Skip to main content

Posts

Showing posts from 2022

श्री तुळशीबाग गणपती, पुणे / Shri Tulshibaug Ganpati, Pune

श्री तुळशीबाग गणपती ( मनाचा चौथा गणपती ) बुधवार पेठ - पुणे पुण्यात बुधवार पेठेत तुळशीबागेतील पेशवेकालीन श्रीरामाचे प्रसिद्ध मंदिर हे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. अनेक वर्षांपासून तुळशीबाग ही महिलांच्या आकर्षणाचे केंद्र असलेली बाजारपेठ. फक्त पुणेकरांमध्येच नव्हे, तर पुण्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये तुळशीबागेची क्रेझ असते. येथील तुळशीबाग मंडळाचा गणपती म्हणजे पुण्यातील हा मानाचा चौथा गणपती. तुळशीबागेतल्या मोक्याच्या आणि गर्दीच्या भागात हा गणपती बसतो. १३ फूट उंचीची भव्य गणेशमूर्ती हे मंडळाचे आकर्षण आहे. १९०१ मध्ये मंडळाची स्थापना केली आहे. तुळशीबागेचा गणपती चार हातांचा असून डाव्या सोंडेचा आहे. वरील दोन हातात पाश, अंकुश असून खालील डाव्या हातात मोदक तर उजवा हात अभयमुद्रेत आहे. मंडळ गणेशोत्सवात आकर्षक सजावट करते. या भव्य गणपतीच्या पिछाडीस एक छोटा पेशवेकालीन गणपती पहायला मिळतो. स्वातंत्र्यपूर्व काळात गणेशोत्सवात पोवाडे, मेळे असे कार्यक्रम गणेशोत्सवात आयोजित केले जात. अनेक मान्यवर लोकांची भाषणे, लोकनाट्येदेखील होत असत. थोर शास्त्रीय गायकांचे गायनदेखील येथे झाले आहे. तुळशीबाग गणेशोत्स

श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, पुणे / Shree Tambadi Jogeshwari Ganpati, Pune

श्री तांबडी जोगेश्वरी गणपती ( मनाचा दूसरा गणपती ) बुधवार पेठ - पुणे बुधवार पेठेत अप्पा बळवंत चौकाजवळ ग्रामदेवी तांबडी जोगेश्वरी देवीमंदिर आहे. सध्या भर वस्तीत असलेला काही शतकांपूर्वी पुणे अगदीच छोटे गाव असताना हा भाग गावाबाहेर लांब होता. तेव्हा या भागातून आंबील ओढा वहात असे. त्याकाळी ओढ्याकाठी देवीची मूर्ती होती. देवीचे मंदिर पेशवेकालीन असावे. काही वर्षांपूर्वी शेंदराचे कवच निखळल्यावर देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन झाले. देवीची मूळ मूर्ती चतुर्भुज असून उभी आहे. योगेश्वरीचे म्हणजेच जोगेश्वरीचे उल्लेख पुराणातही सापडतात. महिषासूराच्या बारा सेनापतींपैकी देवीने ताम्रासुराचा वध केला म्हणून ताम्रवर्णी योगेश्वरी म्हणजेच 'तांबडी जोगेश्वरी' नाव पडले असे म्हटले जाते. देवी शेंदुरलिप्त असते म्हणूनही तांबडी जोगेश्वरी म्हटले जाते. श्रीमंत पेशवे येथे देवी दर्शनास येत असत. अशा या ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी देवीच्या गणेश मंडळास पुण्याच्या गणेशोत्सवात मानाचे दुसरे स्थान प्राप्त झाले आहे. शतकोत्तर रौप्य महोत्सव मंडळाने साजरे केले आहे. सुरुवातीला देवीच्या मंदिरातील विष्णू मंदिरासमोरील ज

श्री क्षेत्र फुरसुंगी, पुणे / Shri Kshetra Fursungi, Pune

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि श्री संत लिंबराज महाराज ( फुरसुंगीकर ) यांची समाधी,  श्री क्षेत्र फुरसुंगी - पुणे १६ व्या शतकात फुरसुंगी येथील हरपळे घराण्यात श्री संत लिंबराज महाराज या थोर युगपुरूषाचा जन्म झाला. संपूर्ण आयुष्य विठ्ठल नामास अर्पण केल्यानंतर त्यांनी अखेर आपल्या या जन्म गावीच चैत्र शुद्ध तृतीयेस संजीवन समाधिष्ठीत होवून आपल्या कार्याची सांगता केली. अशा या थोर महात्म्याच्या हातून या विठ्ठल-रुख्मीणी मंदिराची स्थापना झाली. श्री संत तुकाराम महाराज यांच्याशी अनेकदा किर्तन प्रवचनाच्या निमित्ताने त्यांचे संबंध आले. तेव्हापासून ते आताच्या या चालु पिढीपर्यंत या घराण्यात वारकरी संप्रदाय परंपरेने चालत आला. या घराण्यात चालत आलेल्या अनेक थोर पुरूषांनी ग्रंथ निर्मितीचे कार्यही केले. संशोधन खात्यात त्यातील काही " भक्तप्रताप " सारखे ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. तर काही काळाच्या ओघात नाहीसेही झाले आहेत. सन १७७२ साली या घराण्यातील चौथ्या पिढीतील वंशजाचा नानासाहेब पेशवे यांचेकडुन मोत्याचा कंठा व मोहरा देवून सत्कार करण्यात आला. याच घराण्यातील सातव्या पिढीत वै.ह.भ.प.विठ्ठल महा

