Skip to main content

Posts

श्री तुळशीबाग गणपती, पुणे / Shri Tulshibaug Ganpati, Pune

श्री तुळशीबाग गणपती ( मनाचा चौथा गणपती ) बुधवार पेठ - पुणे पुण्यात बुधवार पेठेत तुळशीबागेतील पेशवेकालीन श्रीरामाचे प्रसिद्ध मंदिर हे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. अनेक वर्षांपासून तुळशीबाग ही महिलांच्या आकर्षणाचे केंद्र असलेली बाजारपेठ. फक्त पुणेकरांमध्येच नव्हे, तर पुण्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये तुळशीबागेची क्रेझ असते. येथील तुळशीबाग मंडळाचा गणपती म्हणजे पुण्यातील हा मानाचा चौथा गणपती. तुळशीबागेतल्या मोक्याच्या आणि गर्दीच्या भागात हा गणपती बसतो. १३ फूट उंचीची भव्य गणेशमूर्ती हे मंडळाचे आकर्षण आहे. १९०१ मध्ये मंडळाची स्थापना केली आहे. तुळशीबागेचा गणपती चार हातांचा असून डाव्या सोंडेचा आहे. वरील दोन हातात पाश, अंकुश असून खालील डाव्या हातात मोदक तर उजवा हात अभयमुद्रेत आहे. मंडळ गणेशोत्सवात आकर्षक सजावट करते. या भव्य गणपतीच्या पिछाडीस एक छोटा पेशवेकालीन गणपती पहायला मिळतो. स्वातंत्र्यपूर्व काळात गणेशोत्सवात पोवाडे, मेळे असे कार्यक्रम गणेशोत्सवात आयोजित केले जात. अनेक मान्यवर लोकांची भाषणे, लोकनाट्येदेखील होत असत. थोर शास्त्रीय गायकांचे गायनदेखील येथे झाले आहे. तुळशीबाग गणेशोत्स...

श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, पुणे / Shree Tambadi Jogeshwari Ganpati, Pune

श्री तांबडी जोगेश्वरी गणपती ( मनाचा दूसरा गणपती ) बुधवार पेठ - पुणे बुधवार पेठेत अप्पा बळवंत चौकाजवळ ग्रामदेवी तांबडी जोगेश्वरी देवीमंदिर आहे. सध्या भर वस्तीत असलेला काही शतकांपूर्वी पुणे अगदीच छोटे गाव असताना हा भाग गावाबाहेर लांब होता. तेव्हा या भागातून आंबील ओढा वहात असे. त्याकाळी ओढ्याकाठी देवीची मूर्ती होती. देवीचे मंदिर पेशवेकालीन असावे. काही वर्षांपूर्वी शेंदराचे कवच निखळल्यावर देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन झाले. देवीची मूळ मूर्ती चतुर्भुज असून उभी आहे. योगेश्वरीचे म्हणजेच जोगेश्वरीचे उल्लेख पुराणातही सापडतात. महिषासूराच्या बारा सेनापतींपैकी देवीने ताम्रासुराचा वध केला म्हणून ताम्रवर्णी योगेश्वरी म्हणजेच 'तांबडी जोगेश्वरी' नाव पडले असे म्हटले जाते. देवी शेंदुरलिप्त असते म्हणूनही तांबडी जोगेश्वरी म्हटले जाते. श्रीमंत पेशवे येथे देवी दर्शनास येत असत. अशा या ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी देवीच्या गणेश मंडळास पुण्याच्या गणेशोत्सवात मानाचे दुसरे स्थान प्राप्त झाले आहे. शतकोत्तर रौप्य महोत्सव मंडळाने साजरे केले आहे. सुरुवातीला देवीच्या मंदिरातील विष्णू मंदिरासमोरील ज...

श्री क्षेत्र फुरसुंगी, पुणे / Shri Kshetra Fursungi, Pune

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि श्री संत लिंबराज महाराज ( फुरसुंगीकर ) यांची समाधी,  श्री क्षेत्र फुरसुंगी - पुणे १६ व्या शतकात फुरसुंगी येथील हरपळे घराण्यात श्री संत लिंबराज महाराज या थोर युगपुरूषाचा जन्म झाला. संपूर्ण आयुष्य विठ्ठल नामास अर्पण केल्यानंतर त्यांनी अखेर आपल्या या जन्म गावीच चैत्र शुद्ध तृतीयेस संजीवन समाधिष्ठीत होवून आपल्या कार्याची सांगता केली. अशा या थोर महात्म्याच्या हातून या विठ्ठल-रुख्मीणी मंदिराची स्थापना झाली. श्री संत तुकाराम महाराज यांच्याशी अनेकदा किर्तन प्रवचनाच्या निमित्ताने त्यांचे संबंध आले. तेव्हापासून ते आताच्या या चालु पिढीपर्यंत या घराण्यात वारकरी संप्रदाय परंपरेने चालत आला. या घराण्यात चालत आलेल्या अनेक थोर पुरूषांनी ग्रंथ निर्मितीचे कार्यही केले. संशोधन खात्यात त्यातील काही " भक्तप्रताप " सारखे ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. तर काही काळाच्या ओघात नाहीसेही झाले आहेत. सन १७७२ साली या घराण्यातील चौथ्या पिढीतील वंशजाचा नानासाहेब पेशवे यांचेकडुन मोत्याचा कंठा व मोहरा देवून सत्कार करण्यात आला. याच घराण्यातील सातव्या पिढीत वै.ह.भ.प.विठ्ठल महा...

