांना भेटले, त्यांच्या घराण्यातील लोकांना भेटले, अनेक उर्दू, फार्सी, मोडी दस्तावेजांचा त्यांनी धांडोळा घेतला. सुप्रसिद्ध इतिहास-संशोधक डॉ. ग. ह. खरे यांच्यासारख्या चिकित्सक अभ्यासकांशी चर्चा केली. मंदिर परिसर : पुण्यनगरीत सद्गुरू श्री जंगली महाराज मंदिर हे एक पावन व अग्रगण्य स्थान आहे. जिमखान्यावरून निघा