Vijaya Vitthala Mandir, Hampi ( Karnataka )

Vijaya Vitthala Mandir, Hampi Vitthalapura is situated on the southern bank of river Tungabhadra, at a distance of 2 kilometers northeast of Virupaksha Mandir. It has two approaches, one through the river side path on the west coming from the Virupaksha Bazaar and the other through the path coming from Talarighat Gateway from the east. The principal structure of this urban sector is the temple of Vitthala, a form of Vishnu. The foundation date of this mandir is not known. However, it is known to have been in existence during the time of Devaraya II ( 1422-46 AD ). The Vitthala Mandir, also known as Vijaya Vitthala Mandir is, no doubt, the finest of the Vijayanagara monuments built at Hampi. The temple is unfinished, at the same time has suffered much damage due to human vandalism. Built facing east, the mandir occupies the center of a huge courtyard measuring 165m x 95m. The principal components of the main structure are the sanctum, the vestibule, circum - ambulatory path,

List Of Devi Mandirs ( Temples ) In Pune

List Of Devi Mandirs ( Temples ) In Pune : 1. Chaturshrungi Devi Mandir, SB Road 2. Tukai Mata Mandir, Baner Hill 3. Vaishnav Devi Mandir, Pimpri 4. Padmavati Devi Mandir, Alandi 5. Kali Bari Mandir, Khadki 6. Vana Devi Mandir, Karve Nagar 7. Shrikali Chamunda Devi Mandir, Deccan 8. Tukai Devi Mandir, Kasba Peth 9. Mahakali Devi Mandir, Kasba Peth 10. Yamai Devi Mandir, Kasba Peth 11. Tambadi Jogeshwari Mandir, Budhwar Peth 12. Astabhuja Devi Mandir, Budhwar Peth 13. Kali Jogeshwari Mandir, Budhwar Peth 14. Astabhuja Devi Mandir, Shaniwar Peth 15. Bhavani Mata Mandir, Bhawani Peth 16. Telfala Devi Mandir, Bhawani Peth 17. Pivali Jogeshwari Mandir, Bajirao Road 18. Mahalakshmi Devi Mandir, Swargate 19. Dashmukhi Mata Mandir, Swargate 20. Tulja Bhawani Mandir, Taljai Hills 21. Saptshrungi Devi Mandir, Bibewadi 22. Santoshi Mata Mandir, Katraj 23. Waghjai Mata Mandir, Sukhsagar Nagar 24. Amba Mata Mandir, Sukhsagar Nagar 25. Mahalkshmi Mata Mandir, Hadapsar 26. Tukai Mata Mand

सरसेनापती दाभाडे वाडा, तळेगाव दाभाडे ( जि. पुणे ) / Sarsenapati Dabhade Palace ( Wada ), Talegaon Dabhade ( Dist. Pune )

सरसेनापती दाभाडे वाडा, तळेगाव दाभाडे पुणे-मुंबई महामार्गावरील तळेगाव दाभाडे या गावी सरसेनापती दाभाडे यांचा एक भव्य वाडा आहे. ते म्हणजे सरसेनापती दाभाडे वाडा ( जुना राजवाडा ). तळेगाव येथील वाडे जवळ-जवळ पडीक अवस्थेत असून ते नामशेष होण्याचा मार्गावर आहेत. त्यांचे उरले-सुरले अस्तित्व आपल्याला पोस्ट मधल्या छायाचित्रांच्या माध्यमातुन लक्षात येईल. हत्ती जातील असा वाड्याचा मुख्य दरवाजा, भव्य विशाल बुरुज, पडीक अवस्थेतील तटबंदी, इमारतींची जोती, काही भिंतींचे अवशेष पाहिल्यावर त्यांचे सरदारी स्वरुप आपल्या नजरेसमोर उभे राहते. पुणे जिल्ह्यात सरसेनापती दाभाडे यांचे वाडे कुठे-कुठे आहे ? १. इंदोरी २. तळेगाव दाभाडे ३. सोमवार पेठ ( पुणे शहर ) सन्दर्भ : १. महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे - भाग पहिला ( डॉ. सदाशिव शिवदे )

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, पुणे / Shrimant Bhausaheb Rangari Ganpati, Pune