Vijaya Vitthala Mandir, Hampi ( Karnataka )

Vijaya Vitthala Mandir, Hampi Vitthalapura is situated on the southern bank of river Tungabhadra, at a distance of 2 kilometers northeast of Virupaksha Mandir. It has two approaches, one through the river side path on the west coming from the Virupaksha Bazaar and the other through the path coming from Talarighat Gateway from the east. The principal structure of this urban sector is the temple of Vitthala, a form of Vishnu. The foundation date of this mandir is not known. However, it is known to have been in existence during the time of Devaraya II ( 1422-46 AD ). The Vitthala Mandir, also known as Vijaya Vitthala Mandir is, no doubt, the finest of the Vijayanagara monuments built at Hampi. The temple is unfinished, at the same time has suffered much damage due to human vandalism. Built facing east, the mandir occupies the center of a huge courtyard measuring 165m x 95m. The principal components of the main structure are the sanctum, the vestibule, circum - ambulatory path,...

List Of Devi Mandirs ( Temples ) In Pune

List Of Devi Mandirs ( Temples ) In Pune : 1. Chaturshrungi Devi Mandir, SB Road 2. Tukai Mata Mandir, Baner Hill 3. Vaishnav Devi Mandir, Pimpri 4. Padmavati Devi Mandir, Alandi 5. Kali Bari Mandir, Khadki 6. Vana Devi Mandir, Karve Nagar 7. Shrikali Chamunda Devi Mandir, Deccan 8. Tukai Devi Mandir, Kasba Peth 9. Mahakali Devi Mandir, Kasba Peth 10. Yamai Devi Mandir, Kasba Peth 11. Tambadi Jogeshwari Mandir, Budhwar Peth 12. Astabhuja Devi Mandir, Budhwar Peth 13. Kali Jogeshwari Mandir, Budhwar Peth 14. Astabhuja Devi Mandir, Shaniwar Peth 15. Bhavani Mata Mandir, Bhawani Peth 16. Telfala Devi Mandir, Bhawani Peth 17. Pivali Jogeshwari Mandir, Bajirao Road 18. Mahalakshmi Devi Mandir, Swargate 19. Dashmukhi Mata Mandir, Swargate 20. Tulja Bhawani Mandir, Taljai Hills 21. Saptshrungi Devi Mandir, Bibewadi 22. Santoshi Mata Mandir, Katraj 23. Waghjai Mata Mandir, Sukhsagar Nagar 24. Amba Mata Mandir, Sukhsagar Nagar 25. Mahalkshmi Mata Mandir, Hadapsar 26. Tukai Mata Mand...

सरसेनापती दाभाडे वाडा, तळेगाव दाभाडे ( जि. पुणे ) / Sarsenapati Dabhade Palace ( Wada ), Talegaon Dabhade ( Dist. Pune )

सरसेनापती दाभाडे वाडा, तळेगाव दाभाडे पुणे-मुंबई महामार्गावरील तळेगाव दाभाडे या गावी सरसेनापती दाभाडे यांचा एक भव्य वाडा आहे. ते म्हणजे सरसेनापती दाभाडे वाडा ( जुना राजवाडा ). तळेगाव येथील वाडे जवळ-जवळ पडीक अवस्थेत असून ते नामशेष होण्याचा मार्गावर आहेत. त्यांचे उरले-सुरले अस्तित्व आपल्याला पोस्ट मधल्या छायाचित्रांच्या माध्यमातुन लक्षात येईल. हत्ती जातील असा वाड्याचा मुख्य दरवाजा, भव्य विशाल बुरुज, पडीक अवस्थेतील तटबंदी, इमारतींची जोती, काही भिंतींचे अवशेष पाहिल्यावर त्यांचे सरदारी स्वरुप आपल्या नजरेसमोर उभे राहते. पुणे जिल्ह्यात सरसेनापती दाभाडे यांचे वाडे कुठे-कुठे आहे ? १. इंदोरी २. तळेगाव दाभाडे ३. सोमवार पेठ ( पुणे शहर ) सन्दर्भ : १. महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे - भाग पहिला ( डॉ. सदाशिव शिवदे )

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, पुणे / Shrimant Bhausaheb Rangari Ganpati, Pune

