मच्छिंद्रगड सुळका मुरबाड मधील पसरलेल्या आहुपे या सह्याद्रीरांगेम्ध्ये गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे दोन सुळके लक्ष वेधुन घेतात. गोरखनाथ आणि मच्छिंद्रनाथ या गुरु-शिष्यांमुळे या दोनही सुळक्यांना गोरखगड आणि मच्छिंद्रगड अशी नावे देण्यात आली. हे स्थान नाथपंथीयांना अतिशय प्रिय आहे. मच्छिंद्रगडाची चढाई बिकट आणि अवघड असल्याने तांत्रिक साधनांशिवाय या किल्ल्याची चढाई करणे कठीण आहे. श्रीमद भागवतात उल्लेख केल्या प्रमाणे श्री वृषभ देवांच्या शंभर पैकी "नऊ नारायण " त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मत्स्येंद्रनाथ जी होय. श्री नवनाथ कथासार या मालू कवी विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला आणि " श्री मत्स्येंद्र " हे नाम धारण केले. श्री मत्स्येंद्रनाथ जी हे नाथ पंथाचे आद्य नाथाचार्य होत. कौल मताचे व हठयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या " कौलज्ञाननिर्णय " नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते. मध्ययुगातील भक्तिचळवळींमध्य...