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बुधवार - पुणे भाऊसाहेब उर्फ भाऊ लक्ष्मण जावळे म्हणजेच भाऊसाहेब रंगारी हे सार्वजनिक गणेशोत्सवातील एक महत्त्वाचे नाव. ते पुण्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते. भाऊसाहेब रंगारी राजवैद्य होते. त्यांचा वाडा बुधवार पेठेत तांबडी जोगेश्वरी मंदिर व शनिवारवाडा या दोन वास्तूंमध्ये आहे. त्यांचा दवाखाना देखील याच वाड्यात होता. त्यांचा परंपरागत व्यवसाय हा शालूंना रंग देण्याचा होता. त्यावरून "रंगारी" हे उपनाव पडलं होतं. शालूंवरून तेथील बोळास "शालूकर बोळ" म्हणून नाव होते. क्रांतीकारी चळवळीमध्ये भाऊसाहेब रंगारी यांचा सक्रीय सहभाग होता. सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते असलेल्या भाऊ रंगारींचे मार्गदर्शन अनेक क्रांतीकारकांना लाभले. कृष्णाजी काशिनाथ खासगीवाले उर्फ नानासाहेब खासगीवाले ग्वाल्हेरला गेले असता तिथे त्यांनी सार्वजनिक स्वरूपात थाटात गणेशोत्सव साजरा होताना पाहिला आणि त्यानंतर त्यांना पुण्यात असा उत्सव सुरू व्हावा असे वाटू लागले. त्यानंतर भाऊ रंगारी, खासगीवाले व घोटवडेकर यांनी प्रथम सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला. १८९२ मध्ये स्थापलेला हा ह

कै. श्रीमंत दगडूशेठ हलवाई / Late. Shrimant Dagluseth Halwai

कै. श्रीमंत दगडूशेठ हलवाई १९ व्या शतकातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी म्हणून ओळखले जाणारे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई. श्रीमंत व सत्यशील प्रस्थ होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, आपण काही काळजी करू नका, आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा. ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्‍ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्‍ज्वल करतील. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ ह

मानाचे गणपती, पुणे / Manache Ganpati, Pune

मानाचे गणपती, पुणे संपूर्ण महाराष्ट्रासह भारतात आणि भारता बाहेर गणेशोत्सव उत्साहात साजरा केलाच जातो. पण पुण्यातला गणेशोत्सवामध्ये काही वेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. त्यातलीच एक म्हणजे मानाच्या पाच गणपतींची परंपरा. १८९३ सालापासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा त्यामागे होती. पण स्वातंत्र्य मिळेपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा समाजात रुजली होती आणि स्वातंत्र्यानंतरही या सणाचा उत्साह आणि चैतन्य कायम राहिला. यामध्ये काळानुरुप काही बदल निश्चितच झाले. पण १२५ पेक्षा जास्त वर्षं उलटल्यावरही मानाच्या पाच गणपतींची परंपरा पुण्यात तितक्याच बारकाईने पाळली जाते. ही पद्धत सुरु कशी झाली, मानाच्या गणपतींच्या पाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा इतिहास काय आहे, हे आपण जाणून घेऊया. १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाल्यानंतर गणपती मंडळांची संख्या वाढत गेली. असं सांगितलं जातं की दुसऱ्याच वर्षी गणपती मंडळांची संख्या १०० वर गेली होती. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीचं नियोजन आणि त्याची रुपरेषा कशी असावी यावर चर्चा सुरु झाली. कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत मान

गुरुजी तालीम गणपती, पुणे / Guruji Talim Ganpati, Pune

श्री गुरुजी तालीम गणपती (  पुण्याचा राजा ) मनाचा तीसरा गणपती बुधवार पेठ - पुणे पुण्यातील मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम गणपतीचे यंदा १३६ वे वर्ष आहे. या गणपतीला आजुन एका नावानं ओळखला जातं - ते म्हणजे " पुण्याचा राजा" . १८८७ साली भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाची मुहुर्तमेढ रोवली. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधीपासून या गणपतीचा उत्सव सुरू झाला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो. पुण्यात असलेल्या एका तालमीमध्ये हा गणपती बसविण्यास सुरवात झाली होती. आता तालीम अस्तित्वात नाही. मूषकारूढ स्वरूपातील शाडूच्या मातीची मूळ मूर्ती १९७२ साली बनवण्यात आली होती. मंडळाचे कार्यकर्ते आणि तत्कालीन नगरसेवक श्यामसिंग परदेशी यांच्या पुढाकारातून ही मूर्ती घडवून घेतली गेली होती. दरवर्षी रंग देऊन ती मूर्ती उत्सवात ठेवली जात होती. काही वर्षापुर्वी फायबरची मूर्ती तयार करून घेण्यात आली. हीच मूर्ती आता सांगता मिरवणुकीत ठेवण्यात येते. मुर्तीसाठी दहा किलो सोन्याचे आणि वीस किलो चांदीचे दागिने कार्यकर्त्यांच्या सह