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बुधवार - पुणे भाऊसाहेब उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे म्हणजेच भाऊसाहेब रंगारी हे सार्वजनिक गणेशोत्सवातील एक महत्त्वाचे नाव. ते पुण्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते. भाऊसाहेब रंगारी राजवैद्य होते. त्यांचा वाडा बुधवार पेठेत तांबडी जोगेश्वरी मंदिर व शनिवारवाडा या दोन वास्तूंमध्ये आहे. त्यांचा दवाखाना देखील याच वाड्यात होता. त्यांचा परंपरागत व्यवसाय हा शालूंना रंग देण्याचा होता. त्यावरून "रंगारी" हे उपनाव पडलं होतं. शालूंवरून तेथील बोळास "शालूकर बोळ" म्हणून नाव होते. क्रांतीकारी चळवळीमध्ये भाऊसाहेब रंगारी यांचा सक्रीय सहभाग होता. सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते असलेल्या भाऊ रंगारींचे मार्गदर्शन अनेक क्रांतीकारकांना लाभले. कृष्णाजी काशिनाथ खासगीवाले उर्फ नानासाहेब खासगीवाले ग्वाल्हेरला गेले असता तिथे त्यांनी सार्वजनिक स्वरूपात थाटात गणेशोत्सव साजरा होताना पाहिला आणि त्यानंतर त्यांना पुण्यात असा उत्सव सुरू व्हावा असे वाटू लागले. त्यानंतर भाऊ रंगारी, खासगीवाले व घोटवडेकर यांनी प्रथम सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला. १८९२ मध्ये स्थापलेला हा ह...

कै. श्रीमंत दगडूशेठ हलवाई / Late. Shrimant Dagluseth Halwai

कै. श्रीमंत दगडूशेठ हलवाई १९ व्या शतकातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी म्हणून ओळखले जाणारे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, आपण काही काळजी करू नका, आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्‍ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्‍ज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ ह...

मानाचे गणपती, पुणे / Manache Ganpati, Pune

मानाचे गणपती, पुणे संपूर्ण महाराष्ट्रासह भारतात आणि भारता बाहेर गणेशोत्सव उत्साहात साजरा केलाच जातो. पण पुण्यातला गणेशोत्सवामध्ये काही वेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. त्यातलीच एक म्हणजे मानाच्या पाच गणपतींची परंपरा. १८९३ सालापासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा त्यामागे होती. पण स्वातंत्र्य मिळेपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा समाजात रुजली होती आणि स्वातंत्र्यानंतरही या सणाचा उत्साह आणि चैतन्य कायम राहिला. यामध्ये काळानुरुप काही बदल निश्चितच झाले. पण १२५ पेक्षा जास्त वर्षं उलटल्यावरही मानाच्या पाच गणपतींची परंपरा पुण्यात तितक्याच बारकाईने पाळली जाते. ही पद्धत सुरु कशी झाली, मानाच्या गणपतींच्या पाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा इतिहास काय आहे, हे आपण जाणून घेऊया. १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाल्यानंतर गणपती मंडळांची संख्या वाढत गेली. असं सांगितलं जातं की दुसऱ्याच वर्षी गणपती मंडळांची संख्या १०० वर गेली होती. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीचं नियोजन आणि त्याची रुपरेषा कशी असावी यावर चर्चा सुरु झाली. कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत मान...

गुरुजी तालीम गणपती, पुणे / Guruji Talim Ganpati, Pune

श्री गुरुजी तालीम गणपती (  पुण्याचा राजा ) मनाचा तीसरा गणपती बुधवार पेठ - पुणे पुण्यातील मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम गणपतीचे यंदा १३६ वे वर्ष आहे. या गणपतीला आजुन एका नावानं ओळखला जातं - ते म्हणजे " पुण्याचा राजा" . १८८७ साली भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाची मुहुर्तमेढ रोवली. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधीपासून या गणपतीचा उत्सव सुरू झाला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो. पुण्यात असलेल्या एका तालमीमध्ये हा गणपती बसविण्यास सुरवात झाली होती. आता तालीम अस्तित्वात नाही. मूषकारूढ स्वरूपातील शाडूच्या मातीची मूळ मूर्ती १९७२ साली बनवण्यात आली होती. मंडळाचे कार्यकर्ते आणि तत्कालीन नगरसेवक श्यामसिंग परदेशी यांच्या पुढाकारातून ही मूर्ती घडवून घेतली गेली होती. दरवर्षी रंग देऊन ती मूर्ती उत्सवात ठेवली जात होती. काही वर्षापुर्वी फायबरची मूर्ती तयार करून घेण्यात आली. हीच मूर्ती आता सांगता मिरवणुकीत ठेवण्यात येते. मुर्तीसाठी दहा किलो सोन्याचे आणि वीस किलो चांदीचे दागिने कार्यकर्त्यांच्या सह...