श्री भेकराई माता मंदिर, भेकराईनगर, हडपसर - पुणे / Shree Bhekrai Mata Mandir, Bhekrai Nagar, Hadapsar - Pune
श्री भेकराई माता मंदिर भेकराईनगर, हडपसर - पुणे येडाई, गांजाई, मळाई, फिरंगाई अशी देवीची नावे आपण सतत ऐकत असतो. पण ही नावे अशी का पडली किवा का प्रचलित झाली हे आपल्याला माहित नसते. अशाच प्रकारचे अजून एक नाव म्हणजे भेकराई. वाघजाई ह्या नावामध्ये "वाघ" शब्द येतो; म्हणून पडल्याचे आपण ऐकतो; तसेच भेकराई हे भेकर म्हणजे हरिण यावरून पडले असावे काय? भेकर हे सारंग कुळातील हरिण होय. हडपसरकडून सासवडकडे जाताना उजव्या बाजूस आधी तुकाई मातेचे मंदिर लागते. तेथून सासवडकडे जाऊ लागले, की बस डेपोच्या जवळच भेकराई देवीचे मंदिर आहे. हा परिसर भेकराईनगर म्हणूनच ओळखला जातो. ज्या टेकडीवर तुकाइचे मंदिर आहे, त्याच टेकडीवर भेकराईचेही मंदिर आहे. तुकाईच्या मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात, तर भेकराईचे मंदिर तेवढ्या उंचीवर नसल्याने मंदिरापर्यंत थेट गाडीने जातात येते. हे मंदिर प्रशस्त आहे. येथे देवीची दोन हातांची दोन ते अडीच फूट उंच मूर्ती आहे. देवी उभी असून, उजव्या हाताखाली मानवाकृती आहे; परंतु मूर्तीचे स्वरूप व ती मानवाकृती कोणाची हे स्पष्ट होत नाही. देवीची मूर्ती शेंदूरलिप्त आहे. देवीच्या ड...