राष्ट्रीय युद्ध स्मारक, घोरपडी - पुणे / National War Memorial, Ghorpadi - Pune

राष्ट्रीय युद्ध स्मारक, घोरपडी - पुणे नॅशनल वॉर मेमोरियल सदर्न कमांड म्हणजेच राष्ट्रीय युद्ध स्मारक, हे पुणे शहरातील घोरपडी येथील एक युद्ध स्मारक आहे, जे स्वातंत्र्योत्तर युद्धातील शहीदांना समर्पित आहे. हे दक्षिण आशियातील एकमेव युद्ध स्मारक आहे जे नागरिकांच्या योगदानातून उभारले गेले आहे. १५ ऑगस्ट १९९८ रोजी स्मारकाचे अनावरण करण्यात आले आणि राष्ट्राला ते समर्पित करण्यात आले. भारतीय सैन्याच्या अनेक कामगिरी जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या सर्वांसाठी हे खुले संग्रहालय आहे. स्मारकात मुख्य स्मृतिस्थळ; तसेच १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचे जप्त केलेले रणगाडे प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. कालांतराने या ठिकाणी महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देणारे चित्रप्रदर्शनही नागरिकांसाठी तयार करण्यात आले. तसेच भारत-पाक युद्ध, गोवा मुक्ती संग्राम, भारत-चीन युद्ध, ऑपरेशन पवन; तसेच कारगिल युद्धात दक्षिण मुख्यालयाने राबवलेल्या मोहिमांची माहिती देण्यात आली आहे. परमवीर चक्र विजेत्या २१ वीरांचे अर्धपुतळे बसविण्यात आले असून, त्यांच्या शौर्याची माहिती देणारे शिलालेख लावण्यात आले आहे. ज्या शूरवीरांनी युद्धाच्

श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर, सदाशिव पेठ ( पुणे ) / Shri Lakshmi Narasimha Mandir, Sadashiv Peth ( Pune )

श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर, सदाशिव पेठ ( पुणे ) महाराष्ट्रात लक्ष्मीनृसिंहाची मंदिरं तशी थोडीच आहेत. त्यापैकी एक मंदिर आपल्या पुण्यातील सदाशिव पेठेत आहे. खुन्या मुरलीधर मंदिराकडून टिळक रस्त्याकडे जाताना, सध्याच्या पुणे विद्यार्थी गृहाच्या समोर एक जुन्या पद्धतीचा दगडी पायऱ्यांचा लाकडी दरवाजा दिसतो. आतल्या बाजूस असलेल्या श्री लक्ष्मीनृसिंह मंदिराचे ते प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये पेशवेकालीन मराठा शैलीतील लक्ष्मीनृसिंहाचे लहानसे मंदिर आहे. सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकीर्दीत १७८८ मध्ये येथील नृसिंह मंदिराचे बांधकाम करण्यात आले. १८ व्या शतकात बांधलेल्या तुळशीबाग व बेलबाग या मंदिरांच्या धर्तीवर या मंदिराची रचना केलेली आहे. हे मंदिर चिरेबंदी असून मंदिराला सुंदर कळस, कोरीव छत व महिरपी असलेला लाकडी दिवाणखाना आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून आत प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूस पिंपळाचा भव्य पार आहे. या पारावर पेशवेकालीन हनुमानाची मूर्ती, नागदेवतेच्या शिळा व दगडात कोरलेल्या अज्ञात पादुका आहेत. या पारानजीक असलेल्या खोलीत आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे

Gopuram / गोपुरम्

About Gopuram ( गोपुरम् ) : 1. Monumental entrance tower, usually ornate, at the entrance of a Hindu temple, in the South Indian Architecture 2. Prominent feature of "Hindu Dravidian Style" 3. They are topped by the "Kalasam", a bulbous stone finial 4. They function as gateways through the walls that surround the temple complex 5. Origins can be traced back to early structures of the Pallava Kings, and relate to the central Shikhara Towers of North India 6. The multiple storeys of a gopuram typically repeat the lower level features on a rhythmic diminishing scale 7. The inner sanctum and its towering roof (the central deity's shrine) is also called the "Vimanam", although in the south it is typically smaller than the gopurams in large temples. 8. They also appear in architecture outside India, especially Khmer architecture, as at Angkor Wat. 9. A gopuram is usually a tapering oblong in form with ground-level wooden doors, often ric

धमेख स्तूप, सारनाथ - वाराणसी / Dhamekh Stupa, Sarnath - Varanasi

धमेख स्तूप इस स्तूप के उत्खनन से प्राप्त सन् १०२६ ई० के अभिलेख के अनुसार इस स्तूप का प्राचीन नाम धर्म-चक्र स्तूप था। यह सम्भवतः उस स्थान विशेष का द्योतक है जहाँ भगवान बुद्ध ने प्रथम धर्मोपदेश दिया था। इसके शिखर के मध्य में अलेक्जेण्डर कनिंघम ने धातु मन्जूषा की खोज में लम्बवत् उत्खनन किया था, जिसमें उन्हें शिखर से लगभग ३.२० मी० नीचे एक अभिलेख युक्त पट्ट प्राप्त हुआ था, जिस पर छठीं-सातवीं शती ई० के ब्राह्मी लिपि में बौद्ध मंत्र - "ये धम्म हेतु प्रभवा..." लिखा था। इसके भीतरी भाग में काफी नीचे ईंट निर्मित मौर्य कालीन स्तूप के अवशेष भी प्राप्त हुए। स्तूप का वर्तमान स्वरूप गुप्त कालीन स्थापत्य का उत्कृष्ट नमूना है। इस बेलनाकार ठोस स्तूप के आधार का व्यास २८.५ मी० तथा ऊँचाई लगभग ३३.३५ मी० है। भूमिगत भाग सहित कुल ऊँचाई ३९.०५ मी० है। भूमि की सतह से १३.११ मी० की ऊँचाई तक यह अलंकृत प्रस्तरों से आच्छादित है तथा शेष भाग ईंटों के बेलनाकार पुंज के रूप में है। आधार से लगभग ७.५ मी० की ऊँचाई पर आठ दिशाओं में आठ आले बने है, जिसमें सम्भवतः बुद्ध प्रतिमाएं रखी गई होगी। इसके नीचे सुरूचि

सातारा इतिहास / History Of Satara

सातारा ऎतिहासिक संदर्भ : सातारा मराठा साम्राज्याची राज्‍याची राजधानी होती. त्‍याचा विस्‍तार सुमारे १४ लक्ष कि.मी. इतका होता. या भुमीला सांस्‍कृतीक वारसा लाभलेला आहे. जिल्‍हयातील कित्‍येक थोर योध्‍दे, राजे, संत आणि थोर व्‍यक्तिमत्‍वांनी महाराष्‍ट्राचा इतिहास घडवला आहे. ई.स. पूर्व २०० मधील प्राप्त कोरीव लेखानुसार सातारा जिल्ह्यातील सर्वात जुने ठिकाण म्हणून कराड (पूर्वी क-हाकड) प्रसिद्ध होते. व पांडवांनी जिथे १३ वर्षांचा वनवास भोगला त्या वाई तालुक्याला ‘विराटनगरी’ म्हणून संबोधले जायचे. दक्षिणात्य मौर्य साम्राज्याच्या काळात दोन दशकापर्यंत (ख्रिस्ती वर्ष ५५०-७५०) ‘सातवाहनांचे ‘ राज्य होते. हा जिल्हा दक्षिण महाराष्ट्राचाच एक भाग असून आतापर्यंत बदामीचे ‘चालुक्य‘ , ’राष्ट्रकुट‘, ’शिलाहार‘, देवगिरीचे यादव , ’बहामनी‘ व ‘आदिल शहा‘, (मुस्लिम राज्यकर्ते), ’शिवाजी महाराज‘ (मराठी राज्यकर्ते ), ‘शाहू महाराज ‘, आणि ‘शाहू-२ प्रतापसिंह‘ यांनी राज्य केले. मुस्लिम राज्‍यकर्त्‍यांनी ई.स. १२९६ मध्‍ये प्रथम जिल्‍हयावर आक्रमण केले. सन १७०७ पर्यंत मुस्लिमांचे अधिपत्‍य होते. सन १६३६ साली निजामशाहीचा

Gateway Of India, Mumbai / गेटवे ऑफ इंडिया, मुंबई

Gateway Of India Some Interesting Facts : 1. The Gateway Of India is  India’s most unique landmark, situated in Mumbai, and is located at Apollo Bunder in South Mumbai, on the shore of the Arabian Sea. 2. This architectural marvel scores over any other monument in Mumbai. The foundation stone of the structure was laid on March 31st, 1913, but it took more than 13 years to get completed. 3. A Scottish architect built this symbol by the name of George Wittet to commemorate the visit of King George V and Queen Mary. 4. During British rule, it was used as the entry gate for visitors who can from the west. 5. This is the monument from where the last British troop left India for England in 1947. 6. The monument faces Mumbai Harbor and the Arabian Sea. 7. The arch of the gateway has a height of  26 meters, i.e., 85 feet, and its central dome of 15 meters, i.e., 49 feet in diameter. 8. The monument was built with yellow basalt and reinforced with concrete. The s

श्री सत्यनारायण तुलसी मानस मन्दिर, बनारस ( वाराणसी ) - उत्तरप्रदेश / Shri Satyanarayn Tulsi Manas Mandir, Banaras ( Varanasi ) - Uttar Pradesh

श्री सत्यनारायण तुलसी मानस मन्दिर, बनारस यह मन्दिर बनारस ( काशी ) के आधुनिक मंदिरों में से एक बहुत ही मनोरम मन्दिर है। यह मन्दिर बनारस के प्रसिद्ध दुर्गा मन्दिर ( दुर्गा कुंड पथ ) के समीप में है। इस मन्दिर को सेठ रतन लाल सुरेका ने बनवाया था। पूरी तरह संगमरमर से बने इस मंदिर का उद्घाटन भारत के पूर्व राष्ट्रपति महामहिम सर्वपल्ली राधाकृष्णन द्वारा सन् १९६४ में किया गया। इस मन्दिर के मध्य मे श्री राम, माता जानकी, लक्ष्मणजी एवं हनुमानजी विराजमान है। इनके एक ओर माता अन्नपूर्णा एवं शिवजी तथा दूसरी तरफ सत्यनारायणजी का मन्दिर है। तुलसी मानस मंदिर की सभी दीवारों पर रामचरितमानस के दोहे और चौपाइयां लिखी हैं। दीवारों पर रामायण के प्रसिद्ध चित्रण को बहुत सुन्दर ढंग से नक्कासी किया गया है । इसके दूसरी मंजिल पर संत तुलसी दास जी विराजमान है, साथ ही इसी मंजिल पर स्वचालित श्री राम एवं कृष्ण लीला होती है। इस मंदिर के बारे में कहा जाता है कि इसी स्थान पर तुलसीदास जी ने रामचरितमानस की रचना की थी, इसलिए इस तुलसी मानस मंदिर कहा जाता है। #banaras #varanasi #trave

पुण्यातील समाधी स्थळांची / स्मारकांची यादी ( Samadhi Places / Memorials In Pune )

पुण्यातील समाधी स्थळांची / स्मारकांची यादी :   १) नारायणराव पेशवे - शनिवारवाडा, पुणे शहर  २) सवाई माधवराव पेशवे - शनिवारवाडा, पुणे शहर ३) चिमाजी अप्पा पेशवे - श्री ओंकारेश्वर मंदिर, पुणे शहर  ४) नानासाहेब पेशवे - सदाशिव पेठ, पुणे शहर ५) नाना फडणवीस - नानाचा वाडा, पुणे शहर ६) जंगली महाराज - शिवाजीनगर, पुणे शहर ७) महादजी शिंदे - वानवडी, पुणे शहर ८) लाडोजीराव नरसिंहराव शितोळे ( महादजी शिंदे यांचा जावई ) - संगम घाट, पुणे शहर  ९) संत ज्ञानेश्वर - आळंदी, पुणे शहर १०) संत तुकाराम - देहू, पुणे शहर  ११) थोरले माधवराव पेशवे - थेऊर, पुणे शहर १२) तानाजी मालुसरे - किल्ले सिंहगड, पुणे शहर १३) छत्रपती राजाराम महाराज - किल्ले सिंहगड, पुणे शहर १४) कान्होजी जेधे - आंबवडे, ता. भोर, जि. पुणे १५) जिवा महाला - आंबवडे, ता. भोर, जि. पुणे १६) शंकराजी नारायण सचिव - आंबवडे, ता. भोर, जि. पुणे १७) कृष्णाजीराजे बांदल - पिसावरे, ता. भोर, जि. पुणे १८) दिपाऊराजे बांदल - पिसावरे, ता. भोर, जि. पुणे १९) कोयाजी बांदल - नेकलेस प्वाइंट, ता. भोर, जि. पुणे २०) बाळाजी विश्वनाथ पेशवे - सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे २१

शहाजीराजे भोसले, होदेगिरी ( जि. दावणगिरी - कर्नाटक )

शहाजीराजे भोसले यांची समाधी राजस्थानच्या चित्तोडगडच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसले यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला (अहमदनगर जवळील मुकुंदनगर भागात तारकपूर बस स्टँडपाशी) नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली. शहाजीराजांनी आपले पुत्र

मालोजीराजे भोसले समाधी, इंदापूर ( जि. पुणे - महाराष्ट्र )

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची औरंगाबादच्या वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरासमोर समाधी आहे. बाबाजीराव भोसले यांचे चिरंजीव मालोजीराजे भोसले हे पराक्रमी, युद्धप्रसंगी दाखवायची बुद्धिमत्ता असलेले व उत्तम प्रशासक होते. भोसले घराण्यांच्या उत्कर्षाचा पाया मालोजी यांनी घातला.वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून मालोजीची पत्नी उमाबाई हिच्या हस्ते पिंडीला अभिषेक करण्यात आला. मंदिराच्या तटामध्ये दास मालोजी बाबाजी भोसले व विठोबा बाबाजी भोसले असा आपला व आपल्या भावाच्या नावावर बसवलेला शिलालेख आजही पहावयास मिळतो. मालोजीनी साताऱ्यातील श्रीशिखरशिंगणापूरच्या डोंगराच्या पायथ्याशी भिंत बांधून तलाव तयार केला आणि यात्रेकरूंचा दुवा मिळवला. निजामशाहीने औरंगाबादेत ’मालपुरा’ व ’विठापुरा’अशा दोन पेठा भोसले घराण्याच्या नावे वसवल्या. मालोजीचा पराक्रम वाढतच गेला. आपल्या कामगिरीने मालोजीनी बुऱ्हाणपूरच्या निजामाचा विश्वास संपादन केला.त्यामुळे सरहद्दीवरील इंदापूरच्या बाजूच्या शत्रूचा बदोबस्त करण्याची कामगिरी निजामाने मालोजीवर सोपवली. या वेळी झालेल्या एका लढाईत मोठा पराक्रम गाजवून मा

श्री त्रिशुंड गणपती मंदिर, सोमवार पेठ - पुणे / Trishund Ganpati Mandir, Somwar Peth - Pune

श्री त्रिशुंड गणपती मंदिर, सोमवार पेठ - पुणे पुणे शहरात अनेक प्राचिन मंदिरे आहेत, परंतु अप्रसिद्ध असलेल्या त्रिशुंड गणेश मंदिराची वास्तुशैली पुण्यातील या मंदिरापेक्षा वेगळी आहे. वेरुळच्या कोरीव लेण्यासदृश्य असणारे हे मंदिर उपेक्षित राहण्यामागे १८ व्या शतकात पुण्यातील तत्कालीन सामाजिक परिस्थिती कारणीभूत असावी. पुण्याच्या पूर्वभागात नाग झरीच्या काठावर असणार्‍या सोमवार पेठेत व मंगळवार पेठेच्या काही भागात त्या काळात मोठे स्मशान होते. शहाजीराजांनी इ. स. १६०० मध्ये शहापुरा ही पेठ वसवली. १७३५ मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी या पेठेत व्यापाराला उत्तेजन देऊन या पेठेचा विकास करून या पेठेचे सोमवार पेठ हे नामकरण केले. या पेठेत गोसावी समाजाची मोठी वस्ती असणाऱ्या भागास गोसावीपुरा म्हणत. हा समाज सधन होता. सावकारी, सुवर्ण व रत्ने यांचा व्यापार त्यांच्या हातात होता. येथील स्मशानात अनेक गोसावी सत्पुरुषाच्या समाध्या होत्या. या समाध्यांशेजारी शिवमंदिरे उभारण्याची पद्धत त्या काळात होती. कित्येक समाध्यांचे अवशेष अद्यापही दृष्टीस पडतात, स्मशानामुळे येथील मंदिरांमध्ये भाविकांची वर्दळ नव्हती. त्रि

सरदार मुजुमदार वाडा, कसबा पेठ - पुणे / Sardar Mujumdar Wada, Kasba Peth - Pune

सरदार मुजुमदार वाडा, कसबा पेठ - पुणे  मुजुमदार (मूळ शब्द - मजमू (फारसी)) म्हणजे महसूल गोळा करणारा. श्रीमंत पेशवे यांच्याकडून जी आज्ञापत्रे, राजपत्रे, देणग्या, सनदा, जहागिऱ्या दिल्या जात त्यांची नोंद मुजुमदारांच्या दप्तरात होऊन त्यावर त्यांच्या सहीचा शिक्का पडल्यावर तो कागद कायदेशीर ठरत असे. या घराण्याचे मूळ पुरुष नारो गंगाधर यांना इ. स. १७१४ मध्ये शाहू महाराजांकडून संपूर्ण राज्याचा मजमूचा अधिकार मिळाला. या नारो गंगाधर यांनी पुढे संन्यास घेतला. त्यांच्या निधनानंतर या वाडय़ाजवळच त्यांची समाधी बांधली आहे. सरदार मुजुमदार यांच्या वाडा १९४८ सालची गोष्ट. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यामधील कसबा पेठेतील सरदार मुजुमदार यांच्या वाडय़ात पं. भीमसेन जोशी प्रथमच गाणार होते. त्यांची ओळख करून देताना आबासाहेब मुजुमदार म्हणाले, ‘याच गादीवर प्रख्यात गायक अब्दुल करीम खाँ यांचे गायन झाले आहे. रसिकांना शास्त्रीय संगीताची गोडी लावणारे त्यांचे शिष्य सवाई गंधर्व यांचेही गायन इथे झाले आहे आणि आज गंधर्वाचे शिष्य भीमसेन जोशी हेदेखील इथे गाणार आहेत. म्हणजे एका अर्थाने संगीत क्षेत्रातील गुरुकुलाची परंपरा

Selfie With Waste

Selfie at the most creative location made by huaman. Proud moment right ! Yes, waste is the most creative thing we have produced on the earth. Could you still like this photo ? Could you still comments on it ? Still thinking why I have taken such selfie with Garbage ? But unfortunately this is a reality of the present. We keep travelling and keep producing waste. Don't you believe , now its a need to rethink before every plastic usage? If we don't minimize plastic usage while travelling, then after few years you will be at my place. As an industry prone to overconsumption, tourism consequently produces a substantial amount of waste and pollution. At some places, we tourists create double waste than local residents. This can put incredible strain on local waste management systems, causing landfills and sewage plants to overflow. Another major issue is the improper disposal of trash, raw sewage, and toxic chemicals by tourists, hotels, cruise ships, and others. In ad

श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे यांची समाधी, शनिवार पेठ - पुणे / Samadhi Of Shrimant Chimaji Appa Peshwe, Shaniwar Peth - Pune

श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे यांची समाधी   थोरले बाजीराव बाळाजी भट तथा चिमाजी अप्पा ऊर्फ चिमणाजी अप्पा हे पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र होत. थोरले बंधू बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत चिमाजीअप्पांनी सदैव त्यांना सावलीसारखी साथ दिली. या जोडीचा उल्लेख 'राम-लक्ष्मण' असा केला जातो. पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी चिमाजी अप्पांनी यशस्वी लढा दिला. त्यांनी जिंकलेल्या वसई किल्ल्याची घटना इतिहासात प्रसिद्ध आहे. त्यांच्या पत्नीचे नाव रखमाबाई होय. सदाशिवराव भाऊ हे त्यांचे पुत्र होत. ओंकारेश्वर देवस्थान ही संस्था दर वर्षी 'श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे पुरस्कार' देते. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरात चिमाजी अप्पांची समाधी आहे. 🚩 Instagram - @TRAVELWALA.CHORA

मूर्तिभंजन आणि मंदिरविध्वंस

मूर्तिभंजन आणि मंदिरविध्वंस इस्लामी राजवटींचे मुख्य वैशिष्ट्य होते मूर्ती फोडणे आणि देवळे पाडणे. त्यांचे अनुकरण भारतातील इस्लामी राज्यकर्त्यांनी कसे केले याची काही उदाहरणे पुढे देतो. मुहम्मद घोरीने ११९२ साली पृथ्वीराज चौहानाचा पराभव करून त्याला ठार मारले. त्यानंतर आपला गुलाम कुत्बुद्दीन ऐबक याला भारतात ठेवून घोरी गझनीला परत गेला. घोरी मेल्यावर कुत्बुद्दीन ऐबकच इथला सुलतान झाला. या कुत्बुद्दीन ऐबकाने मुहम्मद घोरीच्या आज्ञेवरून दिल्लीत एक मोठी मशीद बांधली. सत्तावीस बुतखान्यांचे म्हणजे मूर्तिमंदिरांचे साहित्य वापरून ती मशीद बांधली आहे असा फार्सी शिलालेखच तिच्यावर आहे. आता ती मशीद पडक्या अवस्थेत आहे आणि पुरातत्त्वखात्याच्या ताब्यात आहे. आजही तिथे हिंदू आणि जैन मंदिरांचे अवशेष पहायला मिळतात. कुत्बुद्दीन ऐबकच्याच काळात मुहम्मद बख्तियार खिलजी या त्याच्या सरदाराने १२०२ मध्ये बिहारमधील एक मोठा बौद्ध विहार पाडून टाकला आणि तिथल्या बौद्ध भिक्षूंची कत्तल केली. ती सर्व हकीगत तत्कालीन इतिहासकार मिन्हाजुद्दीन याने तबकात-इ नासिरी या त्याच्या फार्सी ग्रंथात लिहून ठेवली आहे. त्याच सुमाराला प्

अविमुक्त क्षेत्र काशी, मुसलमानी शासक, पंडित गागाभट्ट व मराठे

अविमुक्त क्षेत्र काशी, मुसलमानी शासक, पंडित गागाभट्ट व मराठे प्राचीन काळापासून हिंदूंच्या सर्वोच्च श्रद्धेचं स्थान आणि हिंदूधर्माच्या सांस्कृतिक व धार्मिक राजधानीचं स्थान म्हणून काशीक्षेत्र विख्यात आहे. आपल्या पापांची शुद्धी होण्याचे आणि मोक्ष मिळण्याचे क्षेत्र आणि महातीर्थ म्हणून काशीक्षेत्राला प्रत्येक आस्तिक हिंदू ओळखतो. पापमुक्तीचे स्थान म्हणून जसे काशीक्षेत्र हिंदूंमध्ये विख्यात आहे, तसेच काशीक्षेत्राची आणखी एक ओळख आहे आणि ती म्हणजे, काशीचा विश्वनाथ ! सश्रद्ध हिंदूंचे मस्तक ज्याचे नाव ऐकताच नमन करते आणि अबालवृद्धांपासून ते आस्तिक आणि नास्तिकांपर्यंत तसेच भारतात आणि भारताबाहेर ज्याच्यामुळे काशीक्षेत्र बहूविख्यात झाले, तो हा काशीचा विश्वनाथ अथवा विश्वेश्वर महादेव ! भगवान विश्वेश्वर महादेवाचे हे काशीक्षेत्र विविध साहित्यात विविध नावांनी उल्लेखलेले आहे. काश्रृ दीप्तौ म्हणजे स्वतेजाने प्रकाशणारी, ह्या संस्कृत धातुपासून काशी ह्या शब्दाची व्युत्पत्ती सांगितलेली आहे. परमेश्वर येथे साक्षात प्रकाशमान असतो, म्हणून यास काशी म्हणतात, असे काशीखंड सांगते. काशीचे दुसरे नाव म्हणजे बना